ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणासाठी : २३ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : मुबंई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सन २०२५- २०३० या कालावधीकरीता नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसह) राखून ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण निश्चितीबाबत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम २ अ च्या पोट नियम (१) व (२) आणि या विषयी ग्राम विकास विभाग, मुंबई यांचेकडील शासन अधिसूचना असाधारण क्र. ४३८ दिनांक १२ ऑगस्ट २०२६ अन्वये वर्धा जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये बदल न करता ५० टक्केच्या मर्यादेत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रवर्गाकरीता शासन राजपत्रातील अनुसूची-२ मध्ये नमूद केल्यानुसार सन २०२५- २०३० या कालावधीकरीता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करुन दिले आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा ग्राम पंचायत निवडणूक प्रभारी रमा जोशी यांनी कळविले आहे.




Petrol Price




