चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
- आरवट-शिवणी येथे सराई नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा; भूजल पातळी वाढविण्यासह रब्बी पिकांना होणार लाभविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पुढाकारातून चंद्रपूर तालुक्यातील आरवट-शिवणी येथे सराई नाल्यावर श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होत असून जलसंधारणासाठी प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत ज...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विजयादशमीच्या शुभपर्वाचे औचित्य साधून तालुक्यातील विसापूर येथील आदर्श युवक शारदोस्तव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवेचा संदेश दिला.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या अंजलीताई पंदीलवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार, गजानन पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य सूरज टोमटे, सामाजिक कार्यकर्ते महेश तुराणकर आणि विलास भोयर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.रक्तदान शिबिरात सविताताई डाहुले, विलास भोयर आणि प्रशांत गिरडकर यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यास त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदानासारखे समाजोपयोगी उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे यावेळी ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरात अवैध रेती वाहतुकीचा गोरखधंदा पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसत असून, महसूल विभागाच्या कारवाईनंतरही रेती तस्करांवर प्रभावी अंकुश बसलेला नसल्याचे समोर येत आहे. तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी १५ व १६ ऑक्टोबर रोजी कारवाई करत दोन ट्रॅक्टर पकडले होते. तसेच अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजना करूनही शहरात अवैध रेतीच्या खेपा सुरूच असल्याने महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, किन्ही नाला तसेच पळसगाव नाला परिसरातून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात असल्याची चर्चा आहे. या ठिकाणांहून ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक करून शहरात खेपा पोहोचवल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागाच्या तलाठी कार्यालयासमोरूनही रेतीचे...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : वयाची ६५ वर्षे पार केलेल्या एका वृद्ध महिलेचा पतीसोबतचा साधा प्रवास क्षणात भीतीदायक अनुभव ठरला. रस्त्याने पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची गळसरी आणि डोरला अचानक जोरात हिसकावून घेतला. काही कळण्याच्या आतच दागिने घेऊन तिघेही पसार झाले.मूल तालुक्यातील वैवाळ ते बोंडाळा मार्गावर बलकी देवाच्या समोरील विसावा परिसरात १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे वृद्ध महिला भयभीत झाली असून, याप्रकरणी १९ ऑक्टोबर रोजी मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.मूखरा देवाजी भोयर (वय ६५), रा. उसेगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर या पती देवाजी नारायण भोयर यांच्यासोबत मुलींना भेटण्यासाठी निघाल्या होत्या. वढोली येथून एसटी बसने प्रवास केल्यानंतर त्या सायंकाळी बेंबाळ येथील बसथांब्यावर ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : फसवणुकीच्या गुन्ह्यात मागील सात वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. बसण वनवास राऊत ४९ वर्षे रा. पिंपरी चुन्नी, ता. तुमसर, जि. भंडारा असे आरोपीचे नाव असून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी नागभीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.नागभीड पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल झालेल्या अप. क्र. ७४/२०१९ मधील भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये गुन्ह्यात बसण राऊत हा पाहिजे आरोपी होता. या गुन्ह्यात तो मागील सात वर्षांपासून फरार असल्याने पोलीस त्याच्या शोधात होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने भंडारा जिल्ह्यात शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले.त्यानंतर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर महिलेची गळा दाबून हत्या करून तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरात पुरल्याच्या प्रकरणात आरोपी शिक्षक संतोष साखरकर (४९, रा. तुकूम) याला चंद्रपूर जिल्हा न्यायालयाने २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या हत्येमागील नेमके कारण आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अन्य कोणाची मदत घेण्यात आली होती का, याचा तपास पोलीस करीत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष साखरकर आणि संबंधित महिलेचे मागील तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने महिलेचा गळा दाबून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने नागपूर जिल्ह्यातील हिंगणा परिसरातील एका घरात खड्डा खोदून महिलेचा मृतदेह पुरल्याची माहिती ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती येथील हॉटेल अंबिकाच्या मालमत्तेच्या कर्जवसुलीवरून भंडारा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि कर्जदार तुषार सातपुते यांच्यातील वाद चिघळला आहे. कर्जवसुलीच्या प्रक्रियेत बँकेने नियमांचे उल्लंघन करून हॉटेलचा ताबा घेतल्याचा गंभीर आरोप सातपुते यांनी केला आहे. या प्रकरणाची भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सखोल चौकशी करावी, तसेच बँकेच्या मागील पाच वर्षांतील कर्जव्यवहारांचे विशेष फॉरेन्सिक ऑडिट करावे, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.तुषार सातपुते यांनी १६ ऑगस्ट २०१८ रोजी भंडारा अर्बन बँकेकडून कर्ज घेतले होते. कर्जवसुलीच्या कारवाईविरोधात त्यांनी नागपूर येथील कर्ज वसुली न्यायाधिकरणात (डीआरटी) दाद मागितली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच २२ ऑगस्ट २०२४ रोजी नायब तहसीलदारांनी पोलीस बंदोबस्तात हॉटेल अंबिकाला टाळे ठोकल्याचे सातपुते यां...
बातम्या -
Chandrapur
- कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन- हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, सूर्यफूल व जवस या पिकांची निवड कराविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा लक्षणीय कमी पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे. विशेषत हरभरा, करडई, रब्बी ज्वारी, सूर्यफूल व जवस या पिकांची निवड करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.कमी पाण्याच्या परिस्थितीत हरभरा व जवस ही पिके शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतात. या पिकांचा कालावधी साधारणत १०० ते १२० दिवसांचा असून, कमी ते मध्यम पाण्याच्या उपलब्धतेत त्यांची लागवड करता येते. तसेच करडई व रब्बी ज्वारी ही साधारणत ११० ते १२५ दिवसांची पिके असून कोरडवाहू परिस्थितीसाठ...
बातम्या -
Chandrapur
- मोबाईलवरून खतांची आगाऊ नोंदणी- क्यूआर कोडद्वारे खरेदीची सुविधाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची खरेदी सुलभ व पारदर्शक पद्धतीने करता यावी, यासाठी कृषी विभागामार्फत ॲग्रीस्टॅक अंतर्गत फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल (एफएफएस) प्रणाली राबविण्यात येत आहे. या प्रणालीच्या तिसऱ्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून त्याची अंमलबजावणी २२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मोबाईल ॲपद्वारे खतांची आगाऊ नोंदणी करून क्यूआर कोडच्या माध्यमातून अधिकृत विक्रेत्यांकडून खत खरेदी करता येईल.शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत एफएफएस ॲप डाऊनलोड करून राज्याची निवड करावी. त्यानंतर आधार प्रमाणीकरण अथवा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) व ओटीपीद्वारे लॉगिन करावे. ॲपमध्ये स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावरील जमिनीचा जिल्हा, ता...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होत असून, भजन, कीर्तन, माता जागरणासह दांडिया आणि रासगरब्याची धूम सुरू आहे. देवीच्या आराधनेत भाविक तल्लीन झाले असून, शहरातील विविध भागांत धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज, सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी शिवसैनिक नवदुर्गा मंडळाच्या वतीने माता जागरणाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसैनिक नवदुर्गा मंडळाचे प्रमुख संतोष दुर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध गायक विक्की दुपारे यांच्या स्वरांत माता जागरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवनगर येथील संतोषी माता मंदिरासमोरील पेपर मिलच्या मोकळ्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट)चे जिल्हाप्रमुख अॅड. युवराज धानोरकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि नेते...