चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, साहित्यिक वारसा आणि मातृभाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे केली. काही विद्यार्थ्यांनी मराठी कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या भाषणातून मराठी भाषेविषयीचा अभिमान आणि मातृभाषेबद्दलची आत्मीयता दिसून आली.यावेळी शिक्षिका मारपल्लीवार यांनी अभिजात मराठी भाषा दिवसाचे महत्त्व सविस्तरपणे विशद केले. मराठी भाषेला लाभलेली समृद्ध साहित्यिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : विद्या प्रसारक संस्था संचालित सर्वोदय महाविद्यालय, सिंदेवाही येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुशील कुंजलवार यांचा मार्गदर्शनात हां कार्यक्रम घेतला गेला. अध्यक्षस्थानी डॉ. रिझवान शेख होते. कार्यक्रमाला रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. रमेश राठोड, प्रा. अशोक भोसले, प्रा. चेतना अगडे, प्रा. अपर्णा कोवे, प्रा. श्रिया वरभे, प्रा. जयंत रामटेके, प्रा. मेश्राम , प्रा. हरने,प्रा.जाधव , यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी तरू मून, नीतिन सागुडले,कालीदास गेडाम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ इंटरनेटवर पाहणे, डाउनलोड करणे आणि साठवून ठेवल्याच्या संशयावरून भद्रावतीतील ५२ वर्षीय व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. National Cyber Crime Reporting Portal (NCRP) मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै २०२६ रोजी National Crime Records Bureau (NCRB), नवी दिल्लीमार्फत सायबर पोर्टलवरून Cyber Tipline Report क्रमांक २४१५४७५५६ भद्रावती पोलिसांना प्राप्त झाला. या अहवालानुसार २ जानेवारी २०२५ रोजी इंटरनेटचा वापर करून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित आक्षेपार्ह साहित्य डाऊनलोड, अपलोड अथवा शेअर केल्याची माहिती समोर आली होती.सायबर टिपलाईनमध्ये संबंधित इंटरनेट कनेक्शनची माहिती मिळाल्यानंतर इंटरनेट सेवा पुरवठादाराकडून प्राप्त Subscriber Detail आणि इतर तांत्रिक माहि...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : जागतिक रेबीज दिनानिमित्त वरोरा येथे विविध सामाजिक व शासकीय संस्थांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर उपक्रम आणि मोफत अँटी-रेबीज लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वरोरा, पशुसंवर्धन विभाग (महाराष्ट्र शासन), रोटरॅक्ट क्लब, इनरव्हील क्लब, नगर परिषद वरोरा तसेच डॉग अँड पेट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. राहुल शेंदरे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वरोऱ्याचे आमदार करणभाऊ देवतळे यांनी भूषवले. यावेळी इनरव्हील क्लबचे अध्यक्ष स्नेहल पत्तीवार, उपाध्यक्ष प्रतिभा मणियार, सचिव प्राजक्ता कोहळे, माधवी शेंद्रे, प्रिया टोंगे, मानसी चिकनकर,सीमा लाहोटी, इत्यादी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलिस डॉग स्क्वॉड ठरले मुख्य आकर्षण या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चंद्रपू...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आजी-आजोबांना भेटण्यासाठी बल्लारपूरला आलेली १६ वर्षीय मुलगी वरोऱ्याला परत जाण्यासाठी घराबाहेर पडली; मात्र ती घरी पोहोचलीच नाही. वरोऱ्याला जाते असे सांगून निघालेल्या मुलीचा त्यानंतर संपर्क तुटल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. बल्लारपूर आणि वरोरा परिसरात शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी वरोरा येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी तिने बल्लारपूर येथील आजी-आजोबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुटुंबीयांनी तिला लगेच जाण्यास मनाई केली असता ती भावनिक झाली होती. आजी-आजोबांना भेटण्यासाठी जाऊ दिले नाही तर जीवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी तिने दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अखेर तिला बल्लारपूर...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर अहिंसा, संयम आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात असतानाच बल्लारपूरमध्ये मात्र ड्राय डेच्या दिवशी बारमध्ये मद्यपान सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. गांधी जयंतीच्या दिवशी शासनाने घोषित केलेल्या ड्राय डेच्या नियमांना हरताळ फासत पत्ता गोदाम जवळील बारमध्ये ग्राहकांना मद्य उपलब्ध करून दिल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी बारमालक, वेटर/मॅनेजरसह मद्यपानासाठी जमलेल्या १८ जणांवर कारवाई केली. या प्रकरणी एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ५ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.२ ऑक्टोबर रोजी पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे पथकसह रात्री १० वाजताच्या सुमारास पेट्रोलिंगवर असताना त्यांना बारमध्ये ड्राय डे असतानाही मद्यपान सुरू असल्याची माहिती मिळाली. माह...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी आवश्यक असलेल्या चांदा फोर्ट–चिचपल्ली रेल्वे मार्गावरील वन्यजीव कॉरिडॉरच्या संवर्धनासाठी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीच्या वतीने ४ ऑक्टोबर रोजी १५ किलोमीटरची वॉक फॉर वाइल्डलाइफ कॉरिडॉर पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. चांदा फोर्ट ते चिचपल्ली या मार्गावर होणाऱ्या या पदयात्रेतून वन्यजीव कॉरिडॉर वाचवा, वन्यजीवांचे संरक्षण करा हा संदेश देण्यात येणार आहे.हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीकडून २०१७ पासून गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ चांदा फोर्ट–चिचपल्ली रेल्वे मार्गावर सातत्याने देखरेख केली जात आहे. या काळात वन्यजीवांची रेल्वे मार्गावरील हालचाल, रेल्वेच्या धडकेत होणारे वन्यजीवांचे मृत्यू तसेच कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून वन्यजीवांच्या हालचालींचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.चांदा फोर्ट–चिचपल्ली रेल्वे कॉरिडॉर हा महत्त्वाच्या...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : आपत्ती कोणत्याही क्षणी उद्भवू शकते. अशा परिस्थितीत घाबरून न जाता प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेणे आणि स्वतःसह इतरांचे संरक्षण करणे आवश्यक आहे, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. नॅशनल मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे ३ ऑक्टोबर रोजी आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.वया कार्यक्रमात गुंजन राम यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगत नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. भूकंप, आग, पूर, अपघात यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे तसेच इतरांचे संरक्षण कसे करावे, संकटाच्या वेळी कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि मदत मिळेपर्यंत परिस्थितीचा सामना कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना माह...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहर महिला काँग्रेस कमिटी, बल्लारपूरच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्म प्रार्थना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विविध धर्मांच्या प्रार्थनांच्या माध्यमातून एकता, बंधुभाव, शांतता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देत दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष ॲड. कुंदा जेनेकर, बल्लारपूरच्या नगराध्यक्षा अल्का वाढई, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अफसाना सय्यद, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्ष ॲड. मेघा भाले तसेच बबीता मोटिवेशन ग्रुपच्या बबीता बहुरिया प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण केले.महात्मा गांधी यांनी सत्...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषद बल्लारपूरच्या वतीने स्वच्छता ही सेवा २०२६ आणि सेवा संकल्प अभियान अंतर्गत २ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक बल्लाळशाह बाबा समाधी मंदिर परिसरात विशेष स्वच्छता श्रमदान कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी ७ वाजता आयोजित या उपक्रमात नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी, स्वच्छता दूत तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या श्रमदानादरम्यान मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. परिसरातील कचरा, प्लास्टिक तसेच इतर अस्वच्छता दूर करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला. गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छतेच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या संदेशाची जनजागृती करण्यात आली.बल्लाळशाह बाबा समाधी मंदिर हे बल्लारपूरच्या ऐतिहासिक वारशाच...