महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

१० ऑक्टोबर पर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करा : जिल्हाधिकारी वसुमना पंत बातम्या - Chandrapur

१० ऑक्टोबर पर्यंत नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करा : जिल्हाधिकारी वसुमना पंत


- पिण्याच्या पाण्याचे स्रोत राखीव ठेवण्याचे निर्देश; चारा, जलसंधारण व रोजगार हमीच्या कामांचे तातडीने नियोजन करण्याचे आदेशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर  : कमी पर्जन्यमान आणि पावसातील दीर्घ खंडामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. या तालुक्यांतील १ हजार ५७९ म्हणजेच १०० टक्के गावांमध्ये पीक नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ५० ते ६०टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, १० ऑक्टोबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळ निवारणाच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्याबाबत प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने काम करावे. या कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
KVR कंपनीत खंडणीचा दबाव : मॅनेजरला मारहाण करून ५० हजारांची मागणी, तिघे अटकेत बातम्या - Chandrapur

KVR कंपनीत खंडणीचा दबाव : मॅनेजरला मारहाण करून ५० हजारांची मागणी, तिघे अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कंपनी चालवायची असेल तर दरमहा ५० हजार रुपये द्या, पैसे दिले नाही तर जीवे मारू, अशा धमकीने वरवट येथील KVR कंपनीतील मॅनेजर हादरल्याची घटना समोर आली आहे. कंपनीत घुसून मॅनेजरला मारहाण करीत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अजय कुचनकर, सुमित रामटेके आणि पवन जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.७ ऑक्टोबर रोजी तिघे आरोपी KVR कंपनीत गेले. यावेळी त्यांनी कंपनीचे मॅनेजर साईप्रकाश गाजुला यांच्याकडे दरमहा ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांना मारहाण केल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), ३०८(५), ११५(२), ३३३ ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
स्वच्छता गृहाअभावी महिलांची कुचंबणा : बल्लारपूरच्या व्यापारी संकुलांत सुविधेची मागणी बातम्या - Chandrapur

स्वच्छता गृहाअभावी महिलांची कुचंबणा : बल्लारपूरच्या व्यापारी संकुलांत सुविधेची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शहरातील अनेक व्यापारी व व्यावसायिक संकुलांमध्ये स्वच्छतागृहांची पुरेशी व्यवस्था नसल्याने विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. कुठे स्वच्छतागृहच नाही, तर कुठे असलेली सुविधा अस्वच्छतेमुळे वापरण्यायोग्य राहिलेली नाही. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन शहरातील सर्व व्यापारी संकुलांमध्ये महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीने केली आहे.यासंदर्भात ७ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर नगर परिषदेला निवेदन देण्यात आले. बालाजी कॉम्प्लेक्स, व्यंकटेश एम्पायर, अर्जुना कॉम्प्लेक्स यांसह नगर प्रशासनाच्या माहितीत असलेल्या इतर व्यापारी संकुलांमध्ये येत्या पंधरा दिवसांत स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध कर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
इंजापूरच्या आश्रमशाळांमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ जनजागृती बातम्या - Chandrapur

इंजापूरच्या आश्रमशाळांमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील इंजापूर येथील वनिता प्राथमिक आश्रमशाळा आणि स्व. भाऊराव चटप आश्रमशाळेत ६ ऑक्टोबर रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला २०० हून अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या आदेशानुसार तसेच परीक्षा अधिकारी आतिश कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महिला व बालकांच्या संरक्षणाशी संबंधित विविध कायदे, हक्क आणि उपलब्ध शासकीय सुविधांची माहिती देण्यात आली.सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी खडसे यांनी सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्याची माहिती देताना पोक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाढत्या वयात मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याविषय...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
लोकशाहीच्या रक्षणासाठी चंद्रपुरात काँग्रेसचे जन आंदोलन बातम्या - Chandrapur

लोकशाहीच्या रक्षणासाठी चंद्रपुरात काँग्रेसचे जन आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासह मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि संविधानिक मूल्यांच्या संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार लोकतंत्र बचाओ सप्ताह अंतर्गत वोट बचाओ–देश बचाओ या घोषवाक्याखाली चंद्रपुरात काँग्रेसच्या वतीने जनआंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता गांधी चौक येथे हे आंदोलन होणार आहे.मतदारांच्या अधिकारांची जपणूक, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि संविधानिक व्यवस्थेच्या संवर्धनाचा मुद्दा या आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या विविध आघाड्या, सेल, विभाग तसेच जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत.या जनआंदोलनात प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, विविध फ्रंट...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अज्ञात वाहनाच्या धडकेत वेकोलि कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू : मित्र गंभीर जखमी बातम्या - Chandrapur

अज्ञात वाहनाच्या धडकेत वेकोलि कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू : मित्र गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : ड्युटी आटोपून मोटारसायकलने गावाकडे परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वेकोलि कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ७.५० वाजता रामपूर ते माथरा मार्गावरील फॉरेस्ट गेटजवळ घडला. सुधाकर सिताराम उलमाले ५६ वर्षे रा. चिंचोली खुर्द असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, रविंद्र संभाजी हिंगाने ५८ वर्षे हे गंभीर जखमी झाले आहेत.सुधाकर उलमाले हे वेकोलिच्या गोवरी डीप येथे कार्यरत होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मोटारसायकलने ड्युटीवर गेले होते. दिवसभराची ड्युटी आटोपल्यानंतर ते मित्र रविंद्र हिंगाने यांच्यासह मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ सीएस ४७६५ ने चिंचोलीकडे परतत होते. रामपूर ते माथरा मार्गावरील फॉरेस्ट गेटजवळ त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
अल निनोच्या सावटात चंद्रपूरच्या पाण्याचे नियोजन : १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात बातम्या - Chandrapur

अल निनोच्या सावटात चंद्रपूरच्या पाण्याचे नियोजन : १६ ऑक्टोबरपासून १० टक्के कपात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने आतापासूनच पाणी व्यवस्थापनाला वेग दिला आहे. उपलब्ध जलसाठा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पाणीगळती रोखणे, नळांना टोट्या बसविणे आणि औद्योगिक वापरासाठी पुनर्वापरित पाण्याचा वापर वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.चंद्रपूर शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी महानगरपालिकेत बुधवारी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. जलसंपदा विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीत शहराला उपलब्ध जलसाठा आणि भविष्यातील पाण्याची गरज यांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना कमीतकमी अडचणींचा सामना कराव...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकी साठी विशेष नैमित्तिक रजा बातम्या - Chandrapur

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकी साठी विशेष नैमित्तिक रजा


- खाजगी आस्थापनांतील मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलतविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदार म्हणून नोंदणी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद आहे. खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या नोंदणीकृत मतदारांना मतदानासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदानानंतर मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या २३ जून २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार, पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांस...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सेवानिवृत्ती वेतन धारकांसाठी महाउपलब्धी बाबत कार्यशाळा संपन्न बातम्या - Chandrapur

सेवानिवृत्ती वेतन धारकांसाठी महाउपलब्धी बाबत कार्यशाळा संपन्न


- ई-केवायसी, मोबाईल नोंदणी व पीपीओ क्रमांकाबाबत मार्गदर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना महाउपलब्धी प्रणालीचा सुलभपणे वापर करता यावा, यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित या कार्यशाळेत महाउपलब्धी प्रणालीचा वापर, आवश्यक माहितीची नोंदणी, निवृत्तीवेतन जमा होणाऱ्या बँक खात्याचे ई-केवायसी, मोबाईल क्रमांकाची नोंदणी तसेच पीपीओ क्रमांकासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.आगामी काही महिन्यांत निवृत्तीवेतनाची देयके ई-बिल प्रणालीद्वारे अदा करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी ज्या बँक खात्यात निवृत्तीवेतन जमा होते, त्या खात्याचे ई-केवायसी पूर्ण करणे आवश्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीस बंदी बातम्या - Chandrapur

जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीस बंदी


- जिल्हाधिकायांनी निर्गमित केले आदेश- दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध ठेवण्याचे नियेाजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊ नये, तसेच पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या हद्दीतून इतर जिल्ह्यांत अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक व विक्री करण्यास जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सक्त मनाई केली आहे. याबाबत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (बीएनएसएस) च्या कलम १६३ अन्वये आज ६ आदेश जारी करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये ट्रीगर १ (प्रथम कळ) दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच स...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →