चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
- मासे पकडण्यासाठी गेले असताना दुर्घटना; शोधमोहीमेदरम्यान आढळला मृतदेहविदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा येथील गांधी तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या गोपाल रुयारकर ३६वर्ष, रा. कॉलरी वॉर्ड, नवीन वस्ती, वरोरा यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल रुयारकर हे मासे पकडण्यासाठी गांधी तलावावर गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले आणि त्यांनी त्यांचा शोध सुरू केला. नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी तलाव परिसरात शोध घेतला.दरम्यान, नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबविण्यात आली. या शोधमोहीमेदरम्यान गोपाल रुयारकर यांचा मृतदेह पाण्यात आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पाण्...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मानवी-वन्यजीव संघर्षावर प्रभावी उपाय शोधण्यासह वन्यप्राण्यांची ओळख, वन्यजीव गुन्ह्यांवर नियंत्रण आणि जंगलातील वणव्यांचा शोध घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने आयोजित वाइल्ड हॅक २०२६ या राष्ट्रीय हॅकाथॉन व आयडियाथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) आणि सिनोरा-एआय लॅब्स यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सहकार्याने आयोजित या दोन दिवसीय स्पर्धेत देशभरातील विविध नामांकित शिक्षण संस्थांमधील १८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी वन्यजीव संवर्धनासाठी तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या.स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभु नाथ शुक्ला यांनी वि...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रंगलेल्या कमल गरबा महोत्सवाची रविवार, १८ ऑक्टोबर रोजी भव्य पारितोषिक वितरण समारंभाने सांगता झाली. बल्लारपूर येथील शगुन लॉनसमोरील मैदानावर भाजप महिला मोर्चा, बल्लारपूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय महोत्सवात स्पर्धकांनी आपल्या नृत्यकौशल्याने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत स्नॅप डान्स ग्रुपने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावत ५१ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या वतीने आयोजित रंगताली गरबा महोत्सवातही स्नॅप डान्स ग्रुपने प्रथम पारितोषिक पटकावले होते. त्यामुळे सलग दोन गरबा महोत्सवांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याची कामगिरी या ग्रुपने केली.कमल गरबा महोत्सवातील कपल डान्स प्रकारात सलोनी आणि सलमान या जोडीने उत्कृष्ट सादरीकरण करत ३१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले. १...
बातम्या -
Chandrapur
- जुन्या बसथांब्याला दिले नवे रूप; स्वच्छतेतून जपली सामाजिक बांधिलकी!विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा–वणी रोडवरील द्वारकादीश लॉनसमोरील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व बंद अवस्थेत असलेल्या बसथांब्याचे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोरा यांच्या वतीने स्वच्छता, रंगरंगोटी व सुशोभीकरण करून नूतनीकरण करण्यात आले. अनेक वर्षांपासून अस्वच्छता आणि झाडाझुडपांमुळे खराब झालेल्या या बसथांब्याची स्वच्छता करण्यात आली. तसेच रंगरंगोटी करून आकर्षक बॅनर लावण्यात आले.या उपक्रमामुळे बसथांब्याला नवे रूप मिळाले असून प्रवाशांसाठी परिसर अधिक स्वच्छ आणि सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वच्छ परिसर, सुंदर वरोरा आणि सामाजिक बांधिलकी या भावनेतून रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोराने हा उपक्रम राबविला. समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीतून सकारात्मक बदल घडवून आणणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.या उ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे पर्यवसान महिलेच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. ४५ वर्षीय महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेऊन पुरण्यात आला. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी तुकूम येथील आरोपी संतोष साखरकर ४९ वर्ष याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.प्राप्त माहितीनुसार, संतोष साखरकर याचे संबंधित महिलेसोबत मागील तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपी संतोष साखरकर याने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर हत्येचा गुन्हा उघडकीस येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने त्याने महिलेचा मृतदेह नागपूर जिल्...
बातम्या -
Chandrapur
- नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात अपघात; वणीहून कोठारीकडे जाताना काळाचा घालाविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील ७५ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास घडली. गीता संतोष पोलनवार ४५,वर्ष रा. कोठारी असे मृत महिलेचे नाव असून, दत्तात्रय कृष्णा रुखमवार ७५, वर्ष रा. मणगाव हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.वणीहून कोठारीकडे जात असताना अपघात -मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कृष्णा रुखमवार आणि गीता संतोष पोलनवार हे दोघे एमएच २९ सीएन ५४९२ क्रमांकाच्या दुचाकीने वणी येथून कोठारीकडे जात होते. दरम्यान, नागपूर–चंद्रपूर मार्गावरील नंदोरी टोल परिसरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील रामाळा येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी देवीदास रामाजी बनसोड जखमी झाले. या घटनेनंतर गावाजवळच बिबट्या असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वनविभागाने तातडीने बचाव मोहीम राबवत काही तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी सुमारे १० वाजता बिबट्याला पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे रामाळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील रामाळा येथे सकाळच्या सुमारास बिबट्याने शेतकरी देवीदास बनसोड यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. गावाच्या जवळच बिबट्या असल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये भीती पसरली. बिबट्याच्या उपस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.घटनेचे ...
बातम्या -
Chandrapur
- माविमचा जनजागृतीचा पुढाकारविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे तसेच शेतीत राबणाऱ्या महिलांना शेतकरी म्हणून ओळख आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), चंद्रपूरच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या माध्यमातून गावागावांत पथनाट्ये आणि आकर्षक भिंतीचित्रांच्या माध्यमातून प्रभावी प्रबोधन करण्यात येत आहे.जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर माविम अंतर्गत कार्यरत लोकसंचलित साधन केंद्रे आणि महिला बचत गटां...
बातम्या -
Chandrapur
- एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्समध्ये किशोरवयीन मुलींना आरोग्यविषयक मार्गदर्शन; मासिक पाळीतील स्वच्छता आणि संतुलित आहारावर भरविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वरोरा : किशोरवयीन मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, त्यांना शारीरिक बदलांची योग्य माहिती मिळावी तसेच आरोग्याशी संबंधित समस्यांबाबत संकोच न बाळगता संवाद साधता यावा, या उद्देशाने इनरव्हील क्लबच्या वतीने एक्सलेंट अकॅडमी ऑफ सायन्स, वरोरा येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींना आरोग्याची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमात डॉक्टर सौ. उमरे यांनी विद्यार्थिनींना किशोरवयात होणारे शारीरिक बदल, मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, योग्य आहार आणि आरोग्याची निगा राखण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. किशोर...
बातम्या -
Chandrapur
- सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राचे आवाहन- मुरघास, अझोला व प्रक्रिया केलेला चारा उपयुक्त पर्यायविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे संरक्षण आणि चाऱ्याच्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी व पशुपालकांनी आतापासूनच योग्य चारा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उपलब्ध चाऱ्याचा कार्यक्षम वापर, पिकांच्या अवशेषांवर प्रक्रिया, मुरघास निर्मिती, अझोला संवर्धन आणि संतुलित पशुआहाराच्या माध्यमातून चारा टंचाईची तीव्रता कमी करता येऊ शकते. यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ . सोनाली दुपटे यांनी केले आहे.दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याकरिता शेतकऱ्यांनी उपलब्ध चाऱ्याचा अपव्यय टाळून त्याचे योग्य नियोजन करावे .चारा कु...