महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

घरात घुसला, तरुणीला मारहाण करून बेडरूममध्ये डांबले : २४ तासांत आरोपी अटकेत बातम्या - Chandrapur

घरात घुसला, तरुणीला मारहाण करून बेडरूममध्ये डांबले : २४ तासांत आरोपी अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कॉलेजमधून घरी परतलेल्या तरुणीला घरात अनोळखी व्यक्ती दिसली आणि काही क्षणांतच तिच्यावर भीतीचे सावट पसरले. आरडाओरड केल्याने आरोपीने तिचा हात पकडून तिला बेडरूममध्ये ढकलून दिले. दुखापत झालेल्या तरुणीला बेडरूममध्ये बंद करून आरोपीने घरातील पाच हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. या धक्कादायक जबरी चोरीच्या घटनेचा वरोरा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत १९ वर्षीय आरोपीला अटक केली.३० सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास फिर्यादीची मुलगी कॉलेजमधून घरी परतली. घराच्या वॉलकंपाउंडचे गेट बंद असतानाही घराचा दरवाजा उघडा असल्याचे तिला दिसले. संशय आल्याने ती घरात गेली असता बेडरूमच्या दरवाजाजवळ तोंडाला दुपट्टा बांधलेला अनोळखी इसम उभा असल्याचे तिच्या निदर्शनास आले. अचानक समोर आलेल्या व्यक्तीला पाहून घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली.तिच्या आरडाओरडीन...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
७ ऑक्टोबर रोजी महसूल लोक अदालतीचे आयोजन बातम्या - Chandrapur

७ ऑक्टोबर रोजी महसूल लोक अदालतीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली महसुली व अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोडीने व सहमतीने त्वरीत निकाली काढण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत’ अभियान संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनातसुध्दा चंद्रपूर जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, अपर तहसीलदार आणि मंडळ स्तरावर ७ ऑक्टो २०२६ रोजी ‘महसूल लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.अशी राहील प्रक्रिया : १) सुनावणीचे वेळी तडजोड योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे, लोक अदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रलंबित दाव्यांवर अंतिम आदेश पारीत करून प्रकरण कायमस्वरुपी निकाली काढण्यात येईल २) महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान मध्ये प्रलं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वृध्दांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी पोहचले वृध्दाश्रमात बातम्या - Chandrapur

वृध्दांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी पोहचले वृध्दाश्रमात


- सेवा संकल्प अभियानांतर्गत डेबू सावली वृद्धाश्रमाला भेटविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डेबू सावली वृद्धाश्रमाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी वृद्धांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, तहसीलदार विजय पवार आणि तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांनी गुरुवारी १ वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या दैनंदिन अडचणी, आरोग्यविषयक गरजा तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभाबाबत माहिती घेतली.ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. वृद्धाश्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन बातम्या - Chandrapur

विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर :  सेवा संकल्प कार्यक्रमाअंतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा योजना तसेच पाणी गुणवत्तेबाबत माहिती व्हावी, या उद्देशाने ऊर्जानगर येथील नॅशनल गर्ल्स हायस्कूल, राजीव गांधी विघालय वरवट, इंदिरा गांधी विघालयल पडोली येथे  इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना पाणी गुणवत्ता तपासणीबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, चंद्रपूर येथे भेट देऊन गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी कशी केली जाते, याची प्रत्यक्ष माहिती घेतली. पाण्याचे नमुने घेण्याची पद्धत, पाण्यातील विविध घटकांची तपासणी तसेच सुरक्षित व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे महत्त्व याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. एफटीके कीट ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात बातम्या - Chandrapur

वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सत्य, अहिंसा, साधेपणा आणि देशभक्तीचा संदेश देत वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्याप्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून दोन्ही राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांना उजाळा दिला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक हेमंत मानकर, संस्थापिका रझिया खान, प्राचार्य विजय शिंदे, व्यवस्थापन समितीच्या सदस्या फरजाना शेख व शबिस्ता सय्यद यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी मह...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दुष्काळी परिस्थितीत ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी बातम्या - Chandrapur

दुष्काळी परिस्थितीत ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी


- अपर जिल्हाधिका-यांसह अधिका-यांच्या देवाडा व नागाळा येथे क्षेत्रभेटीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे त्वरीत करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहे. याच अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी चंद्रपूर तालुक्यातील देवाडा व नागाळा गावांना भेट देऊन ई-पीक पाहणीसह नुकसानग्रस्त पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी क्षेत्रीय स्तरावर सुरू असलेल्या पीक पंचनाम्याच्या कामाचाही आढावा घेतला.शेतपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थिती अचूकपणे नोंदवून पीक पंचनामे तसेच ई-पीक पाहणीचे काम तातडीने आणि प्राधान्याने पूर्ण करावे. शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष आणि वस्तुनिष्ठ नोंद होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कृषी, महसूल आणि ग्राम प्रशासन विभागाच्या क्षेत्रीय यंत्रण...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
एसआयआर मोहीम : दावे व हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ बातम्या - Chandrapur

एसआयआर मोहीम : दावे व हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ


- नोटीस मिळालेल्या मतदारांना तहसील कार्यालयात येण्याची गरज नाही- मतदान केंद्रे, महाविद्यालये, उद्योग व विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर)-२०२६ अंतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी आता १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच ‘नो मॅपिंग’ अथवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस मिळालेल्या मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसून, संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे संकलित करणार आहेत.मतदार यादीतील जुळवणी न झालेल्या अथवा तार्किक विसंगती असलेल्या मतदारांना नोटीस प्राप्त झाली असल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) अथवा तहसील कार्यालयात...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कळमना शाळेत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा बातम्या - Chandrapur

कळमना शाळेत ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक बंडू मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख किरण कामडी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी कोवे उपस्थित होत्या. मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांनी कार्यक्रमात सहभागी होत आपल्या जीवनातील विविध अनुभव आणि आठवणी विद्यार्थ्यांसमोर मनोगतातून व्यक्त केल्या.यावेळी काही ज्येष्ठ नागरिकांनी गाणी सादर केली. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमात आनंदाचे आणि ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेताच्या कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहाने महिलेचा मृत्यू : शेतमालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा बातम्या - Chandrapur

शेताच्या कुंपणात सोडलेल्या वीजप्रवाहाने महिलेचा मृत्यू : शेतमालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या धुऱ्यावर उभारलेल्या तारांच्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने एका महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची गंभीर घटना चिमूर तालुक्यातील गरडापार येथे २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणाच्या चौकशीत शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शेतमालक भास्कर शित्रुक दडमल (वय ५०), रा. गरडापार, ता. चिमूर याच्याविरुद्ध चिमूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.संगीता संतोष दडमल (वय ४३) या २५ सप्टेंबर रोजी पती व मुलासोबत शेतात गेल्या होत्या. सायंकाळी त्यांचा मुलगा संचित दडमल प्रकृती अस्वस्थ असल्याने घरी परतला. त्यानंतर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वडील संतोष दडमल हे घरी परतले. मात्र संगीता घरी न आल्याने संचित व संतोष यां...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चिमूर तालुक्यातील बालसंगोपन लाभार्थ्यांसाठी विशेष बैठक बातम्या - Chandrapur

चिमूर तालुक्यातील बालसंगोपन लाभार्थ्यांसाठी विशेष बैठक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १ ऑक्टोबर रोजी बालकल्याण समिती, चंद्रपूर तर्फे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत बालकांना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच बालकांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायदे व सुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.बैठकीला बालकल्याण समितीच्या सदस्या डॉ. ज्योत्स्ना मोहितकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सोनाली ताजणे आणि अजय कवाडे उपस्थित होते. यावेळी बालसंगोपन योजनेचा उद्देश, योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, पात्रता तसेच योजनेची कार्यपद्धती याबाबत लाभार्थी बालकांना मार्गदर्शन करण्यात आले.बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अनाथ प्रमाणपत्राचे महत्त्व व ते मिळविण्याची प्रक्रिया याबाबतही माहिती देण्यात आली. तसेच चाइल्ड हेल्पलाइन, महिला हेल्पलाइन यांसह बालकांना अडचणीच्या ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →