उत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या नेहरु युवा केंद्राच्यावतीने सामाजिक कार्य करणाऱ्या युवा मंडळ व महिला मंडळांना उत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी नेहरु युवा केंद्र कार्यालयाशी संलग्न असलेले व संकेतस्थळावर ज्यांची अद्यावत माहिती आहे, अशा इच्छुक युवा मंडळ व महिला मंडळांनी ५ डिसेंबर पर्यंत नेहरु युवा केंद्र येथे अर्ज सादर करावे.
उत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सामाजिक, युवा कल्याण व ग्रामविकास क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत १८ ते २९ वयोगटातील कार्यकारणी असलेली युवा मंडळे, महिला मंडळे अर्ज करु शकतात. पुरस्काराचे स्वरुप २५ हजार रुपये व प्रमाणपत्र असे असणार आहे. पुरस्कारासाठी १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ हा कालावधी गृहीत धरण्यात येईल. उत्कृष्ठ पुरस्काराची निवड जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती करतील, असे नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा यांनी कळविले आहे.
News - Wardha