चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा वनपरिक्षेत्रांतर्गत चुनाळा नियत वनक्षेत्रात नर चितळाची शिकार करून त्याच्या मांसाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजुरा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी धाड टाकून चितळाचे मांस शिजवताना तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत चार किलो शिजवलेले आणि १५ किलो कच्चे मांस, तसेच शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे.राजुरा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चुनाळा शिवारात चितळाची शिकार करून त्याच्या मांसाची विल्हेवाट लावली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी चितळाचे मांस शिजविले जात असल्याचे, तर उर्वरित मांस विक्रीच्या उद्देशाने तुकडे करून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.वनविभागाच्या पथकाने घटनास्थळावरून पिंटू गण...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : गुप्त माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कारवाई करत १ किलो ९३ ग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत जंगू मारोती कुंभरे (वय ५१), रा. बैलमपूर, ता. राजुरा, जि. चंद्रपूर याला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ५४ हजार ६५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई २७ ऑक्टोबर रोजी करण्यात आली.गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०८/२०२६ नुसार अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८(क) व २०(ब)(II)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून गांजा जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहेत.सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि राजुरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलात वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कलमसिंह पंचमसिंह उईके (वय ६५, रा. खापा, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. बांबू कटाईच्या कामासाठी जंगलात गेलेले कलमसिंह मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते. बुधवारी सकाळी शोधमोहीम राबविताना त्यांचा मृतदेह आढळून आला.मिळालेल्या माहितीनुसार, कलमसिंह उईके हे जंगल ठेकेदार सुखविंदरसिंग भोये यांच्याकडे बांबू कटाईचे काम करण्यासाठी आले होते. २७ ऑक्टोबर रोजी ते अन्य मजुरांसोबत जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलातील कक्ष क्रमांक ४६० मध्ये बांबूंचे बंडल बांधण्यासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास इतर मजूर परतले; मात्र कलमसिंह परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. रात्र होऊनही त्यांचा थांगपत्ता लागला नाही...
बातम्या -
Chandrapur
- जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी महाडीबीटी २.० पोर्टलवर नवीन व नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्जांच्या नोंदणी बाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची आढावा बैठक गुरुवार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे ही बैठक होणार आहे.समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) तसेच इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी २.० पोर्टलवर शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मधील नवीन (Fresh) व नूतनीकरण (Renewal) अर्जांची ऑनलाइन स्वीकृती 6 जुलै २०२६ पासून सुरू करण्यात आली ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / चंद्रपूर : सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणी यांची तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. नोव्हेंबर महिन्याचा पहिला सोमवार २ तारखेला येत असल्यामुळे या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्रारदार यांनी सर्वप्रथम तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल करावे व तालुकास्तरीय लोकशाही दिनातून तक्रार निकाली निघाल्यानंतर व समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावे.लोकशाही दिनात तक्रार सादर करतांना विहीत नमुन्यातील तक्रार अर्जासोबत तालुका लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची प्रत तसेच अर्ज १५ दिवस आधी २ प्रतीत सादर करावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी डी.एस.कुंभार यांनी कळविले आहे.
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अतिवर्दळीच्या मुख्य मार्गावर सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने डोक्यावर वार करून एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील छोटा बाजार चौक सिग्नलजवळ असलेल्या श्रीमान सावजी भोजनालयासमोर ही घटना घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला ताब्यात घेतले.या घटनेत रंजीत सुरेश राजवंशी ३६ वर्ष , रा. बल्लारपूर याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन दीपक कुरवे २९ वर्ष , रा. पंचशील चौक, जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर याने रस्त्याच्या कडेला पडलेल्या सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने रंजीत याच्या डोक्यावर सलग सहा ते सात वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रंजीतचा मृत्य...
बातम्या -
Chandrapur
- वरोरा नगरपरिषदेच्या काळ्या यादीतील समावेशाच्या आदेशाला स्थगिती; नागपूर खंडपीठाचा अंतरिम निर्णयविदर्भ न्यूज एक्सप्रेसतालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा नगरपरिषदेने काळ्या यादीत समाविष्ट केलेल्या विदर्भ मल्टी सर्विसेस या संस्थेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम दिलासा दिला आहे. संस्थेला काळ्या यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात नगरपरिषदेने २८ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या या कारवाईला न्यायालयीन स्तरावर तात्पुरती स्थगिती मिळाली असून, संबंधित संस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे.नगरपरिषदेच्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान -वरोरा नगरपरिषदेने विदर्भ मल्टी सर्विसेस या संस्थेला काळ्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला होता. नगरपरिषदेच्या या निर्णयाविरोधात संबंधित संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बल्लारशाह गोंदिया रेल्वेमार्गावर वन्यजीवांच्या मृत्यूचे सत्र सुरूच असून, बुधवारी पहाटे मालगाडीच्या धडकेत एका मादी सांबराचा दुर्दैवी मृत्यू झाला. चंद्रपूर शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर वनविकास महामंडळाच्या जुनोना वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४८२ मध्ये ही घटना घडली. या अपघातामुळे रेल्वेमार्गावरील वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आतापर्यंत रेल्वे अपघातांत मृत्युमुखी पडलेल्या वन्यजीवांची संख्या १४० च्या पुढे गेली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास चांदा फोर्टच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीची मादी सांबराला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात सांबराचा जागीच मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की, सांबराच्या शरीराचे अवशेष सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत विखुरलेले आढळले. त्याचा जब...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मित्रासोबत खेळण्यात वेळ गेला, घरी जायला उशीर झाला आणि घरी परतण्याऐवजी ११ वर्षीय बालकाने थेट रेल्वे स्थानक गाठले. चंद्रपूर रेल्वे स्थानकावरून रेल्वेने प्रवास करत तो बल्लारशाह स्थानकावर पोहोचला. मात्र, घरापासून दूर असलेल्या या चिमुकल्याला वेळीच मदतीचा हात मिळाला. रेल्वे चाईल्ड लाईनच्या सतर्कतेमुळे त्याची ओळख पटली आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्याला पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत पोहोचविण्यात आले. २७ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत रेल्वे चाईल्ड लाईनच्या तत्परतेमुळे बालकाला सुरक्षितपणे कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात यश आले.रेल्वे चाईल्ड लाईनचे केस वर्कर विजय अमर्थराज हे २७ ऑक्टोबर रोजी सकाळी बल्लारशाह रेल्वे स्थानकावर संपर्क व जनजागृतीचे काम करीत असताना फलाट क्रमांक ४ वर एक बालक पालकांशिवाय आढळून आला. बालकाची अवस्था लक्षात घेऊन त्यांन...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळामुळे ग्रामीण भागातील महिलांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव, जनावरांच्या चाऱ्याची समस्या आणि महिलांच्या आहारावर होणारे विपरीत परिणाम यांसह विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या वतीने महिला जनसंवाद व वस्तुस्थिती सर्वेक्षण उपक्रम राबविण्यात आला. चंद्रपूर येथील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियम येथे आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांनी आपल्या समस्या निर्भीडपणे मांडत दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे लक्ष वेधले.राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी खासदार फौजिया खान यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हा जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत चंद्रपूर येथे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या तथा माजी महि...