महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

चंद्रपुरात १३ ऑक्टोबर रोजी निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स निर्यात शिखर परिषद बातम्या - Chandrapur

चंद्रपुरात १३ ऑक्टोबर रोजी निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स निर्यात शिखर परिषद


- नवउद्योजक व लघुउद्योगांना मिळणार निर्यातविषयक मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या डिस्ट्रिक्ट्स ॲज एक्सपोर्ट हब्स उपक्रमांतर्गत १३ ऑक्टोबर २०२६ रोजी चंद्रपूर येथे ‘निर्यात जागरूकता शिबिर व ई-कॉमर्स निर्यात शिखर परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.विदेश व्यापार महासंचालनालय, प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह  येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत केंद्र शासनाच्या निर्यात प्रोत्साहन मोहिमे अंतर्गत उपलब्ध विविध योजना, मुक्त व्यापार करार, निर्यात प्रक्रिया, आंतरराष्ट्र...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सन्मित्र सैनिक विद्यालयात १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; गावात पोहोचण्यापूर्वीच पित्याला आला फोन बातम्या - Chandrapur

सन्मित्र सैनिक विद्यालयात १२ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू; गावात पोहोचण्यापूर्वीच पित्याला आला फोन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : हसतखेळत मुलाला शाळेत सोडून पिता आपल्या गावाकडे परतत होता. मात्र, गावात पोहोचण्यापूर्वीच शिक्षकाचा फोन आला आणि अवघ्या १२ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी कानावर पडली. काही तासांपूर्वी डोळ्यांसमोर असलेल्या लेकराच्या मृत्यूची बातमी ऐकताच पित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. विसापूर येथील सन्मित्र सैनिक विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या जीवन विलास झरेकर या विद्यार्थ्याचा गुरुवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे, जीवनच्या शरीरावर फुरळ आल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच विद्यालयातील इतरही अनेक विद्यार्थ्यांच्या अंगावर फुरळ आल्याची माहिती समोर येत असल्याने या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. जीवन झरेकर हा राजुरा तालुक्यातील खांबाळा येथील रहिवासी होता. तो विसापू...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
पिर्ली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग बातम्या - Chandrapur

पिर्ली येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पीक कापणी प्रयोग


- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवादविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यातील मौजा पिर्ली येथे आज ८ पीक कापणी प्रयोगाच्या पर्यवेक्षणासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी नथ्थू महादेव डाखरे यांच्या शेतात प्रत्यक्ष उपस्थित राहून पीक कापणी व मळणीची प्रक्रिया जाणून घेतली. तसेच दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनाची अचूक नोंद घेण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतक-यांशी संवाद साधला.पुढे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यात कमी पर्जन्यमान आणि पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पीक कापणी प्रयोगातून मिळणारी आकडेवारी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे पीक उत्पादनाच्या नोंदीमध्ये अचूकता आणि पारदर्शकता राखावी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राँग साइडचा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो : जेटपुरा गेटवर वाहतूक पोलिसांचा इशारा बातम्या - Chandrapur

राँग साइडचा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो : जेटपुरा गेटवर वाहतूक पोलिसांचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : काही क्षणांची घाई, काही मीटरचा शॉर्टकट आणि नियमांकडे केलेले दुर्लक्ष कधी मोठ्या अपघाताला निमंत्रण देईल, सांगता येत नाही. जेटपुरा गेट परिसरातील वाहतूक कोंडी आणि चुकीच्या दिशेने वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने आता राँग साइड प्रवेश रोखण्यासाठी स्पाईक बॅरिअर (राँग साइड कटर) बसविले आहेत. त्यामुळे विरुद्ध दिशेने वाहन घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या वाहनचालकांचे टायर पंक्चर होऊन वाहनाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.जेटपुरा गेट परिसरात अनेकदा वाहनचालक घाईच्या नादात किंवा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारतात. मात्र, राँग साइडने वाहन चालविण्याचा हा प्रकार स्वतःच्या जीवासोबतच समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारा ठरू शकतो. अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रशासनाने हे स्पाईक बॅरिअ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नापिकीने हिरावला शेतकऱ्याचा आधार; मारडा येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या बातम्या - Chandrapur

नापिकीने हिरावला शेतकऱ्याचा आधार; मारडा येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ज्या काळ्या मातीत आयुष्यभर कष्टाचे बीज पेरले, त्याच शेतात एका शेतकऱ्याची जीवनयात्रा संपल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मारडा येथे घडली. सततच्या नापिकीच्या संकटाला कंटाळून ५२ वर्षीय मनीष रघुनाथ माकोडे यांनी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मारडा परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गातूनही हळहळ व्यक्त होत आहे.मनीष माकोडे हे मारडा येथील रहिवासी होते. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मौजा मारडा येथील शेतात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक चौकशीत सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.माकोडे यांच्या नावावर मारडा येथे ०.८०, १.०० आणि २.६९ असे एकूण ४.४९ हेक्टर आर जमीन आहे. प्राथमिक तपासात त्यांच्या नावावर कोणत्याही बँकेचे ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सुभाष वार्डात टॉवर उभारणीला नागरिकांचा तीव्र विरोध : मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट बातम्या - Chandrapur

सुभाष वार्डात टॉवर उभारणीला नागरिकांचा तीव्र विरोध : मुख्याधिकाऱ्यांची घेतली भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील सुभाष वार्ड परिसरात टॉवर उभारणीचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी त्याला तीव्र विरोध दर्शविला. परिसरातील नागरिकांनी एकत्र येत टॉवर उभारणीला आक्षेप नोंदवित नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.टॉवर उभारणीमुळे परिसरातील नागरिकांना होणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आपली बाजू मांडली. नागरिकांच्या आक्षेपांची दखल घेऊन संबंधित विषयाची पाहणी व आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.या वेळी नगर परिषद मुख्याधिकारी विशाल वाघ, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माइल ढाकवाला, अविनाश मठ्ठा नगरसेविका करुणा रेब्बावार, चेतन गेडाम यांच्यासह शमशेर निषाद, राजू निषाद, हीरा बहुरिया, कल्लू यादव, गोलू बहुरिया, छोटन निषाद, संतोष म...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शिवसेना विधानसभा क्षेत्राच्या आढावा बैठकीत संघटन बळकटी करणाचा निर्धार बातम्या - Chandrapur

शिवसेना विधानसभा क्षेत्राच्या आढावा बैठकीत संघटन बळकटी करणाचा निर्धार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शिवसेना विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली. आगामी काळात विधानसभा क्षेत्रात पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्यासह नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.बैठकीला महिला संपर्कप्रमुख उल्काताई विश्वासराव (मुंबई) तसेच विधानसभा क्षेत्राचे संपर्कप्रमुख प्रशांत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव, नगरसेवक घनश्याम मूलचंदानी, महानगरपालिका सदस्य मनस्वी गिऱ्हे, जिल्हा समन्वयक प्रदीप गेडाम, तालुका प्रमुख बबलू पाठक, शहरप्रमुख प्रकाश मेश्राम, महिला जिल्हाप्रमुख कल्पनाताई गोरघाटे, नगरसेविका रंजिता बिरे, नगर सेविका काजल तोटावर, ज्योती गहलोत, नगरसेवक मनोज बेले, अंजली शिवबन्सी, रीता बेनबन...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
२०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी बातम्या - Chandrapur

२०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी


-  सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. नियोजन भवन येथे ६ ऑक्टोबर रोजी आयोजित या शिबिरात विविध विभागांतील २०५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर२०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून कर्मवीर मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर हॉस्पिटल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले....

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
१९१ आदिवासी विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी बातम्या - Chandrapur

१९१ आदिवासी विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी


- सेवा संकल्प अभियानातून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहे व नामांकित पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या दंत व मुख आरोग्य तपासणीचा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत एकूण ६३ शाळांमधील विद्यार्थ्यांची दंत व मुख तपासणी करण्यात येणार असून गोजोली येथील श्रीराम उच्च माध्यमिक व प्राथमिक आदिवासी आश्रमशाळेत आयोजित शिबिरात १९१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.मौखिक आरोग्य कक्ष व दंत विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, दंतशास्त्र विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा मौखिक आ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सात वर्षीय मुलीला सोबत घेऊन गेला : बल्लारपुरात २६ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा बातम्या - Chandrapur

सात वर्षीय मुलीला सोबत घेऊन गेला : बल्लारपुरात २६ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सात वर्षीय अल्पवयीन मुलीला पालकांच्या परवानगीशिवाय सोबत घेऊन गेल्याची घटना बल्लारपूर शहरात घडली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी २६ वर्षीय तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) व ९७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.६ ऑक्टोबर रोजी सकाळी मुलगी शाळेत जाण्यासाठी घराबाहेर ऑटोची प्रतीक्षा करीत होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिला घरी चल, असे सांगितले. मुलीने नकार दिल्यानंतर तिचा हात धरून तिला घराजवळ नेले. त्यानंतर मुलगी तेथे खेळत असताना संबंधित तरुण त्यांचा घरात जाऊन झोपला. काही वेळाने तो मुलीची सायकल घेऊन आला. सायकल विकून तुला नवीन सायकल घेऊन देतो, असे सांगून त्याने मुलीला सोबत नेले. त्यानंतर तिची सायकल विकल्याचे त्याने सांगितल्याचे मुलीने घरी परतल्यानंतर कुटुंबीयांना सांगितले.दरम्यान, सकाळी ११.३० वाजताच्या ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →