महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

चोरी करून गुजरातमध्ये पळाला : सहा महिन्यांनी माजरीत परतताच पोलिसांच्या जाळ्यात बातम्या - Chandrapur

चोरी करून गुजरातमध्ये पळाला : सहा महिन्यांनी माजरीत परतताच पोलिसांच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रकची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांच्या हातातून निसटलेला आरोपी तब्बल सहा महिने गुजरातमध्ये लपून बसला. मात्र, पोलिसांची नजर चुकवून तो पुन्हा माजरीत परतताच माजरी पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला अखेर जेरबंद केले. शौर्या राजकुमार केवट २१ वर्ष , रा. सिद्धार्थ वार्ड, माजरी कॉलरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.२० मार्च २०२६ रोजी रात्री माजरी कॉलरी येथील सब एरिया कार्यालयासमोरील खुल्या जागेत एमएच ४० ए.के. ४५९६ क्रमांकाचा ट्रक उभा करण्यात आला होता. चालक ट्रक उभा करून घरी गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत ट्रकची बॅटरी चोरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान नागरिकांना संशय आल्याने त्यांनी चोरट्यांचा पाठलाग करून किसन कुमार रामस्वरूप निषाद याला पकडले. मात्र, त्याचा साथीदार शौर्या केवट घटनास्थळावरून पस...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनासह ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार : जिल्हाधिकारी वसुमना पंत बातम्या - Chandrapur

स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवडीतून पर्यावरण संवर्धनासह ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढणार : जिल्हाधिकारी वसुमना पंत


- सिंदेवाही येथे जिल्हास्तरीय प्रात्यक्षिकाचा शुभारंभ- पहिल्या टप्प्यात १०० ग्रामपंचायतींमध्ये स्वस्तिक पॅटर्न व केशर आंबा लागवडविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वस्तिक पॅटर्न वृक्षलागवडीमुळे कमी जागेत अधिक झाडांची लागवड करून पाण्याची बचत, हरित क्षेत्रात वाढ आणि पर्यावरण संवर्धन साधता येणार आहे. त्यासोबतच केशर आंबा फळबागांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना भविष्यात स्वतःचे उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (व्ही -बी -जी राम-जी),  ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व विविध योजनांच्या अभिसरणातून सिंदेवाही येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात २५ सप्टेंबर रोजी स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  यावेळी त्या बोलत होत्या. ए. एस. नाथन (ऑक्सिजन मॅन) यांच्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
माजासाठी गेले अन् घरात चोरी : सास्तीत सोन्याचे दागिने लंपास बातम्या - Chandrapur

माजासाठी गेले अन् घरात चोरी : सास्तीत सोन्याचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा प्रतिनिधी : कुटुंबीय नमाज पठणासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे दार उघडून बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून सुमारे २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी राजुरा तालुक्यातील सास्ती वस्ती परिसरात घडली.ईजाज सुल्तान शेख ५६ वर्ष  रा. सचिन हॉटेलजवळ, सास्ती वस्ती, ता. राजुरा, हे टायर पंचर दुरुस्तीचे काम करतात. दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास शेख हे मुलासोबत घराला बाहेरून दार ओढून नमाज पठणासाठी राजुरा येथील जामा मशिदीत गेले. नमाज पठण करून ते दुपारी सुमारे २ वाजता मुलासह घरी परतले. त्यावेळी घराचे समोरील दार उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाची दोन्ही दारे उघडी असल्याचे तसेच कपाटातील लॉकरही उघडे असल्याचे दिसून आले.कपाटाची...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
रेल्वेच्या धडकेत चितळाचा मृत्यू : नागभीड-चंद्रपूर रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा बातम्या - Chandrapur

रेल्वेच्या धडकेत चितळाचा मृत्यू : नागभीड-चंद्रपूर रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रह्मपुरी वन विभागातील तळोधी वनपरिक्षेत्राच्या आलेवाही बीटमधील कक्ष क्रमांक ९४ येथे रेल्वेच्या धडकेत पाच वर्षीय नर चितळाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागभीड-चंद्रपूर रेल्वेमार्गावरून होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्यूचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.रेल्वे विभागाकडून वन विभागाला माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक अरविंद मने, वनरक्षक तोरले, वन्यजीव अभ्यासक तथा स्वॅब संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर आणि बचाव पथक प्रमुख जीवेश सय्याम यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.त्यानंतर मृत चितळाला सावरगाव वन डेपो येथे आणण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ईशा आकरे यांनी त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर वन विभागाच्या नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे, अवघ्या...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
सांस्कृतिक गणेशोत्सवात कलाविष्कारांची उधळण बातम्या - Chandrapur

सांस्कृतिक गणेशोत्सवात कलाविष्कारांची उधळण


- प्रियदर्शिनी सभागृह येथे जिल्हा प्रशासनाचे आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी  सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित गणेशोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम  मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात विविध कलाकारांनी आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.सात वर्षीय कृष्णा गादेवार याने गणरायाचा गजर गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर पुरुष आणि स्त्री यांचा एकत्रित आवाज काढत देवदत्त सातपुते यांनी आपल्या गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. हितांशी भालेकर या विद्यार्थिनीने नृत्य सादर केले तर विजेंद्र टेंभुर्डे आणि त्यांच्या कलाकारांनी कथ्थक चे सादरीकरण केले. विद्यानिकेतन स्कूलचे किरण गीते व सहकाऱ्यांनी समूह नृत्य,...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आपले गाव नियमित स्वच्छ ठेवा : ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी बातम्या - Chandrapur

आपले गाव नियमित स्वच्छ ठेवा : ग्रामस्थांची सामूहिक जबाबदारी


- गावस्तरावर कचऱ्याचे चार भागांत वर्गीकरण करण्याचे श्रीकांत बोबडे यांचे आवाहन विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून कोरपना तालुक्यातील नांदा येथे ग्रामपंचायत सभागृहात स्वच्छता व घनकचरा-सांडपाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनपर सभा घेण्यात आली.यावेळी मार्गदर्शन करताना कोरपना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे म्हणाले की, गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर सांडपाणी व घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. गाव नियमित आणि शाश्वत स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ ग्रामपंचायतीची नसून प्रत्येक ग्रामस्थाची आहे. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव स्वच्छ ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.पिरामल फा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नमाजासाठी गेले अन् घरात चोरी : सास्तीत सोन्याचे दागिने लंपास बातम्या - Chandrapur

नमाजासाठी गेले अन् घरात चोरी : सास्तीत सोन्याचे दागिने लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबीय नमाज पठणासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचे दार उघडून बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधून सुमारे २० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी दुपारी राजुरा तालुक्यातील सास्ती वस्ती परिसरात घडली.ईजाज सुल्तान शेख ५६ वर्षे, रा. सचिन हॉटेलजवळ, सास्ती वस्ती, ता. राजुरा, हे टायर पंचर दुरुस्तीचे काम करतात. दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास शेख हे मुलासोबत घराला बाहेरून दार ओढून नमाज पठणासाठी राजुरा येथील जामा मशिदीत गेले.नमाज पठण करून ते दुपारी सुमारे २ वाजता मुलासह घरी परतले. त्यावेळी घराचे समोरील दार उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाची दोन्ही दारे उघडी असल्याचे तसेच कपाटातील लॉकरही उघडे असल्याचे दिसून आले.कपाटाची पाहणी केली असता त्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ब्रम्हपुरीत कारमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक : दोघे ताब्यात, ४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त बातम्या - Chandrapur

ब्रम्हपुरीत कारमधून विदेशी दारूची अवैध वाहतूक : दोघे ताब्यात, ४.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी ते मालडोंगरी मार्गावर नाकाबंदी करून पोलिसांनी मारुती रिट्झ कारमधून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत १ लाख २९ हजार ६०० रुपये किमतीच्या १८० मिली क्षमतेच्या ४८० सीलबंद दारूच्या बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन लाख रुपये किमतीची कार असा एकूण ४ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी १२.२० वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी ते मालडोंगरी जाणाऱ्या मार्गावर, ब्रम्हपुरीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर करण्यात आली.ब्रम्हपुरी पोलिस ठाण्याचे पथक अवैध दारू, जुगार व इतर अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. ब्रम्हपुरी येथून मालडोंगरीकडे एका मारुती रिट्झ कारमधून दोन व्यक...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
एलसीबी पोलिसांच्या सतर्कतेने गणेश विसर्जनातील विघ्न टळले : सुरी, फायटरसह तरुण ताब्यात बातम्या - Chandrapur

एलसीबी पोलिसांच्या सतर्कतेने गणेश विसर्जनातील विघ्न टळले : सुरी, फायटरसह तरुण ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित घटना टळली. गोलबाजार परिसरात धारदार हत्यारे घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला एलसीबी पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून लोखंडी सुरी आणि फायटर जप्त केला.आर्यन किशोर पचारे १९ वर्षे रा. जलनगर वॉर्ड, चंद्रपूर असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. २५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने एलसीबीचे पथक शहरात बंदोबस्त व पेट्रोलिंग करीत असताना गोलबाजार परिसरात एक इसम धारदार हत्यार बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.माहितीची खात्री करून पथकाने कारवाई करीत आर्यन पचारे याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे अंदाजे २०० रुपये किमतीची लोखंडी सुरी आणि २०० रुपये किमतीचा लोखंड...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कोडशी बु. येथे ६ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा बातम्या - Chandrapur

कोडशी बु. येथे ६ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा


- सरपंचांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर अनुसमर्थन घेण्यासाठी आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील मौजा कोडशी बु. ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश गजानन कोल्हे यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या व  २२ सप्टेंबर २०२६ रोजी तीन-चतुर्थांश मताने संमत झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय, कोडशी बु. येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी, यांच्या २३ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी, कोरपना यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा होणार असून, अविश्वास प्रस्तावावर ग्रामसभा सदस्यांचे अनुसमर्थन घेणे, हा या सभेचा एकमेव विषय राहणार आहे. विशेष ग्रामसभेसाठी प्रचलित नियमानुसार आवश्यक गणपूर्ती असणे बंधनकारक राहील.ग्रामसभेत उपस्थित सदस्यांची अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →