महत्वाच्या बातम्या

 महात्मा फुले महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात २८ नोव्हेंबर रोजी अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले आणि त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले.

महाविद्यालयातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि परिवर्तनवादी विचारांना उजाळा देण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि जातिभेदाविरुद्ध संघर्ष करून शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक समतेसाठी आयुष्यभर कार्य केले. स्त्री शिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचे शिक्षण आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडणे आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर, प्रा. डॉ. पंकज कावरे, प्रा. पंकज नंदुरकर, प्रा. राजेंद्र साखरे, अशोक गर्गेलवार, शामराव दरेकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या स्मृतींना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





  Print






Related Photos