राजौरीमध्ये चकमक : एका दहशतवाद्याला कंठस्नान, १ जवान शहीद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीनगर :
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये संरक्षण यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु झालेल्या चकमकीमुळे सदर परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. राजौरीतील थन्ना मंडी भागामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या या चकमकीमध्ये जवानांकडून एकाचा खात्मा करण्यात यश आले. 
चकमकीमध्ये सुरक्षा दलातील जेसीओ शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय सैन्य आणि सीआरपीएफने केलेल्या या मोहिमेमध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनीही योगदान दिले. या भागात अद्यापही शोधमोहिम सुरु असल्याचे कळत आहे. 
राजौरी येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दुपारी सुरु झालेल्या या चकमकीमुळे अतिशय सतर्कता पाळण्यात येत आहे. सध्या या भागात 3-4 दहशतवादी लपले असल्याचे म्हटले जात आहे. दहशतवाद्यांबाबतची माहिती मिळताच त्यांचा खात्मा करण्यासाठी या भागात तातडीने सुरक्षा वाढवण्यात आली. यानंतर दहशतवाद्यांनी या भागात गोळीबार सुरु केला. ज्यामध्ये एक जवान शहीद झाले. ज्यानंतर सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. 
ऑगस्ट महिन्यात या भागात घडलेली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी इथे 6 ऑगस्टला घालेल्या घटनेमध्ये लष्करच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.   Print


News - World | Posted : 2021-08-19
Related Photos