चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त संघमित्रा चौक मित्र परिवार आणि बल्लारपूर मुस्लिम सेवा संस्थेच्या वतीने सामाजिक सलोखा व बंधुभावाचा संदेश देत रॅलीतील सहभागी नागरिकांना विविध फळांचे वाटप करण्यात आले.ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त आयोजित रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मौलाना व नागरिकांचे नगराध्यक्ष अल्का ताई वाढई यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी रॅलीतील सहभागींसाठी सफरचंद, केळी, मोसंबी व डाळिंबाचे वितरण करण्यात आले.या उपक्रमादरम्यान तालुका महिला अध्यक्ष अफसाना सय्यद व रेखा रामटेके यांच्या हस्ते नगराध्यक्षा अल्का वाढई यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नगरसेविका वैशाली हुमणे व ॲड. मेघा भाले यांचे आरिफ कुरेशी व प्रीतम पाटील यांनी स्वागत केले.कार्यक्रमाला नगरसेवक अब्दुल करीम, इस्माईक ढाकवाला, भास्कर माकोडे यांच्यासह समाजबांधव उ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपुर शहरामध्ये २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद निमित्त आयोजित जुलूस व रॅली मध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. त्यामुळे रहदारीला अडथळा, जनतेला त्रास तसेच तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता चंद्रपुर शहरातील वाहतुकीच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.२६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत खालील प्रमाणे वाहतुक वळविण्याचे निर्देश जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपानी यांनी दिले आहे.कोहीनुर ग्राउंड-दस्तगीर चौक -मिलन चौक -गांधी चौक- जयंत टॉकीज चौक -जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक व प्रियदर्शनी चौक- जटपुरा गेट-कस्तुरबा रोडने कोहीनूर ग्राऊंड पर्यंतचा रस्ता, सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. तसेच सदरचा रस्ता नो पार्किंग झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे.नागपूरकडून शहरामध्ये जाणारी वाहने (जड वाहने...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे पोषणमूल्य व आरोग्यविषयक महत्त्व शहरी नागरिकांना अवगत व्हावे, तसेच रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश वाढावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, चंद्रपूर यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त दरवर्षी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमांतर्गत मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, बल्लारपूर परिसरात रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला.महोत्सवाचे उद्घाटन तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष अनिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समितीचे सदस्य, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी केली...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महावितरणच्या कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या २१ स्पॅन अॅल्युमिनियम तारेची चोरी करणाऱ्या टोळीचा भिसी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, चोरीच्या अॅल्युमिनियम तारेसह गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन व दुचाकी असा एकूण ७ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.भिसी येथील वीज वितरण केंद्राचे कनिष्ठ अभियंता कृपाल महादेव लांजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टिटवी शेतशिवारात कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिनीवरील २१ स्पॅन अॅल्युमिनियम तार १२ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. चोरी झालेल्या तारेची किंमत सुमारे १ लाख ५१ हजार रुपये होती.याप्रकरणी भिसी पोलिसांनी अज्ञात ...
बातम्या -
Chandrapur
- दोन तरुणांसह विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात; १ किलो १७० ग्रॅम गांजा हस्तगतविदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / भद्रावती : शहरातील पंचशील नगर वॉर्ड परिसरात कारमधून गांजाची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत दोन तरुणांसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १ किलो १७० ग्रॅम गांजा, तीन मोबाईल फोन आणि स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पंचशील नगर वॉर्ड परिसरात करण्यात आली. पोलिसांना या परिसरात पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH-४९-AE-१३४० मधून काही इसम गांजा बाळगून त्याची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहितीची खात्री करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचत कारवाई ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बहुजन समाज पार्टीच्या (BSP) चंद्रपूर जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हा संघटनात्मक समीक्षा व आढावा बैठक शनिवारी २२ रोजी येथील पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊस येथे पार पडली. प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी काळातील पक्षाची दिशा, संघटनात्मक बांधणी आणि विविध कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीस प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन प्रभारी प्रा. डॉ. मोहन राईकवार, प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी इंजि. महेंद्र मकेश्वर, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार माजी आयआरएस संजय थूल, बीएसपी कायदेविषयक सल्लागार ॲड. पाटील, जिल्हाध्यक्ष रत्नाकर साठे, चंद्रपूर लोकसभा प्रभारी धर्मेश निकोसे, ओबीसी समाज नेते मंगेश ठाकरे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीत बीएलए-२ संदर्भा...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर परिसरातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी सोलर पंपाच्या चार प्लेट, वायर तसेच झटका मशीनची सोलर प्लेट असा अंदाजे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतमालक विशाल नामदेव घोरुडे यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घोरुडे यांची विसापूर परिसरातील सर्वे क्रमांक ३११ मध्ये १.०१ हेक्टर शेती आहे. महाकृषी ऊर्जा अभियानांतर्गत पीएम-कुसुम योजनेतून सन २०२३ मध्ये त्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यात आला होता.या संचावर एकूण १४ सोलर प्लेट बसविण्यात आल्या होत्या. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता घोरुडे शेतात गेले असता सोलर पंप व प्लेट व्यवस्थित होत्या. मात्र, २२ ऑगस्ट रोजी पुन्हा शेतात गेल्यावर दोन सोलर प्लेट तसेच पंपाजवळील झटका मशीनची प्लेट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर २३ ऑगस्ट...
बातम्या -
Chandrapur
- सिंदेवाहीतील जनआक्रोश महामोर्चात विजय वडेट्टीवार यांचा घणाघात - हजारोंच्या जनसागराने सरकारविरोधात हल्लाबोल विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या जनविरोधी, शेतकरीविरोधी आणि युवकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे सोमवार २४ आगस्ट रोजी सिंदेवाही येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. सिंदेवाहीतील शिवाजी चौक येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले.मोर्चाला संबोधित करताना आ .विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकारने सत्तेचा वापर जनतेच्या हितासाठी नव्हे, तर मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी क...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा शहरात सोमवारी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली. सोमनाथपूर वॉर्डातील रहिवासी विनोद उर्फ पापा जाधव याच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जाधव यांच्या डोक्याला गोळी लागल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना गंभीर अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा शहरातील मुख्य मार्गावर प्रदीप बिअर बारच्या बाजूला असलेल्या नारळाच्या दुकानाजवळ ही घटना घडली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. गोळीबारानंतर जखमी अवस्थेत असलेल्या जाधव यांना नागरिकांनी तातडीने उचलून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घ...
बातम्या -
Chandrapur
- स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅडसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय शाळा तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वसतिगृहांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सॅनिटरी पॅड नॅपकीन तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करत युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे आणि युवासेना चंद्रपूर विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गद...