चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध सिंदेवाही पोलिसांनी कारवाई केली. २५ ऑक्टोबर रोजी मौजा लोनवाही येथील ईदगाहजवळ सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या या जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोशन नंदू करकाडे २३ वर्ष , रा. गुरुदेव चौक, सिंदेवाही याला पकडण्यात आले.तर पोलिसांची चाहूल लागताच ५ आरोपी फरार झाले. घटनास्थळावरून दोन कोंबडे, ४०० रुपये रोख आणि पाच मोटारसायकली असा एकूण १ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रोशन करकाडे याच्यासह पाच मोटारसायकलींच्या चालकांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली.सिंदेवाही पोलीस ठाण्याचे पोलीस पथक जुगारविरोधी कारवाई व गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, लोनवाही येथी...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शासकीय कामांसाठी लाचेची मागणी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, तसेच भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक प्रशासनाच्या निर्मितीसाठी सहकार्य करावे, या उद्देशाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूरच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यंदा या सप्ताहासाठी समृद्धीसाठी सत्यनिष्ठा ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे.केंद्रीय दक्षता आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार आयोजित या सप्ताहाच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यासह शासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत.चं...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : अंमली पदार्थांचे विष एखाद्या तरुणाच्या आयुष्यात उतरले, की केवळ त्याचे भविष्यच अंधारात जात नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांचीही राख होते. नशेच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, समाजाचे भविष्य सुरक्षित राहावे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला वेळीच आळा बसावा, या उद्देशाने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने अंमली पदार्थविरोधी मोहिमेला वेग दिला आहे. याच मोहिमेअंतर्गत २४ ऑक्टोबर रोजी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर आंध्र प्रदेशातून दिल्लीकडे जाणाऱ्या आंध्र प्रदेश एक्सप्रेसची अचानक तपासणी करण्यात आली.अंमली पदार्थांची अवैध वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या NDPS सेलने विशेष मोहीम राबविली. रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या संभाव्य तस्करीवर लक्ष ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, रेल्वे पोलीस दल (GRP), र...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : लोकशाही आणि संविधानाचे संरक्षण, मतदारांच्या हक्कांविषयी जनजागृती तसेच काँग्रेस संघटनेच्या बळकटीकरणाच्या उद्देशाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वोट बचाओ, देश बचाओ अभियानांतर्गत चंद्रपुरात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मध्य प्रदेशचे माजी गृहमंत्री तथा राजपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बाला बच्चन यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे झालेल्या या बैठकीत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.तसेच १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या वोट बचाओ, देश बचाओ महारॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार विजय वडेट्टीवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि जिल्हा शहर काँ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गोवंश जनावरांना निर्दयतेने वाहनात कोंबून कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा प्रकार बल्लारपूर पोलिसांनी उघडकीस आणला. चंद्रपूर-बल्लारपूर महामार्गावरील विसापूर टोलनाक्यासमोरील चुनाभट्टी परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून कर्नाटक राज्यातील आयशर वाहन पकडले. या वाहनात दाटीवाटीने कोंबून ठेवलेल्या ११ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. मात्र, यातील एका गायीचा मृत्यू झाला. या कारवाईत वाहन, गोवंश जनावरे आणि मोबाईल असा एकूण १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, तर तीन आरोपी फरार आहेत.ही कारवाई २५ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर पोलिसांनी केली. पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे पोलीस पथकासह परिसरात गस्त घालत असताना, कर्नाटक राज्यातील आयशर वाहन क्रमांक KA 07 B 4824 मधून गोवंश जनावरांची अव...
बातम्या -
Chandrapur
- धानपिकावर फवारणी सुरू असताना घटना; महिलेच्या हाताला जखमा, परिसरात भीतीचे वातावरणविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : नेरी परिसरातील खातोडा येथील शेतशिवारात वाघाने महिला शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना रविवार, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. साधना मधुकर जांभूळे ४५ वर्षे रा. खातोडा असे जखमी महिलेचे नाव आहे. शेताच्या बांधावर विसावा घेत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर पंजा मारला. मात्र, साधना यांनी प्रसंगावधान राखत जोरात आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात वाघाच्या पंजाच्या नखांमुळे त्यांच्या हाताला जखमा झाल्या असून, त्यांच्यावर चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.शेताच्या बांधावर विसावा घेताना वाघाचा हल्ला -मिळालेल्या माहितीनुसार, साधना जांभूळे या रविवारी आपल्या पतीसोबत धानपिकावर औषध फवारण...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रेल्वे मार्गाजवळ जखमी अवस्थेत आढळलेल्या सुमारे दोन किलो वजनाच्या मादी कासवावर दीड महिना उपचार करून तिला पूर्णपणे निरोगी केल्यानंतर वर्धा नदीत सोडण्यात आले. साईबाबा वॉर्डातील रहिवासी विशाल राजू माने आणि त्यांच्या पत्नी अनुष्का माने यांनी मुक्या जीवाप्रती माणुसकी आणि संवेदनशीलता जपत कासवाला जीवदान दिले. कुटुंबाचा भाग बनलेल्या कासवाला निसर्गाच्या कुशीत मुक्त करताना माने दाम्पत्याने वन्यजीव संरक्षणाचा आदर्श समाजासमोर ठेवला.विशाल माने यांना साईबाबा वॉर्डाजवळून जाणाऱ्या रेल्वे मार्गालगत सुमारे दोन किलो वजनाचे मादी कासव जखमी अवस्थेत आढळले. त्यांनी तातडीने कासवाला घरी आणून त्याच्यावर उपचार सुरू केले. सुरुवातीला हळद लावून त्याची काळजी घेण्यात आली. त्यानंतर सातत्याने देखभाल केल्यामुळे कासवाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. सुमारे दीड महिन्याच्या उ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शारदा व दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी मूल पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत डीजेसाठी वापरण्यात येणारी सहा वाहने, बेस व टॉप स्पीकर्स, मिक्सर, जनरेटर आणि अन्य साहित्य असा एकूण ९४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २४ ऑक्टोबर रोजी विसर्जन मिरवणुकीदरम्यान करण्यात आली.शारदा व दुर्गा देवी विसर्जन बंदोबस्ताच्या अनुषंगाने चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिलेल्या निर्देशानुसार मूल पोलीस ठाण्याचे पथक शहरात गस्त घालत होते. यावेळी ध्वनीक्षेपकांच्या आवाजाची तपासणी केली जात होती. दरम्यान, महात्मा फुले चौक ते गांधी चौक परिसरात विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या डीजेचा आवाज कर्णकर्कश आणि निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक अस...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूची अवैध वाहतूक करून चंद्रपुरात विक्री करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. नागपूरहून आलेल्या गणराज ट्रॅव्हल्समधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी वरोरा नाका चौकात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६१ हजार ८२० रुपये किमतीच्या विदेशी दारूच्या १८० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणामुळे प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध दारूच्या व्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.२५ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने वरोरा नाका चौकात सापळा रचला. नागपूरहून चंद्रपूरकडे आलेल्या गणराज ट्रॅव्हल्स (क्र. एमएच ४९ एटी १६९६) ची तपासणी केली असता, त्यामधून प्रवास करणाऱ्या तीन महिलांकडे विदेशी दारू आढळून आली. पंचांसमक्ष त्यांच्या बॅगांची झडती ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : स्वतःच्या रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्याला जीवनदान देऊ शकतो, तर मृत्यूनंतरही आपला देह आणि अवयव दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतात, या भावनेतून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या यिशिता काळे यांनी माणुसकीचा अनोखा आदर्श उभा केला आहे. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी २२ वेळा रक्तदान करून त्यांनी अनेक गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या कार्यात योगदान दिले आहे. यासोबतच देहदान आणि अवयवदानाचा संकल्प करून त्यांनी समाजासमोर सेवाभावाचा प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याचा मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड, राजुरा शाखेच्या वतीने पुस्तक आणि रोपटे भेट देऊन गौरव करण्यात आला.राजुरा येथील देशपांडे वाडीमध्ये आई-वडिलांसोबत राहणाऱ्या यिशिता काळे या संगणक अभियंता आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असतानाही समाजातील वंचित, गरजू आणि दुर्लक्...