महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

अनधिकृत पाणी उपशाविरोधात होणार कठोर कारवाई बातम्या - Chandrapur

अनधिकृत पाणी उपशाविरोधात होणार कठोर कारवाई


- महसूल मंडळनिहाय भरारी पथके स्थापन करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, उपलब्ध पाणीसाठ्याचे संरक्षण करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. जलाशय, नदी, तलाव, कोल्हापुरी बंधारे, कालवे व इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत व नियोजनबाह्य पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल मंडळनिहाय भरारी पथके तात्काळ स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष वसुमना पंत यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जलस्रोतांमध...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
चंद्रपुरात राहत्या घरातून गांजाची विक्री : ६९ वर्षीय वृद्धाला अटक बातम्या - Chandrapur

चंद्रपुरात राहत्या घरातून गांजाची विक्री : ६९ वर्षीय वृद्धाला अटक


- शहर पोलिसांच्या डीबी पथकाची कारवाई; भिवापूर वॉर्डातील नुरानी मशिदीजवळ सापळा रचून गांजासदृश पदार्थ जप्तविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरात स्वतःच्या राहत्या घरातून गांजाची बेकायदेशीर विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (डीबी) कारवाई करत ६९ वर्षीय वृद्धाला अटक केली. पांडुरंग गंगाधर बानलवार  ६९ वर्षे रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी भिवापूर वॉर्डातील नुरानी मशिदीजवळ करण्यात आली. या कारवाईत एका प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आलेला गांजासदृश अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.गुप्त माहितीच्या आधारे सापळा -मिळालेल्या माहितीनुसार, शहर पोलिस ठाण्याचे डीबी पथक परिसरात गस्त घालत असताना भिवापूर वॉर्डातील नुरानी मशिदीजवळ राहणारा पांडुरंग बानलवार हा स्वतःच्या घरात गांजा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
वीज कंपन्यांच्या भविष्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज : एसईएच्या राज्य परिषदेत विचारमंथन बातम्या - Chandrapur

वीज कंपन्यांच्या भविष्यासाठी एकजुटीने काम करण्याची गरज : एसईएच्या राज्य परिषदेत विचारमंथन


विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील स्नेहबंध सभागृहात १० ऑक्टोबर रोजी सबऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन (एसईए – पीएन १०९२) च्या प्रथम निर्मिती राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कार्यरत अभियंत्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, भविष्यातील आव्हानांवर विचारमंथन आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेत या परिषदेची यशस्वी सांगता झाली.परिषदेच्या अध्यक्षस्थानी एसईएचे अध्यक्ष श्रीनिवास बोबडे होते. उपाध्यक्ष नारायण चकोर, सरचिटणीस संतोष खुमकर, संघटन सचिव अमोल भाकरे आणि निर्मिती समन्वयक ललित आल्हाट यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. अनिल काठोये प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अभियंत्यांचे आराध्य दैवत भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
श्री ज्ञानेश महाविद्यालयात माजी अध्यक्ष श्री. रामराव पाटील बोरकर यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन बातम्या - Chandrapur

श्री ज्ञानेश महाविद्यालयात माजी अध्यक्ष श्री. रामराव पाटील बोरकर यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन


विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालय, येथे भारतीय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय श्री. रामराव पाटील बोरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.श्री रामराव पाटील बोरकर यांनी अनेक वर्षे भारतीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. मनमिळावू, प्रेमळ आणि सहृदयी स्वभावाचे धनी असलेल्या बोरकर यांनी आपल्या कार्यातून अनेकांच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान निर्माण केले. त्यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची आठवण यावेळी कृतज्ञतापूर्वक करण्यात आली.या अभिवादन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एस. लंजे, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
कर्जाच्या ओझ्याखाली आणखी एका शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली बातम्या - Chandrapur

कर्जाच्या ओझ्याखाली आणखी एका शेतकऱ्याची जीवनयात्रा संपली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतात राबायचे, घाम गाळायचा, पिकाची काळजी घ्यायची आणि कष्टाच्या भरवशावर कुटुंबाचा संसार चालवायचा मात्र, या कष्टांना अपेक्षित उत्पन्नाची साथ मिळाली नाही आणि कर्जाचा डोंगर वाढत गेला, तर शेतकऱ्याने जगायचे तरी कसे? असाच काळजाला चटका लावणारा प्रसंग वरोरा तालुक्यातील आर्वी गावात घडला. कर्जाच्या विवंचनेत असलेल्या ६० वर्षीय शेतकरी विजय कान्होबा तिवाडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हरपला असून, गावावर शोककळा पसरली आहे.विजय तिवाडे यांच्याकडे पाच एकर कापसाची शेती होती. याच शेतीच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मात्र, शेतीतील अनिश्चित उत्पन्न, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाची परतफेड या आर्थिक आव्हानांनी त्यांच्यासमोर गंभीर अडचणी निर्माण केल्या होत्या. त्यांच्यावर सु...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदींचा हिशोब उपलब्ध बातम्या - Chandrapur

राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदींचा हिशोब उपलब्ध


- १४ हजार ६९४ मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नाही; पुनरीक्षण प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार सुरू असल्याचे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरणविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या नोंदींबाबत प्रशासनाकडे वर्गवारीनिहाय माहिती व आवश्यक अभिलेख उपलब्ध असून, १४ हजार ६९४ मतदारांचा हिशोब लागत नसल्याच्या वृत्तात तथ्य नाही, असे स्पष्टीकरण मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी दिले आहे. मतदार नोंदणी आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-२०२६) प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पारदर्शकपणे व नियमानुसार राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.राजुरा विधानसभा मतदारसंघातील मतदारांची पडताळणी, ईएफ (Enumeration Form) फॉर्मचे संकलन व डिजिटायझेशन, संशयास्पद मतदार नोंदणी अर्जांची छाननी तसेच मतदा...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
नवरात्र विसर्जनाच्या तारखांवरून मंडळांमध्ये संभ्रम : २२ व २४ ऑक्टोबरला परवानगी देण्याची मागणी बातम्या - Chandrapur

नवरात्र विसर्जनाच्या तारखांवरून मंडळांमध्ये संभ्रम : २२ व २४ ऑक्टोबरला परवानगी देण्याची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : नवरात्रोत्सव विसर्जनाच्या तारखांवरून सार्वजनिक मंडळांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, मंडळांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि भाविकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन २२ व २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुका काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दिवस वगळून इतर दोन दिवशी विसर्जनाची परवानगी देण्याची विनंती त्यांनी केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात नवरात्रोत्सव श्रद्धा आणि उत्साहात साजरा होत आहे. यंदा नवमी व दशमी तिथीला भाविकांचे उपवास असल्याने २१ ऑक्टोबर रोजी विसर्जन आणि महाप्रसादाचे आयोजन करणे अनेक मंडळांना शक्य नसल्याचे खासदार धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे बहुतांश सार्वजनिक नवरात्रोत्सव मंड...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
जुगार अड्ड्यावर मुल पोलिसांचा छापा : तीन जण ताब्यात, १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त बातम्या - Chandrapur

जुगार अड्ड्यावर मुल पोलिसांचा छापा : तीन जण ताब्यात, १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर :  मुल तालुक्यातील नवेगाव जंगल परिसरात कुकुडरांझीच्या झाडाखाली सुरू असलेल्या जुगारावर मुल पोलिसांनी छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ताशपत्ते आणि चार दुचाकी असा एकूण १ लाख ९२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी जंगलातील झुडपांचा फायदा घेऊन पसार झाले. ही कारवाई ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कुंभरे यांनी पोलीस पथकसह नवेगाव जंगल परिसरात छापा टाकला. यावेळी जुगार खेळणारे तीन जण पोलिसांना घटनास्थळी आढळून आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर काही जण घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये अजीमखा लैलापखा पठाण ४२ वर्षे मुनीमखा तलबखा पठाण ३४ वर्षे आणि इसाक अब्बास शेख ३५ वर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
- दुर्गंधी आणि माशांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त; नगरपरिषदेच्या कारवाईकडे लक्ष बातम्या - Chandrapur

- दुर्गंधी आणि माशांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त; नगरपरिषदेच्या कारवाईकडे लक्ष


- दुर्गंधी आणि माशांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त; नगरपरिषदेच्या कारवाईकडे लक्षविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात घरातील शिळे अन्न रस्त्याच्या कडेला किंवा घराबाहेर फेकण्याचे प्रकार पुन्हा वाढू लागले आहेत. गायी, बकऱ्या आदी प्राण्यांना खाण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या या अन्नामुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून, दुर्गंधी आणि माशांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी बल्लारपूर नगरपरिषदेने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शिळ्या अन्नामुळे परिसरात अस्वच्छता -शहरातील काही भागांत रात्रीचे उरलेले अन्न सकाळी घराबाहेर किंवा रस्त्याच्या कडेला टाकले जाते. हे अन्न खाण्यासाठी गायी, बकऱ्या आणि इतर प्राणी त्या ठिकाणी येतात. मात्र, प्राण्यांनी अन्न...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
डुक्कर पकडण्याच्या वादातून तरुणाला मारहाण : दुचाकीची चावी हिसकावली, जीवे मारण्याची धमकी बातम्या - Chandrapur

डुक्कर पकडण्याच्या वादातून तरुणाला मारहाण : दुचाकीची चावी हिसकावली, जीवे मारण्याची धमकी


विदर्भ नव एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : डुक्कर पकडून घेऊन जाण्यास विरोध केल्याने एका तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड परिसरातील सहारा पार्क येथे ११ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. यावेळी तरुणाच्या दुचाकीची चावी जबरदस्तीने हिसकावून घेतल्याप्रकरणी अनिल नेताजी लोणारे आणि मिमा दांडेकर या दोघांविरुद्ध वरोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.राहुल राजन नकये (वय ३५), रा. जिजामाताबाई वॉर्ड, एकार्जुना रोड, वरोरा हे सफाई कामगार म्हणून काम करतात. आपल्या उदरनिर्वाहासाठी सफाईचे काम करण्यासोबतच ते डुक्कर पालनही करतात. डुकरांच्या शेडकडे येऊन डुक्कर चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या कारणावरून त्यांचा अनिल लोणारे आणि भीमा दांडेकर यांच्याशी यापूर्वी वाद झाला होता.११ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या दरम्यान राहुल यांना त्यांच्या मित्राचा फो...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →