महत्वाच्या बातम्या

 मोटारसायकलसाठी एमएच ३२ बीई ही नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू


- आकर्षक पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी वाहनधारकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : नवीन मोटारसायकल खरेदी करणाऱ्या वाहनधारकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वर्धा यांच्यावतीने एमएच ३२ बीई (MH ३२ BE) ही नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपासून या नवीन मालिकेची अंमलबजावणी करण्यात आली असून, नव्याने मोटारसायकल खरेदी करणाऱ्या नागरिकांना या मालिकेंतर्गत आपल्या वाहनाची नोंदणी करता येणार आहे.

नवीन वाहन खरेदी करताना अनेक वाहनधारकांना आपल्या पसंतीचा आकर्षक आणि विशेष क्रमांक मिळविण्याची इच्छा असते. अशा वाहनधारकांसाठी ही नवीन मालिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी नवीन मोटारसायकल खरेदी केली आहे आणि ज्यांना आपल्या वाहनासाठी आकर्षक किंवा पसंतीचा क्रमांक हवा आहे, त्यांनी याबाबत अधिक माहितीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे यांनी माहिती देताना, नवीन मोटारसायकल संवर्गातील वाहनांसाठी एमएच ३२ बीई ही मालिका २ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले. इच्छुक वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक मिळविण्यासाठी आवश्यक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे. त्यामुळे नवीन मोटारसायकल खरेदी केलेल्या व आपल्या वाहनासाठी खास पसंतीचा क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील वाहनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.






  Print






Related Photos