महत्वाच्या बातम्या

 प्रदीप नन्द यांच्यासह आठ जणांविरोधातील प्रकरणात मनोज सुचक यांचा हस्तक्षेप अर्ज फेटाळला


- केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मनीष कोठारी यांचा निर्णय

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / घाटन्जी : घाटन्जी तालुक्यातील कुर्ली येथील घाटन्जी तालुका रोजगार हमी योजना समितीचे तालुकास्तरीय माजी अध्यक्ष अयनुद्दीन सोलन्की यांनी सन्शयीत आरोपी प्रदीप मधुसूदन नन्द अकोला, सुनिल शत्रुघ्न मिश्रा नागपूर, राजेंद्र हिरागीर गोसावी (जिल्हा खनिकर्म कार्यालय यवतमाळ), तक्षशिला एन. गजभिये, सन्जय के. इन्गळे, अन्जली नगरकर व जिग्नेश गुणवंत गोपानी मुंबई / नागपूर आदींनी झरी (जामणी) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गट नम्बर ७९५ राखीव वन अ वर्गाची जमीन व ७/१२ उतारा असतान्ना, तसेच केन्द्र शासनाची कोणतीही परवानगी घेतली नसतान्ना चुनखडी व डोनोमाईटच्या उत्खननासाठी मायनिन्ग लीज (MINING LEASE) करुन दिल्या प्रकरणी सीआरपीसी १५६ (३) अन्तर्गत झरी येथील प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी बी. एस. वाढई यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता.


सदर प्रकरणात ADV. रन्जित अगमे (यवतमाळ) यांनी युक्तीवाद केला. सदरचा अर्ज झरी न्यायालयाने मन्जूर करुन सन्शयीत आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुकूटबन पोलीसान्ना दिले. त्यावरुन मुकूटबन पोलीसान्नी वरील आठ आरोपी विरुद्ध अपराध क्रमान्क ३६३/२०२२ अन्वये भादवि कलम ४२०, ४६८, ४७० व ४७१ अन्तर्गत मुकूटबन पोलीस ठाण्यात गुन्हा नोन्दविला. सदर प्रकरणात एकही आरोपीला मुकूटबन पोलीसान्नी अटक केली नाही. तदनन्तर मुकूटबन पोलीसान्नी झरी न्यायालयात सी समरी फायनल सादर केला. सदरचा सी समरी फायनल झरी न्यायालयाने मन्जूर केला.

त्यामुळे फिर्यादी/तक्रारदार अयनुद्दीन सोलन्की (कुर्ली ता. घाटन्जी) यांनी पान्ढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी पुनर्विलोकन अर्ज (Crim.Rev.Appln/२१/२०२३) २१/२०२३ ADV. रविंद्र सोनटक्के (यवतमाळ) यांच्या मार्फत दाखल केला. सदर प्रकरणात ADV. अविनाश पवार यांनी (पान्ढरकवडा) त्यान्ना सहकार्य करीत आहे. 

सदर प्रकरण अन्तीम युक्तीवादाकरीता सुरु असतान्ना मनोज रमनिकलाल सुचक (वय ५३, रा. घाटन्जी) यांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मनीष कोठारी यांच्या न्यायालयात अयनुद्दीन सोलन्की विरुद्ध प्रदीप नन्द व इतर 08 प्रकरणात पक्षकार म्हणून सहभागी होण्यासाठी हस्तक्षेप अर्ज (INTERVENOR) ADV. निखील सायरे (यवतमाळ) यांच्या मार्फत पान्ढरकवडा न्यायालयात दाखल केला. सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे ADV. अविनाश पवार (पान्ढरकवडा) व मनोज सुचक यांच्यातर्फे ADV. निखिल सायरे (यवतमाळ) यांनी न्यायालयात युक्तीवाद केला. 

पान्ढरकवडा येथील न्यायाधिश १, व तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश मनिष कोठारी यांनी मनोज सुचक यांचा अर्ज शनिवारी (१७/१०/२०२६) फेटाळून (REJECT) लावला. फिर्यादी अयनुद्दीन सोलन्की यांची बाजू ADV. अविनाश पवार (पान्ढरकवडा) यांनी मान्डली. तर इन्टरवेनर मनोज सुचक यांचेतर्फे ADV. निखिल सायरे (यवतमाळ) यांनी काम पाहीले. या आदेशामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील अन्तीम युक्तीवादाचा मार्ग मोकळा झाला आहे.





  Print






Related Photos