कोरची : देऊळभट्टी येथे पतीने केली पत्नीची हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची :
तालुका मुख्यालयापासून अंदाजे ३५ कि. मी. अंतरावर पोलिस मदत केंद्र कोटगुल अंतर्गत येत असलेल्या देऊळभट्टी येथे आज ५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ - ८.३० वाजताच्या दरम्यान पतीने पत्नीची लोखंडी सळाखाने हत्या केली. मंगेश्वरी त्रिपुरारी बंजारे (३०) असे मृतक पत्नीचे नाव असून त्रिपुरारी बंजारे  (३५) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. 
प्राप्त माहितीनुसार, आरोपी त्रिपुरारी बंजारे हा छत्तीसगढ़ येथील राजनांदगांव जिल्यातील करमतरा येथील रहिवासी आहे. सदर व्यक्ति हा मानसिक दृष्टया कमजोर असल्यामुळे मुलीच्या वडलाने आपल्या मुलीला व आपल्या जावयाला आपल्या गावी हवाबदल होईल या कारनाने स्वगावी देऊळभट्टी येथे बोलविले होते. दरम्यान आज ५ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ८ - ८: ३० वाजताच्या दरम्यान पत्नी मंगेश्वरी त्रिपुरारी बंजारे (३०) हि जेवन करत असतांना आरोपी त्रिपुरारी याने लोखंडी सरीयाने मारले असता मंगेश्वरी ही कोसडून खाली पडली. तीला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथे दाखल करून ग्रामीण रुग्णालय कोरची येथे रेफर करण्यात आले. दरम्यान डॉ. विटनकर यांनी तिला मृत घोषित केले व शवविच्छेदन करण्यात आले. मंगेश्वरीला ५ वर्षाचा मुलगा व ३ वर्षाची मुलगी आहे. पुढील तपास पोलिस मदत केंद्र कोटगुल येथील पोलिस उपनिरीक्षक शिवाल करीत असून प्राथमिक तपास कोरची पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी विनोद गोडबोले करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-05
Related Photos