महत्वाच्या बातम्या

 पुढील नऊ महिने पाणी पुरेल असे नियोजन करा : जिल्हाधिकारी वान्मथी सी


-  वर्धा व सेलू तालुका पाणी टंचाई आढावा बैठक

-  अवैध नळजोडणी व मोटरपंप जप्तीचे निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : यावर्षी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सरासरी पर्जन्यमान बरेच कमी झाले आहे. भूगर्भ जलाशय पातळी देखील कमी आहे. सद्यस्थितीत खोल गेलेल्या पाणी पातळीचा विचार करुन पुढील नऊ महिने पिण्यासाठी व जनावरांसाठी पाणी पुरेल असे नियोजन करा आणि या आराखड्याचे काटेकोर नियोजन करा, अशा सुचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात वर्धा व सेलू तालुक्यातील पाणी टंचाईच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपविभागीय अधिकारी  कुश मोटवाणी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री बुरडे, तहसिलदार संदीप पुंडेकर, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या जलस्त्रोतातील पाण्याची उपलब्ध पाहून त्याप्रमाणे वितरणाचे नियोजन करावे. परिस्थितीनुसार एक दिवस आड किंवा त्याही पलीकडे पाणी सोडण्याचे टप्प्याने नियोजन करावे. नागरीकांमध्ये पाणी बचतीची  सवय लागावी व काटकसरीने पाण्याचा वापर व्हावा यासाठी पाणी वाटप नियोजनासोबतच पाणी वापराबाबत जनजागृती करण्याच्या सूचना देखील दिल्या. तर अवैध नळ जोडणी, पाणी उपसा साहित्याची जप्ती

घरगुती पाणी वापर करतांना बरेच नागरिक नळावर मोटर पंप लावून पाण्याचा वापर करीत असतात. तसेच नदीपात्रातून शेतकरी अवैध पाणी वापर करतात अशा नागरिकांवर तात्काळ कारवाई करुन अहवाल सादर करावा. वेळप्रसंगी वापरण्यात येत असलेले उपसासंच, मोटरपंप जप्त करण्याची कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जिल्ह्यातील चारा इतर जिल्ह्यात जाता कामा नये -
जुन महिन्यापर्यंत जनावरांना चारा पुरेल यासाठी पानथळ जमीन, गाळपेर जमीन, तलाव व जलस्त्रोत असलेल्या ठिकाणी चारा लागवड करावी. जिल्ह्यात उपलब्ध असलेला चारा इतर जिल्ह्यात विक्री होणार नाही याची सर्व ग्रामंपचायती तसेच संबंधित विभागांनी दक्षता घेऊन चारा विक्री होत असल्यास कडक कारवाई करावी. लघु पाटबंधारे विभागांनी  तलावाचे खोलीकरण करावे, अशा सुचना केल्यात.

वनराई बंधारे व गेट दुरस्तीची कामे तात्काळ हाती घ्या - पराग सोमण -
प्रत्येक ग्राम पंचायतींनी किमान दोन वनराई बंधारे, बंधारे दुरुस्ती तसेच गेट दुरुस्तीची कामे हाती घ्यावी. रोजगार हमी योजनेंतर्गत पाणी टंचाईची कामे तसेच प्रत्येक गावांमध्ये किमान १०० जलताराची कामे हाती घेण्यात यावी. मुख्यमंत्री ग्राम समृध्द अभियानांतर्गत पाणी टंचाईच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सुचना पराग सेामण यांनी दिल्यात. यावेळी  वर्धा व सेलू तालुक्यातील ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत निहायपाणी टंचाईचा आढावा घेण्यात आला. बैठकीला पाणी टंचाई संबंधीत विभाग प्रमुख, तहसिलदार, तलाठी, ग्रामसेवक, उपस्थित होते.





  Print






Related Photos