अमृत योजनेसंबंधी मनपाची तक्रार निवारण शिबीरे
- २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत १४ शिबीरे
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युवेनेशन अँण्ड अर्बन ट्रान्सफॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरात पाणी पुरवठ्याचे काम सुरु असुन याबाबत नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे तसेच योग्य ती कारवाई करण्यास मनपातर्फे ७ तक्रार निवारण पथके गठीत करण्यात आली आहे.
या पथकांद्वारे अमृत योजनेत नागरीकांना येणाऱ्या अडचणींची नोंद करून सोडविल्या जाणार आहेत. तसेच उर्वरित तक्रारी पाणीपुरवठा विभागास सादर केल्या जाणार आहे. अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी झोन बनविण्यात आले आहेत. प्रत्येक झोन अंतर्गत शिबीर घेण्यात येणार असुन नागरीकांनी या शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
News - Chandrapur