चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्याक संवाद यात्रा उत्साहात


- शिक्षण, रोजगार व सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर साधला थेट संवाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपुरात अल्पसंख्याक संवाद यात्रा उपक्रम उत्साहात पार पडला. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आदेशानुसार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिक विश्रामगृह येथे ५ सप्टेंबर रोजी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. अल्पसंख्याक समाजाला पक्ष संघटनेशी जोडणे, तसेच शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि समाजासमोरील विविध प्रश्नांवर चर्चा करून समस्या शासनदरबारी मांडणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी घेतलेल्या भूमिका व केलेल्या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह पक्ष संघटना मजबूत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष अफजल फारूक, शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, प्रदेश सरचिटणीस ॲड. हिराचंद बोरकुटे आणि अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई ईसा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मलारप, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष दिनेश मिश्रा, मौलाना तोफिक रजा, ओबीसी सेल अध्यक्ष विठ्ठल म्हस्के, आदिवासी सेलचे जनार्दन गेडाम, व्हीजेएनटी सेल अध्यक्ष रवी नागपल्लीवार, सेवा दल अध्यक्ष विलास निखाते, कामगार सेल जिल्हाध्यक्ष महेश काहीलकर, वकील सेल शहराध्यक्ष प्रवीण वाकुलकर, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मनीष मोडक यांच्यासह शोभा गरडे, दीपक कटकुजवार, शब्बीर पठाण, आनंदी तिरणकर, अरविंद परचाके, अरविंद माहूर पवार, वसीम शेख, अनुवाज भाई, इस्तीहाज शेख, शाहरुख शेख, दानिश शेख, मोहम्मद हाफिस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संवाद बैठकीदरम्यान अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी विविध समस्या व अपेक्षा मांडल्या. पक्षाच्या माध्यमातून या प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




Petrol Price




