महत्वाच्या बातम्या

 धानोरा तालुक्यातील खेळाडूंना मिळणार हक्काचे व्यासपीठ : तालुका क्रीडा संकुलाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते लोकार्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / धानोरा : येथील तालुका क्रीडा संकुलाचे लोकार्पण आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संकुलातील मुख्य प्रशासकीय इमारत, खो-खो मैदान, कबड्डी मैदान आणि व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.या क्रीडा सुविधांमुळे धानोरा तालुक्यातील स्थानिक खेळाडूंना सरावासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, त्यांच्या क्रीडा कौशल्याला अधिक वाव मिळणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करावी आणि तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळावी, या दृष्टीने हे संकुल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांतजी साळवे, ज्येष्ठ नेते विजयजी कुमरे, GDCC संचालक गजाननजी साळवे, भाजपा जिल्हा सचिव सारंगजी साळवे, भाजपा तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, नगरसेवक गटनेते संजयजी कुंडू, नगरसेवक मल्लिकजी बुधवानी, राकेशजी खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष सरफराज शेख, जमीरजी शेख, मुबारकजी सैय्यद, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष भुमालाताई परचाके, माजी पंचायत समिती सभापती अनुसयाताई कोरेटी, ताराबाई कोटांगले, नेत्राताई साळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीकांतजी यादव, अप्पर तहसीलदार वाडकेजी तसेच तालुका क्रीडा अधिकारी राठोडजी यांच्यासह पदाधिकारी, उपस्थित होते.





  Print






Related Photos