महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

डुक्कर पकडण्याच्या वादातून तरुणाला मारहाण : दुचाकीची चावी हिसकावली, जीवे मारण्याची धमकी बातम्या - Chandrapur

डुक्कर पकडण्याच्या वादातून तरुणाला मारहाण : दुचाकीची चावी हिसकावली, जीवे मारण्याची धमकी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : डुक्कर पकडून घेऊन जाण्यास विरोध केल्याने एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड परिसरातील सहारा पार्क येथे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. यावेळी तरुणाच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याप्रकरणी अनिल नेताजी लोणारे आणि मिमा दांडेकर या दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.राहुल राजन नकये ३५ वर्ष , रा. जिजामाता वॉर्ड, एकार्जुना रोड, वरोरा हे सफाई कामगार म्हणून काम करतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी सफाईचे काम करण्यासोबतच ते डुक्कर पालनही करतात. डुकरांच्या शेडकडे येऊन डुक्कर चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या कारणावरून त्यांचा अनिल लोणारे आणि भीमा दांडेकर यांच्याशी यापूर्वी वाद झाला होता.११ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान राहुल यांना त्यांच्या मित्राचा फोन आल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजुरातील लॉयड्स मेटल रेल्वे सायडिंगवरून २.५० लाखांचे १७ टायर गायब : दोन ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल बातम्या - Chandrapur

राजुरातील लॉयड्स मेटल रेल्वे सायडिंगवरून २.५० लाखांचे १७ टायर गायब : दोन ट्रकचालकांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ नव एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा येथील लॉयड्स मेटलच्या रेल्वे सायडिंग परिसरात उभ्या असलेल्या दोन ट्रकमधून डिस्कसह एकूण १७ टायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरी झालेल्या टायर व डिस्कची किंमत सुमारे २ लाख ५० हजार रुपये असून, याप्रकरणी दोन ट्रकचालकांविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.एसव्हीए ट्रान्सपोर्टिंग कंपनी रायपूर या कंपनीच्या एकूण १९ गाड्या असून, त्यापैकी १० गाड्या चंद्रपूर-रायपूर मार्गावर धावतात.८ ऑक्टोबर २०२६ रोजी कंपनीचे दोन ट्रक कोलफाईन माल घेऊन रायपूर येथून भाटिया कोल वॉशरी, पांढरपौनी येथे आले होते. तेथील माल खाली केल्यानंतर दोन्ही ट्रक लॉयड्स मेटल, राजुरा येथील रेल्वे सायडिंगवर माल भरण्यासाठी रवाना झाले. यामध्ये ट्रक क्रमांक सीजी २२ एके ७९८२ चा चालक पुष्पेंद्र कुशवाह (वय २४) आणि ट्रक क्रमांक सीजी २२ एके ९२०० चा चालक दीपक कुशवाह दोन्ह...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंदनखेडा उपबाजारात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ बातम्या - Chandrapur

चंदनखेडा उपबाजारात सोयाबीन खरेदीचा शुभारंभ


- पहिल्याच दिवशी प्रतिक्विंटल ६,४०० रुपये दर; ८४७ क्विंटलची आवकविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / भद्रावती : कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावतीच्या चंदनखेडा येथील उपबाजारात रविवारी ११ ऑक्टोबर सोयाबीन खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती राजू डोंगे यांच्या हस्ते करण्यात आला. खरेदीच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ४०० रुपये दर मिळाला, तर एकूण ८४७ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. त्यामुळे उपबाजारात सोयाबीन खरेदीला सुरुवात झाली असून, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.शेतकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार -सोयाबीन विक्रीसाठी उपबाजारात आलेल्या शेतकऱ्यांचा बाजार समितीचे सभापती राजू डोंगे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मासळ येथील मधुकर महादेव दानव, चोरा येथील संजय आसूटकर, पारोधी येथील ईश्वर आसूटकर आणि विसापू...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बल्लारपुरात धारदार गुप्तीसह तरुण ताब्यात : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, शस्त्र कायद्यान्वये गुन्हा बातम्या - Chandrapur

बल्लारपुरात धारदार गुप्तीसह तरुण ताब्यात : दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, शस्त्र कायद्यान्वये गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्ड परिसरातील नागमंदिराजवळ धारदार लोखंडी गुप्ती बाळगून फिरणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना पाहताच त्याने हातातील शस्त्र बाजूला फेकून दिले. मात्र, पोलिसांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता कचऱ्यातील सिमेंटच्या पाइपमध्ये लपवून ठेवलेली गुप्ती जप्त करण्यात आली. या प्रकरणी शाहरुख उर्फ धुव्वा मुन्ना शेख याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंद करण्याची कारवाई करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, ११ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत खासगी वाहनाने गस्त घालत होते. यावेळी डॉ. राजेंद्र प्रसाद वॉर्डातील नागमंदिराजवळ एक तरुण धारदार शस्त्र बाळगून फिरत असून, त्याच्या या कृत्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण ह...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
हातात आलेले धानपिक पावसाने हिरावले : कर्जाच्या चिंतेत ६५ वर्षीय शेतकऱ्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या बातम्या - Chandrapur

हातात आलेले धानपिक पावसाने हिरावले : कर्जाच्या चिंतेत ६५ वर्षीय शेतकऱ्याची तलावात उडी घेऊन आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका, हातात आलेले धानपीक पावसाअभावी उद्ध्वस्त आणि डोक्यावर खासगी मायक्रो फायनान्सचे कर्ज या संकटांच्या विळख्यात सापडलेल्या नागभिड तालुक्यातील मींथुर येथील ६५ वर्षीय शेतकऱ्याने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. मुखरू लक्ष्मण दडमल असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नागभीड तालुक्यापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मींथुर गावातील मुखरू दडमल यांची यंदाच्या हंगामातील धानपिकाकडून मोठी आशा होती. मात्र, पावसाअभावी हातात आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. एकीकडे शेतीचे नुकसान, दुसरीकडे मायक्रो फायनान्सचे कर्ज आणि घरखर्चाची चिंता, अशा दुहेरी संकटात ते सापडले होते. शेती...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
भद्रावतीत धक्कादायक प्रकार! तरुणाच्या घरात तलवारी अन् खंजर : पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ बातम्या - Chandrapur

भद्रावतीत धक्कादायक प्रकार! तरुणाच्या घरात तलवारी अन् खंजर : पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरातील खापरी वॉर्ड क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या घरातून तीन धारदार तलवारी आणि एक खंजर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ११ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. या कारवाईत १३ हजार रुपये किमतीची चार घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, गोविंदा मारोती बावणे २६वर्ष  याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.गोविंदा बावणे याच्या घरात घातक शस्त्रे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराची तपासणी केली असता तीन तलवारी आणि एक खंजर आढळून आला. पोलिसांनी ही सर्व शस्त्रे जप्त केली. धारदार शस्त्रे घरात आढळल्याने या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे.जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये पाच हजार रुपये किमती...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विकासकामांना गती बातम्या - Chandrapur

चंद्रपूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा : आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून विकासकामांना गती


- चांदा इंडस्ट्रियल इस्टेटमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते व प्रवेशद्वाराची ३ कोटींची कामे पूर्ण; उर्वरित कामेही मार्गी लावण्याचा निर्धारविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ऐतिहासिक वारसा, औद्योगिक क्षमता आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळावर चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चांदा इंडस्ट्रियल को-ऑपरेटिव्ह इस्टेटमधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ही कामे पूर्ण झाली आहेत. या कामांबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले. दरम्यान, औद्योगिक वसाहतीतील उर्वरित पायाभूत सुविधांची कामेही येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.चांदा इंडस्ट्रियल इस्टेट हे एकेकाळी ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
 मार्डा–एकोनातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक बातम्या - Chandrapur

मार्डा–एकोनातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक


- तीव्र ब्लास्टिंगमुळे प्राचीन हनुमान मूर्ती पडल्याचा ग्रामस्थांचा दावा; शेती, घरांचे नुकसान, प्रदूषण आणि बेरोजगारीच्या प्रश्नांवर वेकोली प्रशासनाला इशाराविदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी / चंद्रपूर : वेकोलीच्या एकोणा कोळसा खाणीत होणारे तीव्र ब्लास्टिंग, त्यामुळे शेती व घरांचे होत असल्याचे सांगितले जाणारे नुकसान, वाढते प्रदूषण, स्थानिक बेरोजगारांचा रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न यांमुळे मार्डा–एकोना परिसरातील नागरिकांच्या अडचणी पुन्हा ऐरणीवर आल्या आहेत. या विविध प्रश्नांवर आमदार तथा शिवसेनेचे विदर्भ विभागीय नेते बच्चू कडू यांनी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यादरम्यान मार्डा–एकोना येथे भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी कृती संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या. वेकोली प्रशासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर तालुक्यांत प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश बातम्या - Chandrapur

ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर तालुक्यांत प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रह्मपुरी, जिवती व बल्लारपूर या तीन तालुक्यांतील प्रमुख पाच पिकांचे २० टक्के क्षेत्रावर सर्वेक्षण (ग्राऊंड ट्रुथिंग) करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. यासाठी संबंधित तहसीलदारांनी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची संयुक्त पथके गठित करून सर्वेक्षणाची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहे.राज्यात अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक २९ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. या बैठकीतील निर्णयानुसार राज्यातील ट्रिगर-१ लागू असलेल्या २६५ तालुक्यांमध्ये १०० टक्के पीकपाहणी करून भौतिक व...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पोषण माह अभियान समारोपातून महिला सुरक्षा : बालसंरक्षण व पोषणाबाबत जनजागृती बातम्या - Chandrapur

पोषण माह अभियान समारोपातून महिला सुरक्षा : बालसंरक्षण व पोषणाबाबत जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड येथील माळी समाज भवनात ९ ऑक्टोबर रोजी पोषण माह अभियान समारोप व सेवा संकल्प अभियानानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांचे आरोग्य, बालकांचे संरक्षण, महिला सुरक्षा आणि पोषणाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्विनी गिऱ्हे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकाश भांदक्कर, अंगणवाडी पर्यवेक्षिका साधना मेश्राम, सखी वन स्टॉप सेंटरच्या कल्याणी रायपुरे यांच्यासह नागरी प्रभागातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.कार्यक्रमानिमित्त पाककला स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपस्थित महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व, वै...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →