महत्वाच्या बातम्या

  चंद्रपूर बातम्या

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर बातम्या - Chandrapur

जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर


काळा दिवस पाळत जोरदार घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले. १ नोव्हेंबर २००५ पासून जुनी पेन्शन योजना बंद करण्याचा निर्णय लागू झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आणि जुनी पेन्शन संघर्ष कृती समन्वय समितीच्या वतीने शनिवारी (३१ ऑक्टोबर) चंद्रपुरात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रतीकात्मक काळा दिवस पाळत गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.३१ ऑक्टोबर २००५ चा काळा शासन निर्णय रद्द करून १९८२/८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरात गेल्या ११ वर्षांपासून कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून चंद्रपुरात विविध शासकीय विभागांतील हजारो कर...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
घरगुती गणपती सजावट स्पर्धेला ६६८ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : विजेत्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते गौरव बातम्या - Chandrapur

घरगुती गणपती सजावट स्पर्धेला ६६८ स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : विजेत्यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते गौरव


- भाजप महानगर कार्यालयात पार पडला पारितोषिक वितरण सोहळा; सर्व सहभागी स्पर्धकांनाही प्रोत्साहनपर बक्षिसे प्रदानविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेशोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि उत्सवातील आनंद अधिक व्यापक करणे या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती गणपती सजावट स्पर्धेला चंद्रपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत तब्बल ६६८ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण सोहळा भाजप महानगर कार्यालयात पार पडला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक श्रद्धेचा उत्सव नसून भारतीय ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा : आ. किशोर जोरगेवार बातम्या - Chandrapur

इरई धरणातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करा, शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचवा : आ. किशोर जोरगेवार


- जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह इरई धरणाची पाहणी, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि बंधारे बांधण्याच्या सूचना विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून त्याचा काटेकोर वापर करणे आवश्यक आहे. आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा अपव्यय होणार नाही. शेवटच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचेल, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्यासह त्यांनी इरई धरणाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला.यावेळी मनपा आयुक्त नरेश अकुनरी, मुख्य अभियंता चंद्रपूर थर्मल पाँवर स्टेशन अनिल काथोये, उप...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि एकजुटीवर भर : पोंभुर्ण्यात धर्मचिंतन परिषद बातम्या - Chandrapur

आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि एकजुटीवर भर : पोंभुर्ण्यात धर्मचिंतन परिषद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक प्रश्नांवर चिंतन करण्याच्या उद्देशाने पोंभुर्णा येथे आयोजित आदिवासी धर्मचिंतन परिषद उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या परिषदेला आदिवासी समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी समाजाची एकजूट, सांस्कृतिक अस्मितेचे जतन आणि आगामी २०२७ च्या जनगणनेत आदिवासी म्हणून नोंद होण्याच्या महत्त्वावर यावेळी विशेष भर देण्यात आला.परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी सामाजिक न्याय मंत्री तथा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अॅड. शिवाजीराव मोघे होते. माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्य...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बीआयटीच्या १०० विद्यार्थ्यांची मूल एमआयडीसीतील अन्नप्रक्रिया उद्योगांना भेट बातम्या - Chandrapur

बीआयटीच्या १०० विद्यार्थ्यांची मूल एमआयडीसीतील अन्नप्रक्रिया उद्योगांना भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (बीआयटी) येथील अन्न तंत्रज्ञान विभागाच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी मूल एमआयडीसी परिसरातील विविध अन्नप्रक्रिया उद्योगांना औद्योगिक भेट देण्यात आली. या भेटीत बी.टेक. अन्न तंत्रज्ञान विभागाच्या १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. Maruti Soya Products, Amrut Trust आणि पंचशील राईस मिल या उद्योगांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली.या औद्योगिक भेटीचे आयोजन भेट समन्वयक प्रा. दिव्या कोरडे यांच्या नियोजनाखाली करण्यात आले. विभागप्रमुख डॉ. प्रशांत वाटकर, प्रा. के. एम. देव, प्रा. सोनम राजभर, प्रा. लिलेश पुस्तोडे आणि प्रा. अजय दुर्गे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी नितीन आंदणकर आणि नितीन फुलझेले यांनी आयोजनासाठी सहकार्य केले.भेटीदरम्यान ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ऊर्जानगर येथे धनोजे कुणबी समाजाचा कोजागिरी स्नेहमिलन सोहळा उत्साहात बातम्या - Chandrapur

ऊर्जानगर येथे धनोजे कुणबी समाजाचा कोजागिरी स्नेहमिलन सोहळा उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीतील धनोजे कुणबी समाजाच्या वतीने ३० ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. स्नेहबंध सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध उपक्रम, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण येरगुडे होते. प्रमुख अतिथी म्हणून धनोजे समाज मंडळ, लक्ष्मीनगर, चंद्रपूरचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, सुधाकर काकडे, ऊर्जानगर ग्रामपंचायतीच्या सरपंच मंजुषाताई येरगुडे, चंद्रपूर वीज केंद्र कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र बोबडे, सीटीपीएस ग्राहक कर्मचारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष दिवाकर बोबडे, आशिष गोवादिपे आणि विनोद ताजने उपस्थित होते.यावेळी श्र...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी आतापासून चारा उत्पादनाचे नियोजन करा : जिल्हाधिकारी वसुमना पंत बातम्या - Chandrapur

दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी आतापासून चारा उत्पादनाचे नियोजन करा : जिल्हाधिकारी वसुमना पंत


- चारा पिकांची लागवड व नियोजनाबाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्नविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले. नियोजन भवन येथे कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने दुष्काळी परिस्थितीत चारा पिकांची लागवड व नियोजन या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता जलेश सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, विभागीय वन अधिकारी राजन तलमले आदी उपस्थित होते.चारा लागवडीसाठी योग्य ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता जमा बातम्या - Chandrapur

शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा २४ वा हप्ता जमा


- जिल्ह्यातील २ लक्ष ४४ हजार ७९६ पात्र शेतक-यांना लाभविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लक्ष ४४ हजार ७९६ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २४ व्या हप्त्याची रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथे आज ऑनलाइन समारंभाद्वारे देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने प्रत्येकी २ हजार रुपये जमा करण्यात आले.केंद्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी १ डिसेंबर २०१८ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपये याप्रमाणे वार्षिक ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील २४ व्या हप्त्याचे वि...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दिवाळीनिमित्त उमेद महिला बचतगटांच्या खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन बातम्या - Chandrapur

दिवाळीनिमित्त उमेद महिला बचतगटांच्या खाद्यपदार्थ महोत्सवाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना, ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे याची खरेदी करावी. तसेच या बचतगटांचा उत्साह वाढवून त्यांच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी ही दिवाळी अनोख्या पदधतीने साजरी करावी, असे आवाहन उमेद अभियानाचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.यावर्षी सर्व पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद परिसरात दिवाळी फराळ महोत्सव ३१ ऑक्टोबर  ते ४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित केले जाणार आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह कार्यरत असून, यातील अनेक महिला या नाविण्यपूर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या महिलांकडून विविध स्वरुपाचे खादयपदार्...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
दिवाळीनिमित्त तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीनदरम्यान विशेष रेल्वे : बल्लारशाह, नागपूरला थांबा बातम्या - Chandrapur

दिवाळीनिमित्त तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीनदरम्यान विशेष रेल्वे : बल्लारशाह, नागपूरला थांबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तिरुवनंतपुरम सेंट्रल ते हजरत निजामुद्दीनदरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ०६०७३/०६०७४ क्रमांकाची ही विशेष रेल्वे दोन्ही दिशांनी प्रत्येकी तीन फेऱ्या करणार आहे. या रेल्वेला बल्लारशाह आणि नागपूर स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.गाडी क्रमांक ०६०७३ तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन विशेष रेल्वे तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून २, ९ आणि १६ नोव्हेंबर २०२६ रोजी रवाना होईल. ही रेल्वे मंगळवारी रात्री ९.२५ वाजता बल्लारशाह स्थानकावर पोहोचून ९.३० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. त्यानंतर बुधवारी रात्री १ वाजता नागपूर स्थानकावर आगमन होऊन १.०५ वाजता प्रस्थान करेल.परतीच्या प्रवासात गाडी क्र...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →