CPI च्या मागणीला यश : गुरूपल्लीतील ५ महिन्यांपासून बंद हातपंप सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : ग्रामपंचायत गुरूपल्ली अंतर्गत गुरूपल्ली गावातील प्रकाश इष्टाम यांच्या घरासमोरील मागील अंदाजे पाच महिन्यांपासून बंद असलेला हातपंप भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI), गडचिरोली जिल्हा समितीच्या मागणीनंतर त्वरित दुरुस्त करण्यात आला. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करणाऱ्या गावातील सुमारे १० कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
सदर हातपंप बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते.विशेषतः महिला, तरुण मुली आणि लहान मुलांना पाणी आणण्यासाठी मुख्य डांबरी रस्ता ओलांडावा लागत होता. या रस्त्यावर ट्रक व इतर वाहनांची सतत वर्दळ असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.
या समस्येमुळे त्रस्त झालेल्या गुरूपल्ली गावातील नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) कडे मदतीची मागणी केली. नागरिकांनी आपली अडचण CPI च्या पदाधिकाऱ्यांना सांगून हातपंप दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. त्यानंतर CPI, गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने पंचायत समिती एटापल्लीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन हातपंपाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली.
CPI ने नागरिकांचा हा प्रश्न प्रशासनासमोर मांडल्यानंतर हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे गुरूपल्लीतील नागरिकांचे पाच महिन्यांपासून अडलेले काम मार्गी लागले आणि सुमारे १० कुटुंबांना दिलासा मिळाला. कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले, पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. त्यासाठी नागरिकांना पाच महिने प्रतीक्षा करावी लागणे ही गंभीर बाब आहे.
गुरूपल्लीतील नागरिकांनी आपल्या समस्येसाठी CPI कडे मदत मागितली. त्यानंतर आम्ही प्रशासनाकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला. नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून गावातील समस्या सोडवण्यासाठी संघटितपणे पुढे आले पाहिजे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य किंवा इतर मूलभूत सुविधांबाबत कोणतीही समस्या असल्यास नागरिकांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) शी संपर्क साधावा. नागरिकांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी CPI नागरिकांच्या पाठीशी उभी आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने सार्वजनिक सुविधांची नियमित देखभाल करावी आणि नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करावे, अशी मागणी CPI च्या वतीने करण्यात आली.या प्रश्नासाठी कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव, कॉम्रेड सुरज जक्कुलवार, जिल्हा सदस्य, विलास मट्टामी तसेच गुरूपल्ली गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला.




Petrol Price




