चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
- नवखळा जंगल परिसरातील घटना; नुकसानभरपाई देण्याची पशुपालकाची मागणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड वनपरिक्षेत्रांतर्गत नवखळा जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने दुधाळ जर्सी गायीवर अचानक हल्ला करून तिला ठार केल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.नवखळा येथील गुराखी नेहमीप्रमाणे गावातील जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात घेऊन गेला होता. जनावरे जंगलात चरत असताना दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने वसंत गायकवाड यांच्या दुधाळ जर्सी गायीवर अचानक हल्ला केला. वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली गाय जागीच ठार झाली.वाघाने गायीवर हल्ला केल्याचे लक्षात येताच गुराखीने आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभा...
बातम्या -
Chandrapur
- दावे व हरकतींसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत- जिल्ह्यातील 2066 मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. या प्रारूप मतदार यादीत, जिल्ह्यातील एकूण १५ लाख २७ हजार ५०२ मतदारांचा समावेश आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक दावे व हरकती ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.भारत निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यात एकूण २०६६ मतदान केंद्रांना अंतिम मंजुरी दिली आहे. यामध्ये १३ मतदान केंद्रे विलीन अथवा रद्द करण्यात आली असून ३ नवीन मतदान कें...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महात्मा ज्योतिबा फुले नागरी सहकारी पत संस्था, विसापूर मर्या. (रजि. क्र. ३१९) यांची वार्षिक आमसभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.३१ जुलै १९९७ रोजी संस्थेची स्थापना झाली. संस्थेने २९ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून ३०व्या वर्षात पदार्पण केले आहे. या कालावधीत संस्थेने सभासदांच्या आर्थिक प्रगतीला चालना देतानाच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही आपले योगदान कायम ठेवले आहे. सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेची वाटचाल सातत्याने प्रगतीच्या दिशेने सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.इयत्ता दहावीमध्ये नैतिक महेश तुराणकर याने ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तो दिलासाग्राम कॉन्व्हेंट, बल्ल...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिची छेड काढून पसार झालेल्या अज्ञात आरोपीचा शेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत शोध घेऊन त्याला अटक केली. गणेश बाजुराम कुमावत ३४ वर्ष रा. बोर्डा, ता. वरोरा, मूळ रा. बासडी खुर्द, जि. जयपूर, राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे १० वाजता टेमुर्डा येथे एक अल्पवयीन मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी एका दुचाकीस्वाराने तिला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसविले. काही अंतर पुढे गेल्यानंतर त्याने मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने चालत्या दुचाकीवरून उडी घेतली.या घटनेत तिला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाल...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड-चिंचोली मार्गावर पंजाबी ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात ट्रकची दुरुस्ती करणाऱ्या दोघांसह दुचाकीवरील एक जण असे तिघे जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास नागभीडपासून आठ किलोमीटर अंतरावर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, पळसगाव येथील आकाश शंकर राहुलवार (२६) हे ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी २११७ मधून नागभीड येथून भंगार घेऊन तळोधीच्या दिशेने जात होते.नागभीडपासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर चिंचोळी परिसरात ट्रकमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी पंजाबी ढाब्याजवळ ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून दुरुस्तीचे काम सुरू केले. दरम्यान, रात्री सुमारे ८ वाजता नागभीडकडून भरधाव वेगाने येणाऱ्या एमएच ४० ई ९५६० क्रमांकाच्या दुचाकीने ट्रकजवळ असल...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या गळ्यावर भाजी कापण्याच्या चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना दुर्गापूर येथील वैद्यनगर परिसरात २६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. पत्नीला वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हाताच्या बोटालाही चाकू लागल्याने ती जखमी झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुकय्या इमरान शेख २६ वर्ष हिचे इमरान इकबाल शेख ३० वर्ष रा. दुर्गापूर, वॉर्ड क्रमांक ३ याच्यासोबत २०२० मध्ये विवाह झाला होता. इमरान हा ऑटोचालक आहे. आठ दिवसांपूर्वी दारूच्या नशेत पती-पत्नीमध्ये वाद झाल्याने रुकय्या ही आपल्या आईच्या घरी तुकूम तलाव परिसरात राहण्यास गेली होती.दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी रुकय्या ही तिची बहीण सुरय्या शेख हिच्या वैयनगर येथील घरी सफेदीच्या कामासाठी मदतीला आली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास इमरान तेथे आ...
बातम्या -
Chandrapur
- गुडघाभर चिखल-पाण्यातून शेत गाठण्याची वेळ; कळमगाव तुकूम येथील पांदन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : तालुक्यातील कळमगाव तुकूम ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेतशिवारात जाणाऱ्या पांदन रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शेतकऱ्यांना गुडघाभर चिखल आणि पाण्यातून वाट काढत शेत गाठावे लागत आहे. त्यामुळे शेतीच्या दैनंदिन कामांसाठी ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.कळमगाव तुकूम शेतशिवारात जाण्यासाठी असलेला हा पांदन रस्ता परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतीसाठी लागणारी अवजारे, खते, बियाणे तसेच इतर आवश्यक साहित्य शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतमाल गावात आणण्यासाठी याच रस्त्याचा मोठ्या प...
बातम्या -
Chandrapur
- अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे आयोजन; राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीचे पूजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम येथून ९ ऑगस्ट रोजी प्रस्थान केलेल्या गुरुदेव क्रांतीज्योत यात्रेचे वरोरा नगरीत अहेतेशाम अली मित्र परिवारातर्फे उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. आलिशान लॉन येथे आयोजित या स्वागत सोहळ्याला गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाभावी उपासक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांतीज्योत यात्रेचे वरोरा येथे आगमन झाल्यानंतर उपस्थित मान्यवर व गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी क्रांतीज्योतीचे पूजन केले. त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित गुरुदेव सेवा उपासकांनी श्रद्धेने पूजन कर...
बातम्या -
Chandrapur
- १५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा एनएसयूआयचा इशाराविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्पर्धा परीक्षा व विविध अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अभ्यासिका व वाचनालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. अभ्यासिकेतील अस्वच्छता, सांडपाण्याची समस्या, दुर्गंधी तसेच नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचा तुटवडा यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याचा आरोप एनएसयूआयचे प्रदेश सचिव आशिष बोंडे यांनी केला आहे. येत्या १५ दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.माजी महापौर संगीता अमृतकर यांनी यापूर्वीच अभ्यासिकेतील स...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नगर परिषद बल्लारपूरच्या अधिनस्त प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद २१ ऑगस्ट रोजी पीएम श्रीनगर परिषद गांधी विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष डॉ. अलका वाढई होत्या. कार्यक्रमाला बल्लारपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सचिन मालवी, शिक्षण सभापती कु. प्रियंका थुलकर, उपमुख्याधिकारी रविंद्र भंडारवार, शिक्षण सल्लागार नागेश नीत, गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन कडूकर, गडचिरोलीचे उपक्रमशील शिक्षक सुधीर गोहणे, समूह समन्वयक माया वाटोरे, वैशाली धार्मिक, केंद्रप्रमुख श्रीनिवास रायला, सुदाम राठोड व अमोल टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.या शिक्षण परिषदेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम, अध्ययन अनुभवांचे आदान-प्रदान, शिक्षकांच...