चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वस्त दरात इलेक्ट्रिक मोपेड देण्याचे आमिष दाखवून बुकिंग व डाऊन पेमेंटच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे उकळल्यानंतर वाहनांची डिलिव्हरी न देता आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नागभीड येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागभीड पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदारासह इतर ग्राहकांची एकूण २ लाख ६६ हजार ९१८ रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे.मौशी येथील शेतकरी सुरेश गजानन राऊत (वय ५०) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीनुसार, १२ जुलै २०२४ ते १२ मार्च २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करून नागभीड येथे इलेक्ट्रिक स्कुटी विक्रीच्या नावाखाली शोरूम व कार्यालय सुरू केले होते. अफरोज बशीरखान पठाण याने विक्रांत नंदकिशोर गजपुरे यांचे टिनशेड भाड्यान...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील गंज वॉर्ड परिसरात विना परवानगी डीजे वाजविणाऱ्या चालक व आयोजकांविरुद्ध चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह डीजेचे साहित्य असा एकूण ९ लाख ६६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १२ ऑक्टोबर रोजी पहाटे करण्यात आली.गंज वॉर्ड परिसरात विना परवानगी डीजे वाजविला जात असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी संबंधित चालक व आयोजकांविरुद्ध कारवाई केली. याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०२५/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम २२३, ३८ व १३६ नुसार १२ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे २.२३ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.या कारवाईत एमएच ३४ बीजी ०५१६ क्रमांकाचे बोलेरो पिकअप वाहन आणि डीजेचे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ९ लाख ६६ हजार रुपये आहे....
बातम्या -
Chandrapur
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६- पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ३४१० पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची तिसरी यादी प्राप्त झाली आहे. यात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३१२ तर राष्ट्रीयकृत बँकेच्या ३०९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.राज्य शासनाने राज्यातील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली असून, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ३४१० शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये ही योजना सुरू क...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महामार्ग पोलीस विभागात कार्यरत असलेले पोलीस अमलदार दिगंबर धोंडिबा गुन्हाले (वय ३८) यांचे मंगळवारी, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी कर्तव्यावर असताना झालेल्या अपघातात त्यांच्या छातीला अंतर्गत दुखापत झाली होती. त्यांच्यावर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या अकाली निधनाने पोलीस विभागासह जिवती तालुक्यातील शेणगाव परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी कर्तव्य बजावत असताना महामार्ग पोलीस विभागाच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात दिगंबर गुन्हाले यांच्या छातीला अंतर्गत मार लागला होता. त्यानंतर त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना हृदयविकाराचा...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : हायवे विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार दिगंबर गुणाले ३७ वर्ष यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात त्यांच्या छातीला गंभीर अंतर्गत दुखापत झाली होती. त्यांच्या निधनामुळे शेणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर रोजी कर्तव्यावर असताना हायवे विभागाच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात दिगंबर गुणाले यांच्या छातीला अंतर्गत दुखापत झाली होती. त्यांच्यावर चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज ते पुन्हा रुग्णालयात गेले असता त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.दिगंबर गुणाले हे दुर्गम जिवती तालुक्यातील शेणगाव येथील रहिवासी होते. अत्यंत सा...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील बुद्धनगर वॉर्ड परिसरात मध्यरात्री तलवार घेऊन फिरत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय तरुणाला बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. अनस मेहमूद खान (वय १८), रा. गौसिया मशीद परिसर, बुद्धनगर वॉर्ड, बल्लारपूर असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून अंदाजे ५०० रुपये किमतीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची गस्त घालत असताना गौसिया मशीद परिसरात एक तरुण धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयित तरुणाने हातातील शस्त्र बाजूला फेकून दिले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपले नाव अनस म...
बातम्या -
Chandrapur
- सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळांमध्ये नाटिकेचे सादरीकरणविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेले अमूल्य योगदान, त्यांचा संघर्ष, शौर्य आणि बलिदानाची प्रेरणादायी गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या वतीने भूमिपुत्रांचा एल्गार या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. सेवा संकल्प अभियानांतर्गत चंद्रपूर प्रकल्पातील तीन शासकीय आश्रमशाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.आदिवासी समाजाला गौरवशाली इतिहास आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी अन्याय व अत्याचाराविरुद्ध संघर्ष करीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. मात्र, त्यांच्या शौर्यगाथा आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध चंद्रपूर पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. गोवंश तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या टोळ्यांविरुद्ध अवघ्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. घुग्घुस आणि रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली असून, अवैध गोवंश वाहतुकीच्या टोळ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.घुग्घुस पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६९/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी ६५ गोवंशीय जनावरे, एमएच १८ बीजी ९४२५ क्रमांक...
बातम्या -
Chandrapur
- आसापूर ता. जिवती येथे आयोजन ; ३३८ जणांनी घेतला लाभविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या आसापूर (ता. जिवती) येथे महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्यासह जिल्हा शल्य चिकित्सक भास्कर सोनारकर, डॉ. विश्व मानव रुहानी केंद्राचे बोगावार, महाराष्ट्र राज्य स्त्री रोग संघटनेच्या डॉ. मनिषा घाटे, डॉ. कल्पना गुलवाडे, विभागीय नियंत्रक अशोक वाडिभस्मे आदी उपस्थित होते. आसापूर व लगतच्या गावांतील नागरिकांना आरोग्यविषयक सोयीसुविधा, ज्या नागरिकांकडे आधारकार्...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चंद्रपूर शहरातील पंचशील वार्डातील अनेक युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यात राहुल समुद् यांची चंद्रपूर उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली.युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव तथा आमदार वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे आणि चंद्रपूर जिल्हा विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत विजय सहारे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.पंचशील वार्डातील युवकांनी युवासेनेत प्रवेश केल्याने परिसरात संघटनेची ताकद वाढल्याचे चित्र आहे. युवकांच्य...