घरात शिरलेल्या विषारी नागाला सर्पमित्राकडून जीवदान : ठाणेगाव येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : ठाणेगाव येथील रहिवासी भाग्यश्री तोरणकर यांच्या घरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक अत्यंत विषारी नाग शिरल्याने परिसरात एकच घबराट पसरली. मात्र, सर्पमित्राने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे या नागाला सुखरूप पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सर्पमित्राच्या या कौशल्यामुळे तोरणकर कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री तोरणकर यांच्या घरात रात्री ९ वाजेच्या सुमारास एक नाग शिरला. या नागाने घरातील एका कोंबडीचा बळी घेतला. हा प्रकार लक्षात येताच तोरणकर कुटुंबीयांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, भीतीपोटी नागाला कोणतीही इजा न पोहोचवता कुटुंबीयांनी अत्यंत समयसूचकता दाखवली. त्यांनी तातडीने सर्पमित्र करण गिरडकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्र करण गिरडकर यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. घरात शिरलेला नाग अत्यंत आक्रमक आणि विषारी असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत आव्हानात्मक होते. परंतु, करण गिरडकर यांनी आपल्या अनुभवाच्या व कौशल्याच्या जोरावर मोठ्या शिताफीने नागाला सुरक्षितरीत्या पकडले.




Petrol Price




