वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसची धडक बसल्याने ६६ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ ऑक्टोबर रोजी घडली. सोहनीदेवी श्रीश्रीमाल असे मृत महिलेचे नाव असून, त्या अहमदाबाद येथील रहिवासी होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहनीदेवी श्रीश्रीमाल या हैदराबाद-हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेसने शनिवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास भद्रावती रेल्वे स्थानकावर उतरल्या होत्या. येथील प्रसिद्ध केशरीया पार्श्वनाथ जैन मंदिरात दर्शनासाठी त्या आल्या होत्या. वृद्धावस्थेमुळे रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावरून जाणे त्यांना कठीण जात असल्याने त्या फलाट क्रमांक दोनवरून रस्त्याच्या दिशेने जात होत्या.याचवेळी स्थानकावर न थांबता जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची त्यांना जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे जैन समाजात शोककळा पसरली आहे.




Petrol Price




