महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

८ वर्षापासून पोलिसांना देत होता हुलकावणी : अखेर फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात बातम्या - Chandrapur

८ वर्षापासून पोलिसांना देत होता हुलकावणी : अखेर फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलिसांना गुंगारा देत तब्बल आठ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली येथून ताब्यात घेतले. प्रशांत ऊर्फ पिंटू शशिकांत मिस्त्री ऊर्फ मंडल ३८ वर्षे रा. गडचिरोली असे या आरोपीचे नाव असून, दारूबंदीच्या काळात दाखल झालेल्या गुन्ह्यात तो पोलिसांना पाहिजे होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.सन २०१८ मध्ये नागभीड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) व ८३ अंतर्गत अप. क्र. ८०/२०१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात प्रशांत मिस्त्री याचा सहभाग असल्याच्या अनुषंगाने तो पोलिसांना पाहिजे असलेला आरोपी होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तब्बल आठ वर्षे तो फरार असल्याने त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.दरम्यान, चंद...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
भद्रावतीत दुचाकी चोरीप्रकरणी आरोपी ताब्यात : चोरीची मोटारसायकल जप्त बातम्या - Chandrapur

भद्रावतीत दुचाकी चोरीप्रकरणी आरोपी ताब्यात : चोरीची मोटारसायकल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरालगतच्या जेना शेतवस्ती परिसरातून मोटारसायकल चोरीला गेल्याच्या प्रकरणात भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत आरोपी स्नेहल संतोष महाकुलकर (वय २५), रा. पानवडाळा, ता. भद्रावती याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान चोरीला गेलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.प्राप्त माहितीनुसार, अजय अनिल टोंगे (वय ३६), रा. गौतम नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ एएल ०६८६ चोरीला गेली होती. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.४५ वाजताच्या दरम्यान जेना शेतवस्ती परिसरातून ही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती.या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १००२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्ग...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेतातील धानपिकाला पाणी देऊन परतताना काळाचा घाला : भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू बातम्या - Chandrapur

शेतातील धानपिकाला पाणी देऊन परतताना काळाचा घाला : भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी येथील रहिवासी हरिदास चंदनखेड़े यांच्यावर शेतातील काम आटोपून घरी परतताना काळाने घाला घातला. तळोधी-नागभीड मार्गावरील गोविंदपूर फाट्याजवळ भरधाव कारने त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६२ वर्षीय हरिदास यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शेतातील धानपिकाला पाणी देऊन सुखरूप घरी परतण्याची अपेक्षा असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.तळोधी येथील रहिवासी हरिदास चंदनखेड़े हे १४ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता धानपिकाला पाणी देण्यासाठी सायकलने शेताकडे गेले होते. शेतातील काम पूर्ण करून ते घरी परतत असताना तळोधीहून नागभीडच्या दिशेने जाणाऱ्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने (क्रमांक एमएच ३३ व्ही १७९७) त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नारायण सुर्वेंची कविता माणूस म्हणून आपली समज उन्नत करते : डॉ. महेबुब सय्यद बातम्या - Chandrapur

नारायण सुर्वेंची कविता माणूस म्हणून आपली समज उन्नत करते : डॉ. महेबुब सय्यद


- श्री. ज्ञानेश महाविद्यालयात मराठी अभ्यास मंडळाचे उद्घाटन; कादंबरीकार पवन भगत यांचे ते पन्नास दिवस या विषयावर मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : मराठी कवितेत भाकरीचा चंद्र शोधणारी शब्दकळा नारायण सुर्वे यांनी आणली. त्यांनी कामगारांचे आणि कष्टकऱ्यांचे जीवन कवितेचा विषय बनविले. मानवी जीवनाकडे उन्नत दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी त्यांच्या कवितेतून मिळते. अस्सल जीवनानुभवातून निर्माण झालेली त्यांची कविता जीवननिष्ठा, मानवतावादी विचार आणि समाजाकडे पाहण्याची परिपक्व दृष्टी देणारी आहे. त्यामुळे नारायण सुर्वे यांची कविता अत्यंत उंचीची कविता असल्याचे मान्य करावे लागते, असे प्रतिपादन मराठी साहित्याचे अभ्यासक डॉ. महेबुब सय्यद यांनी केले.सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील श्री. ज्ञानेश महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मंगळवार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मराठी अभ्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दुष्काळावर मात करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात २८ हजार ६८८ कामांचे नियोजन बातम्या - Chandrapur

दुष्काळावर मात करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात २८ हजार ६८८ कामांचे नियोजन


- जलसंधारण, सिंचन, वृक्षलागवड व कृषी विकासावर भर; ग्रामीण मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्टविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : खरीप हंगामात झालेल्या अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि गरजू कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून देण्यासोबतच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढविणे, वृक्षलागवड, चारा निर्मिती आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. यासाठी विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान (व्हीबीजी-राम-जी) अंतर्गत सन २०२६-२७ च्या वार्षिक नियोजन आराखड्यात एकूण २८ हजार ६८८ विविध विकासकामांचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली दुष्काळी भागांमध्ये रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण पाया...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात : स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन बातम्या - Chandrapur

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात : स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बल्लारपूरद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन आणि अभ्यासाची दिशा मिळावी, या उद्देशाने महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन अरुणा राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानसंपादनाची प्रेरणा देणे आणि स्पर्धात्मक युगात करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच त्यांच्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
डॉ. कलाम यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा : मोंटफोर्ट स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात बातम्या - Chandrapur

डॉ. कलाम यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांना प्रेरणा : मोंटफोर्ट स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : स्वप्न पाहण्याची जिद्द, ती पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम आणि ज्ञान मिळविण्याची अखंड ओढ, हा संदेश देणारे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बल्लारपूर येथील मोंटफोर्ट स्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुस्तकांशी मैत्री करण्याचा आणि डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनातून शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून घेतला.विद्यालयाच्या ग्रंथालयात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे प्राचार्य ब्रदर प्रेम कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.शिक्षक घनश्याम बुरडकर यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनकार्याची माहिती देताना त्यांच्या विचारांचे म...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपूर नगरात १७ ऑक्टोबरला श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन बातम्या - Chandrapur

चंद्रपूर नगरात १७ ऑक्टोबरला श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन


- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी उत्सव; अरुण नारायण तिखे प्रमुख अतिथी, मंगेशजी भेंडे प्रमुख वक्तेविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूर नगराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री विजयादशमी उत्सवाचे आयोजन शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रामनगर येथील चांदा पब्लिक स्कूल येथे सायंकाळी ६.१५ वाजता होणार असून,  या विजयादशमी उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून अरुण नारायण तिखे उपस्थित राहणार आहेत. ते माळी महासंघ या सामाजिक संघटनेचे वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष व अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश म्हणून कार्यरत आहेत. तसेच प्रमुख वक्ते म्हणून मा. मंगेशजी भेंडे उपस्थित राहणार असून, ते अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख, रा. स्व. संघ आहेत.विजयादशमी हा हिंदू परंपरेतील महत्त्वाचा सण असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेत या उत्सवा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वनसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर : कोठारी वनपरिक्षेत्रातील समिती अध्यक्षांचा ताडोबा दौरा बातम्या - Chandrapur

वनसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर : कोठारी वनपरिक्षेत्रातील समिती अध्यक्षांचा ताडोबा दौरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मध्य चांदा वनविभागांतर्गत कोठारी वनपरिक्षेत्रातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांच्या अध्यक्षांसाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. ताडोबाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक प्रभूनाथ शुक्ल यांच्या सहकार्याने आणि कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुंदन कातकर यांच्या संकल्पनेतून हा दौरा आयोजित करण्यात आले होते.वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, जैवविविधतेचे व्यवस्थापन आणि वनांवर आधारित शाश्वत उपजीविकेच्या संधींबाबत प्रत्यक्ष माहिती मिळवून देणे हा या अभ्यास दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. वनव्यवस्थापनात स्थानिक ग्रामस्थांचा सहभाग कशा प्रकारे वाढविता येईल, तसेच वनसंपत्तीचे संवर्धन करताना पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल, याबाबत समित्यांच्या अध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा देशातील मह...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ऑनलाइन नोकरीच्या जाळ्यात उच्चशिक्षित गृहिणी अडकली : ५.५७ लाखांची फसवणूक बातम्या - Chandrapur

ऑनलाइन नोकरीच्या जाळ्यात उच्चशिक्षित गृहिणी अडकली : ५.५७ लाखांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी / चंद्रपूर : घरबसल्या काम करून आर्थिक स्वावलंबी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका उच्चशिक्षित गृहिणीला ऑनलाइन नोकरीच्या आमिषातून सायबर भामट्यांनी ५ लाख ५७ हजार २११ रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. ऑनलाइन फॅशन उत्पादनांना रेटिंग देण्याच्या कामातून भरघोस कमिशन मिळवून देण्याचे आमिष दाखवून संबंधित महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. सुरुवातीला कमिशनच्या नावाखाली पैसे देऊन तिचा विश्वास जिंकण्यात आला; मात्र मोठी रक्कम गुंतवल्यानंतर पैसे काढण्यास अडथळे निर्माण करण्यात आले. विशेष म्हणजे, जमा केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणखी ४ लाख ९३ हजार २०६ रुपये भरण्याची मागणी करण्यात आल्याने फसवणुकीचा हा प्रकार समोर आला.ऊर्जानगर येथील सीएसटीपीएस कॉलनीत राहणारी ३२ वर्षीय गृहिणी अभियांत्रिकी पदवीधर असून, घरून काम करता यावे यासाठी ऑनलाइन नोकरीच्या शोधात होती. ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →