महत्वाच्या बातम्या

 गोंदियातील कॅफेमध्ये २५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


- शास्त्री वॉर्ड परिसरातील घटना; शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी २५ ऑक्टोबर दुपारी ३:३० ते ४ वाजताच्या दरम्यान घडली. आशिफ अल्ताफ खान २५ वर्षे, रा. नुरी चौक, गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया शहरातील त्रिशा हॉस्पिटलच्या मागील बाजूस शास्त्री वॉर्ड परिसरात हा कॅफे आहे. या कॅफेमधील राहत्या खोलीत आशिफ खान याने खिडकीला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेतला. रविवारी दुपारी ३:३० ते ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित प्रकरणाची पोलिसांकडून नोंद घेण्यात आली. याप्रकरणी दीपक लखनलाल चौधरी २५ वर्षे, रा. चरवाई, चांगुटोला, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येमागील कारण अस्पष्ट -
आशिफ खान याने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे हवालदार कुसराम करीत आहेत.





  Print






Related Photos