चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गावरील मामला वनपरिक्षेत्रांतर्गत कक्ष क्रमांक ४१८ मध्ये रेल्वेच्या धडकेत एका सहा महिन्यांच्या मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या रेल्वेमार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बिबट्यांची संख्या आठवर पोहोचली असून, एकूण वन्यजीवांच्या मृत्यूंची संख्या १४० च्या पुढे गेली आहे. बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्ग हा कावल–ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण वन्यजीव भ्रमणमार्गाचा भाग आहे. या मार्गावरून वाघ, बिबटे, अस्वल यांसह विविध वन्यप्राणी एका अधिवासातून दुसऱ्या अधिवासात ये-जा करतात. मात्र, या मार्गावर वारंवार होणाऱ्या रेल्वे अपघातांमुळे वन्यजीवांचा बळी जात असल्याने त्यांच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली जात आहेघटनेची ...
बातम्या -
Chandrapur
- घाटंजी येथील प्रथम वर्ग न्यायदन्डाधिकारी प्रविण पाटील यांचे आदेश विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / घाटंजी : चिखलवर्धा येथील सन्शयीत आरोपी अब्दुल शहा नैमुल्लाशहा गाझी, राजू मेश्राम, मो. जफर नुर मोहम्मद व रविंद्र उर्फ गोलू आत्राम यांना घाटंजी येथील न्यायालय क्रमान्क १, प्रथम श्रेणी न्यायदन्डाधिकारी प्रविण पाटील (JMFC PRAVIN PATIL) यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपी अब्दुल शहा गाझी व इतरांची बाजू यवतमाळचे प्रसिद्ध फौजदारी वकील ADV. एस. एम. अली यांनी मान्डली.पारवा येथील वन परिक्षेत्र अधिकारी माधव कनिराम आडे यांनी ०६ नोव्हेंबर २०१७ रोजी दिलेल्या फिर्यादी नुसार, सन्शयीत आरोपी अब्दुल शहा नैमुल्लाशहा गाजी, राजू मेश्राम, मो. जफर नुर मोहम्मद व रविंद्र उर्फ गोलु आत्राम विरुद्ध भारतीय वन्यजीव सरक्षण अधिनियम, १९७२ चे कलम २, ९, ३९, ४४, ४८ व ५१ अन्तर्गत गुन्हा न...
बातम्या -
Chandrapur
- विलोडा, कोंडेगाव व खुटवंटा येथे वनराई बंधाऱ्यांची उभारणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी काळात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागात जलसंधारणाच्या कामांना चालना देण्यासाठी भद्रावती तालुक्यातील विलोडा, कोंडेगाव व खुटवंटा या गावांमध्ये लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली आहे. या जलसंधारण उपक्रमात पंचायत समिती भद्रावतीचे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, नरेगा विभागाचे खोडे तसेच संबंधित गावांतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत वनराई बंधाऱ्यांची उभारणी केली.वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी स्थानिक पातळीवर अडवून ठेवण्यास मदत...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : विनापरवाना विदेशी दारूची वाहतूक करताना ब्रह्मपुरी पोलिसांनी ५२८ बाटल्या विदेशी दारू आणि मारुती सुझुकी अर्टिगा कार असा एकूण ६ लाख ४२ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २३ ऑक्टोबर रोजी तुलानमाल ते वायगाव मार्गावर करण्यात आली. या प्रकरणी आरोपीआकाश अजय राम ३० वर्ष रा. वार्ड क्रमांक १७, मूल, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेतले असून आरोपी संजू जुगनसिंग पटवा रा. मूल, जि. चंद्रपूर हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, वायगाव ते तुलानमाल मार्गावरून पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमधून अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक होणार होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तुलानमाल ते वायगाव मार्गावरील विनायक आदे यांच्या शेताजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयित पांढऱ्या रंगाची अर्टिगा कार तेथे आली. पोलिसांनी कार थांबव...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी परिसरात बैलबंडीला धडक देऊन पसार झालेल्या टिप्परचा तळोधी पोलिसांनी अपघाताच्या १३ दिवसांनंतर शोध लावला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय नथ्थु श्रीराम चचाने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. पोलिसांनी टिप्पर क्रमांक एमएच ४० सीडी ४६३२ ताब्यात घेतले असून चालक सचिन दुर्योधन देशमुख ३७ वर्ष , रा. सोमनाळा, ता. भिवापूर, जि. नागपूर याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.१० ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान राजेंद्र ऋषिजी कोडापे रा. लखमापूर, ता. नागभीड हे मालक नथ्थु श्रीराम चचाने यांच्यासोबत बैलांसाठी चारा आणण्याकरिता जात होते. यावेळी गोमाजी दामाजी पेट्रोलपंपाजवळ महामार्गावर नागभीडकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या बैलबंडीला जोरदार धडक दिली. या अपघातात नथ्थु चचाने यांच्या पाय...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मृतांच्या स्मृती जपणाऱ्या आणि धार्मिक विधींसाठी महत्त्वाच्या असलेल्या विसापूर येथील नुरानी कब्रस्तानालाही चोरट्यांनी सोडले नाही. कब्रस्तानातील बोअरवेलची पाण्याची मोटार, पंप आणि अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात नाराजी व्यक्त होत आहे.शुक्रवारी दुपारी जुम्म्याच्या नमाजनंतर मुस्लिम समाजातील नागरिक नुरानी कब्रस्तानात सामूहिक फातिहा पठणासाठी गेले होते. यावेळी कब्रस्तानातील बोअरवेलची पाण्याची मोटार, पंप आणि अन्य साहित्य गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असलेले साहित्यच चोरीला गेल्याने नागरिकांना धक्का बसला. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर नुरी मशीद समितीच्या वतीने बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
बातम्या -
Chandrapur
- ऐन कापणीच्या हंगामात पिकांची नासधूस होण्याची भीती; शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकटविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : तालुक्यातील भगवानपूर परिसरात सध्या रानटी हत्तींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐन धान कापणीच्या हंगामात रानटी हत्तींच्या कळपाकडून कापणीसाठी तयार यंदा धान पीक कापणीसाठी तयार झाले असून, शेतकरी कापणीच्या कामाला सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत रानटी हत्तींचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शेतात उभ्या असलेल्या धान पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.धान हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असल्याने त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेतीच्या मशागतीसाठी केलेला खर्...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, बल्लारपूर येथील विद्यार्थिनींनी २२ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील विविध व्यावसायिक संस्थांना शैक्षणिक भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती जाणून घेतली.बी. व्होक. इंटिरिअर डिझाइन, बी.कॉम. ट्रॅव्हल अँड टुरिझम आणि बी.कॉम. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थिनींसाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थिनींनी चंद्रपूर येथील द ग्रँड आयकॉन, एनराइज बाय सयाजी आणि आर्ट इंटिरिअर या संस्थांना भेट दिली. अभ्यासक्रमातील सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक अनुभवाची जोड मिळावी, हा या उपक्रमाचा उद्देश होता.हॉटेल व्यवस्थापन आणि पर्यटन क्षेत्रातील विद्यार्थिनींनी हॉटेलमधील विविध सेवा, अतिथी सत्कार, ग्राहक व्यवस्थापन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील कार...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकशाहीचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती आणि काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानांतर्गत मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री तथा आमदार बाला बच्चन हे २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या आ. बच्चन यांच्या उपस्थितीत २५ ऑक्टोबरला चंद्रपुरात काँग्रेसची कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली आहे.रविवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता हॉटेल सिद्धार्थ प्रीमियम येथे चंद्रपूर शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या वतीने ही बैठक होणार आहे. या बैठकीत ‘वोट बचाओ, देश बचाओ’ अभियानाची अंमलबजावणी, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती, पक्ष संघटनेचे बळकटीकरण आणि आगामी कार्यक्...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बल्लारपूर येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडले. शहरातील तीन मतदान केंद्रांवर एकूण ७४ टक्क्यांच्या आसपास मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत असून, मतदारांनी दिलेला कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीकडून अभिजीत गोविंदराव वंजारी निवडणूक लढवत आहेत. तर भाजपप्रणीत युतीकडून सुधाकर कोहळे यांच्यासह अन्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३८ उमेदवार निवडणुकीत नशीब आजमावत असल्याने मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.बल्लारपूर शहरात मतदानासाठी तहसील कार्यालय आ...