चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य, रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, तालावर थिरकणारी पावले आणि देवीच्या भक्तीने भारावलेले वातावरण... अशा आनंदमय आणि भावस्पर्शी वातावरणात वैभव कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त गरबा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने संपूर्ण विद्यालयात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान करून गरब्याच्या तालावर मनमोहक नृत्य सादर केले. आपल्या छोट्या-छोट्या पावलांनी गरब्याचा ठेका धरताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह आणि निरागसता उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. या चिमुकल्यांच्या उत्साहाने नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला.हा कार्यक्रम क...
बातम्या -
Chandrapur
- जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर १७, १८, २४ व २५ ऑक्टोबर रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरेविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना आता २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच पात्र नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.मतदार यादीत पात्र नागरिकांचा समावेश व्हावा, तसेच प्रारूप मतदार यादीतील त्रुटी दूर करता याव्यात, या उद्देशाने शनिवार, १७ ऑक्टोबर, रविवार, १८ ऑक्टोबर, शनिवार,२४ ऑक्टोबर आणि रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करत वरोरा तालुक्यातील वाठोडा येथे एका घरातून एक लाख रुपये किमतीची देशी दारू जप्त केली. या कारवाईत रॉकेट संत्रा देशी दारूच्या ९० मिली क्षमतेच्या २ हजार ५०० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस स्टेशन शेगाव हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना मौजा वाठोडा येथे ही कारवाई केली. आरोपीच्या घराची झडती घेतली असता २५ खोक्यांमध्ये भरून ठेवलेल्या रॉकेट संत्रा देशी दारूच्या एकूण २ हजार ५०० सीलबंद बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत अंदाजे एक लाख रुपये आहे.या प्रकरणी निखिल शेखर जोंगोनी (वय २३), रा. खांबाडा, ता. वरोरा आणि प्रव...
बातम्या -
Chandrapur
- आरवट-शिवणी येथे श्रमदानातून पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम- अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तसेच भूजल पातळीत वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती दिली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या वतीने चंद्रपूर तालुक्यातील आरवट-शिवणी येथील सराई नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. या उपक्रमातून पाणी अडवा, पाणी जिरवा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत आहे.कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण, पावसाच्या पाण्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीट...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाविद्यालयात जात असताना भरधाव KTM मोटारसायकलने मोपेडला मागून जोरदार धडक दिल्याने दोन प्राध्यापिका जखमी झाल्या. या अपघातात प्रणाली भगवान गौरकर यांच्या डाव्या खांद्याचे हाड फ्रॅक्चर झाले, तर प्रियंका विजय मुलचंदानी यांनाही दुखापत झाली. ही घटना १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास विसापूर येथील एस.एन.डी.टी. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर घडली. याप्रकरणी प्रियंका मुलचंदानी यांनी १६ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.प्रियंका मुलचंदानी ३३ वर्षे रा. किल्ला वार्ड, बल्लारपूर आणि प्रणाली भगवान गौरकर या दोघी एस.एन.डी.टी. महाविद्यालय, विसापूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी प्रणाली गौरकर बल्लारपूर येथे आल्यानंतर दोघीही त्यांच्या मोपेडने महाविद्यालयाकडे जाण्यासाठी निघाल्या होत्...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नवरात्रोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गस्त घालणाऱ्या बल्लारपूर पोलिसांनी सलग तिसरी कारवाई केली. बालाजी वार्डात दारूच्या नशेत हातात धारदार तलवार बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून अजित स्वयंवरसिंग ठाकूर (वय २७), रा. बी.टी.एस. प्लॉट, शिवाजी वार्ड, बल्लारपूर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली.१५ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक उमेश दिगंबर जोगदंड हे पोलीस पथकासह नवरात्रोत्सवानिमित्त गस्त घालत असताना त्यांना संबंधित तरुणाबाबत गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांचे पथक दिसताच संशयिताने हातातील तलवार बाजूला फेकून दिली. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तलवार जप्त केली.या प्रकरणी भारतीय हत्यार ...
बातम्या -
Chandrapur
- एमआयवायसीएन कार्यक्रम राबविण्यासाठी मुंबई आयआयटी च्या सहकार्याने सामंजस्य करारविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील माता आणि बालकांचे आरोग्य अधिक सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि मुंबई आयआयटीच्या अभिनव संकल्पनेतून विकसित करण्यात आलेला ‘माता, अर्भक व लहान बालक पोषण कार्यक्रम’ (Mother, Infant and Young Child Nutrition – MIYCN) आता चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.यासाठी आवश्यक सामंजस्य करार करण्यात आला असून लवकरच कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बालकांचे कुपोषण कमी करणे, त्यांची शारीरिक वाढ सुधारणे आणि माता-बाल आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यास मदत होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व...
बातम्या -
Chandrapur
- तालुक्यात १०० वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभागविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळग्रस्त सिंदेवाही तालुक्यात आगामी काळातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. याच अनुषंगाने संपूर्ण तालुक्यात किमान १०० वनराई बंधारे उभारण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, लोकसहभागातून पाणी अडविणे आणि जमिनीत मुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान दोन वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहेपहिल्याच दिवशी अनेक गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी : या मोहिमे...
बातम्या -
Chandrapur
- निर्यातवाढीसाठीच्या विविध योजना आणि बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन संधी उपलब्ध करून देणे, स्थानिक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे तसेच शासनाच्या विविध निर्यात प्रोत्साहन योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने निर्यात केंद्र म्हणून जिल्ह्यांचा विकास या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स शिखर परिषद -२०२६ उत्साहात संपन्न झाली.विदेश व्यापार महासंचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या परिषदेला जिल्ह्यातील आयात-निर्यात संकेतांक (आयईसी) धारक उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी विदेश व्यापार उपमहासंचालक स्नेहल ढोके यांनी निर्यात ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी जनगणना २०२७ मध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजासाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करून समाजाची जातनिहाय अचूक आकडेवारी नोंदवावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा ओबीसी काँग्रेसचे अध्यक्ष श्यामकांत थेरे यांनी केली. केंद्र सरकारने यासंदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी ओबीसी हक की हुंकार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ओबीसी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजितभाऊ वंजारी यांच्या प्रचाराची रणनीती आणि नियोजनावर चर्चा करण्यात आली.कार्यक...