चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूसुरक्षा रक्षक पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी १२ ऑक्टोबर पासूनर व गडचिरोली जिल्ह्याकरिता ३९६ सुरक्षा रक्षकांचा समुच्चय (पूल) तयार करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी १२ ऑक्टोबर २०२६ पासून कामगार कल्याण मंडळ, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे.उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत, ओळखपत्र (आधारकार्ड/पॅनकार्ड/ड्रायव्हिंग लायन्सन/मतदान कार्ड/पारपत्र) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा तसेच विशेष अर्हतेची प्रमाणपत्रे (असल्यास) यांची मूळ कागदपत्रे व प्रत्येकी एक स्वप्रमाणित छायांकित प्रत सोबत आणावी. उमेदवारांनी मंडळामार्फत निश्चित करण्यात आलेल्या, दिनांक व वेळेस अनिवार्यपणे उपस्थित राहावे. अनुपस्थित ...
बातम्या -
Chandrapur
- हरकती असल्यास ७ ऑक्टोपूर्वी दाखल करण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नियोजीत सक्षमता महिला सेवा सहकारी संस्था, मर्या. चंद्रपूर या सहकारी संस्थेचा नोंदणी प्रस्ताव सहायक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयास प्राप्त झाला आहे. संस्थेच्या नोंदणी संबंधाने काही हरकती असल्यास या कार्यालयात ७ ऑक्टोबर पूर्वी सादर कराव्यात किंवा सुनावणीचे वेळी हरकती असल्यास दाखल कराव्यात.या कार्यालयात विहित मुदतीत हरकती प्राप्त न झाल्यास किंवा सुनावणीला हजर न राहिल्यास संबंधीत सहकारी संस्थांना नोंदणी संबंधाने काही म्हणावयाचे नाही, असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची चंद्रपूर तालुक्यातील बेरोजगार, सुशिक्षीत बेरोजगार, महिला बहुउद्देशिय व इतर बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी नोंद घ्यावी, असे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था एस.एस.तुपट यांनी कळविले आहे.
बातम्या -
Chandrapur
- जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे निर्देशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक, विक्री व साठवणूक होणार नाही, यासाठी पोलिस विभागाने अधिक दक्ष राहून कठोर कारवाई करावी. तसेच अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले.अमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी उपस्थित होते. पुढे जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती करावी. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थांची विक्री अथवा सेवन होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थांनी तत्काळ ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत सफाईमित्रांच्या आरोग्याची काळजी, सुरक्षिततेला प्राधान्य आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी तालुका पातळीवर सफाईमित्र सुरक्षा सेवा आणि सन्मान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.सफाईमित्र हे स्वच्छ आणि निरोगी समाजाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या कामाच्या ठिकाणी निर्माण होणारे धोके लक्षात घेता त्यांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देणे, त्यांचा योग्य वापर करण्याबाबत मार्गदर्शन करणे तसेच नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या शिबिरामध्ये सफाईमित्रांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, आवश्यक लसीकरण, आजार प्रतिबंध व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्य...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना शिरसागर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळा घेण्यात आली.प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीना साळुंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, कार्यकारी अभियंता संदीप खांबाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रनाथ धस, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. स्नेहल कासारे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. लक्षदीप पारेकर, सहाय्यक संचालक डॉ. संदिप गेडाम, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले तसेच विभागीय समन्वयक सविता गजभिये व रजनी गजभिये आदी उपस्थित ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : उपविभागीय अधिकारी, वरोरा यांच्या आदेशानुसार पोलिस स्टेशन वरोरा येथील अपघातातील तसेच बेवारस स्थितीत असलेल्या २८ दुचाकी वाहनांचा ५ ऑक्टोबर २०२६रोजी लिलाव करण्यात येणार आहे. लिलावधारकांनी आपले लायसन्स व २० हजार रुपये अनामत रक्कमेसह सदर दिवशी सकाळी ११ वाजता पोलिस स्टेशनला हजर राहावे, असे पोलिस निरीक्षक वरोरा यांनी कळविले आहे.
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना गावपातळीवरच सर्वकष आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मासळ (ता. चिमूर) येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या डॉ. मिना मडावी यांच्या नियोजनातून हे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणात ५७ प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला.ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य व कार्यक्षमता वाढविणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. गावपातळीवरच अधिकाधिक आजारांचे निदान व उपचार करून अनावश्यक संदर्भीकरण टाळण्यासाठी अधिक सेवा, कमी संदर्भ या संकल्पनेवर काम करण्यावर भर देण्यात आला.प्रशिक्षणात १३ प...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाच्या या पार्श्वभुमीवर विविध उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (२९) विविध विभागांची आढावा बैठक घेऊन निर्देश दिले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह उपस्थित होते.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागासाठी विशेष बाब म्हणून १२ प्रकारच्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जमीन महसुलात सुट अंतर्गत प्रत्येक तालुकानिहाय किती सूट द्यायची आहे, ते त्वरीत कळवावे. पीक कर्जाचे पुनर्गठन अंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले, किती शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली, किती जणांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे आवश्यक आहे, त्याबाबतची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी त्वरीत...
बातम्या -
Chandrapur
- दीड वर्षांपूर्वी हृदयात छिद्र आढळलेल्या चिमुकलीवर मुंबईत दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया; आरोग्य शिबिरात नियमित तपासणीदरम्यान आमदारांची घेतली भेटविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दीड वर्षांपूर्वी अवघ्या एका दिवसाची असताना आरोग्य शिबिरात तपासणीसाठी आलेल्या ओवी अडबाले या चिमुकलीच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. या गंभीर आजाराची माहिती समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. मात्र, तिच्या उपचारासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत कुटुंबाला आधार दिला. मुंबई येथील ज्युपिटर रुग्णालयात ओवीवर दोन वेळा निःशुल्क शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर आता ओवी पूर्णतः निरोगी झाली असून, तिचे निरागस हास्य पाहून आमदार जोरगेवार भावूक झाले.दीड वर्षांपूर्वी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात ओवी आपल्या आई-वडिलांस...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव, दांडिया, दसरा तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात लेझर लाईट, डीजे आणि तीव्र ध्वनिक्षेपकांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, कायदा व नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३६ व ३८(१) अन्वये विशेष निर्बंध व मनाई आदेश जारी केले आहेत.हे आदेश २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन होणार असल्याने उत्सव मंडळे, आयोजक तसेच नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट, अत्यंत तीव्र फ्लॅश लाईट तसेच म...