चंद्रपूर बातम्या
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुनासुर्ला येथील २४ ग्रीड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत चोरी करून नुकसान केल्याच्या प्रकरणाचा मूल पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात सहा आरोपींना निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरी गेलेला ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन वाहने, असा एकूण ९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी आरोपी सचिन पुंडलिक निकुरे २७ वर्ष, सत्यपाल पुरुषोत्तम बावणे ३५ वर्ष, प्रकाश संताजी चटारे ४५ वर्ष, हेमराज जनार्दन वाढगुरे ३७ वर्ष आणि प्रबुद्ध सिद्धार्थ रामटेके ३२ वर्ष, सर्व रा. चिरोली, ता. मूल तसेच शोएब खान पठाण (रा. मूल) यांना अटक करण्यात आले आहे.मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील २४ ग्रीड प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी १७ ऑगस्ट ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चोरी कर...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : गडचांदुर येथील गडचांदूर ते कोरपना मार्गावरील जे पॅलेस बारच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहायक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांनी संयुक्त पथकासह धाड टाकली. १ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत १२ जणांना रंगेहात पकडण्यात आले. रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ५ लाख ७५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, याच बारवर मागील आठवड्यातही पोलिसांनी छापा टाकला होता. त्यामुळे आठवडाभरात दुसऱ्यांदा कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या कारवाईत शरद सुरेश जोगी (वय ४४), अशोक तुकाराम बोधे ४० वर्ष, मदन रघुजी बोरकर ६२ वर्ष, स्वप्नील भिमनाथ बोथले, जुनेद महेबुब शेख, महेशचंद कजोडीराम मीना ३८ वर्ष महेश रामकृष्ण पिंपळकर ४३ वर्ष, शाहरुख गफार खान ३०...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या कापूस चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरने छडा लावला आहे. या प्रकरणात दोन आरोपींसह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचा २.५ क्विंटल कापूस आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली झायलो कार असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी सागर लक्ष्मण चव्हाण २९ वर्ष , रा. नागरी, ता. वरोरा, जि. चंद्रपूर, अमोल महादेव जाधव २२ वर्ष , रा. दहेगाव, सेलू, ह.मु. हिंगणघाट, जि. वर्धा आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. १२०६७/२०२६, कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहितेनुसार कापूस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासह चोरीला गेलेला कापूस हस्तगत क...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरातील कॉलरी ग्राउंड परिसरात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा चेहरामोहरा आता बदलला आहे. परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासून असलेली सुसज्ज क्रीडांगणाची मागणी लक्षात घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नातून तब्बल ६ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीतून भव्य स्टेडियमचे काम पूर्ण झाले असून, हे क्रीडांगण आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.कॉलरी ग्राउंड हे परिसरातील नागरिकांसाठी खेळ, व्यायाम आणि विविध सामाजिक उपक्रमांचे महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, येथे आधुनिक सुविधांनी युक्त क्रीडांगण नसल्याने खेळाडू आणि नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. परिसरातील नागरिकांकडून या मैदानाच्या विकासाची मागणी सातत्याने केली जात होती. नागरिकांची ही गरज ओळखून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई केली. तालुक्यातील गिलबिली गावालगतच्या जंगल परिसरात १ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच जुगार खेळणाऱ्यांनी पळ काढला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, कोंबडे आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ७१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पथक ग्रामीण भागात गस्त घालत असताना गिलबिली गावालगतच्या जंगल परिसरात काही जण कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून हार-जीतचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जंगल परिसरात पोहोचताच कोंबड्यांच्या झुंजीवर ५०० रुपयांची बाजी लावल्या...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतातील सिंचनासाठी वापरण्यात येणारा विद्युत मोटारपंप चोरीला गेल्याच्या घटनेचा माजरी पोलिसांनी अवघ्या चार तासांत छडा लावला. या प्रकरणात शंकर महादेव आगलावे ३० वर्षे रा. पाटाळा, राकेश दामोधर ढवस ३३ वर्षे रा. नागलोन आणि जितेंद्र सुधाकर खामनकर ३६ वर्षे रा. राळेगाव, तिघेही तालुका भद्रावती, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मोटारपंप आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.वरोरा येथील बावणे ले-आउट परिसरात राहणारे हनुमान विठ्ठल खिरटकर ६० वर्षे यांच्या शेतातील वर्धा नदीजवळ लावलेला वरुना कंपनीचा विद्युत मोटारपंप अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतापासून १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरीस गेलेल्या मोटारपंपाची किंमत अंदाजे ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. ३ नोव्हेंबर रोजी दक्षिण आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर हे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव हैदराबादपर्यंत जाणवण्याची शक्यता असून, काही भागांत ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, विदर्भात पावसाची शक्यता नसून केवळ ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूरचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत या प्रणालीचे चक्रीवादळात, तर २ नोव्हेंबर रोजी तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. ३ नोव्हेंबरच्या सकाळी नेल्लोर ते नरसापूरदरम्यान हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशाची किनारपट...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे पंचशील वॉर्ड चंद्रपूर येथील राहुल अमर समुंद्र यांची युवासेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात ही नियुक्ती करण्यात आली.राहुल समुंद्र यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून पंचशील वॉर्डात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासह पक्षाचे विचार आणि संघटनेचे कार्य तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचविण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपजिल्हाप्रमुख बंटी कमतम, महेश श्रीगिर...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / चंद्रपूर : बँकेतून वाचनालयाचे पैसे काढून मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली ३ लाख ३० हजार रुपयांची रोकड दोन अनोळखी महिलांनी लंपास केल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ब्रम्हपुरी शहरातील वडसा रोडवर घडली. दलाल आटाचक्कीसमोर घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, चोरीची संपूर्ण घटना जवळील ऑटो गॅरेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.चंद्रभान नत्युजी पानसे ५७ वर्ष , रा. टिळकनगर, ब्रम्हपुरी) हे लोकमान्य टिळक वाचनालय, बाजार चौक, सराफा लाईन येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता ते वाचनालयाचे दुसरे ग्रंथपाल राजेश रविंद्र देऊळकर ५५ वर्ष यांच्यासोबत होंडा पॅशन प्रो मोटार सायकलने स्टेट बँक ऑफ इंडिया, ब्रम्हपुरी शाखेत गेले होते. सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास त्यांनी बँकेतून वाचनालयाचे ३ लाख ७० हजार ...
बातम्या -
Chandrapur
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : जिल्हास्तरीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत बल्लारपूर पब्लिक स्कूल, येनबोडीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत सलग दुसऱ्यांदा दणदणीत यश संपादन केले. १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने आणि १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत दोन्ही गटांत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या विजयामुळे दोन्ही संघांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत आयोजित ही जिल्हास्तरीय स्पर्धा चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत बल्लारपूर पब्लिक स्कूलच्या दोन्ही संघांनी सांघिक कौशल्य, उत्कृष्ट समन्वय आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना मागे टाकत विजेतेपद मिळविले. शाळेने सलग दुसऱ्यांदा मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात आणखी ...