महत्वाच्या बातम्या

 घराचा आडोसा घेत दारूचा काळाबाजार : एलसीबीची धडक, ४३ हजारांचा साठा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : घराच्या उंबरठ्याआड नेमके काय सुरू आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती. बाहेरून सामान्य दिसणाऱ्या घरात देशी दारूचा मोठा साठा करून त्याची अवैध विक्री सुरू असल्याचा प्रकार वरोरा तालुक्यातील चारगाव (बु.) येथे उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे संबंधित घरावर छापा टाकत दारूच्या ९ पेट्या जप्त केल्या. या साठ्याची किंमत ४३ हजार २५० रुपये असून, घरालाच अवैध दारू विक्रीचा अड्डा बनविण्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

१९ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेगाव बु. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना चारगाव (बु.) येथील एका महिलेच्या घरात देशी दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी घरावर छापा टाकला. घराची तपासणी केली असता देशी दारूच्या ९ पेट्या आढळल्या. त्यामध्ये ९० एमएलच्या एकूण ८६५ शिश्या होत्या. पोलिसांनी ४३ हजार २५० रुपये किमतीचा हा संपूर्ण साठा जप्त केला.

या प्रकरणी मनिषा नितेश देठे ३० वर्ष , रा. चारगाव (बु.), ता. वरोरा, जि. चंद्रपूर हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये शेगाव बु. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार नितीन कुरेकर, सचिन गुरनुले, प्रमोद कोटनाके आणि पोलीस शिपाई अमोल सावे यांनी केले.





  Print






Related Photos