महत्वाच्या बातम्या

 सोशल मीडियावरील अनुचित कंटेंटला ब्लॉक करा : चंद्रपूर पोलिसांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सोशल मीडियावर वाढत असलेल्या अनुचित व अश्लील कंटेंटपासून मुलांसह नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब आणि गुगलवर उपलब्ध असलेल्या सुरक्षा सुविधांचा वापर करून अनुचित कंटेंटला आळा घालण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. इन्स्टाग्रामवर Settings and activity मधील Content preferences मध्ये जाऊन संवेदनशील कंटेंटचे प्रमाण कमी किंवा मर्यादित करता येते. संशयास्पद खाते आढळल्यास ते Block करून Report करण्याची सुविधा आहे. फेसबुकवर Content preferences मधील Sensitive content नियंत्रित करता येते.

युट्यूबवरील Restricted Mode सुरू केल्यास अनुचित व्हिडिओंपासून बचाव करण्यास मदत होते. गुगलच्या SafeSearch सुविधेमुळे अश्लील किंवा अनुचित शोधपरिणाम फिल्टर करता येतात. अनुचित व्हिडिओ अथवा कंटेंट आढळल्यास त्याची तक्रार करण्याचेही पोलिसांनी आवाहन केले आहे.

मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेसाठी पालकांनी Family/Parental Controls चा वापर करावा. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये तसेच वैयक्तिक फोटो अथवा व्हिडिओ कोणालाही पाठवू नये. अनुचित कंटेंट आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ब्लॉक + रिपोर्ट करावे, असे पोलिसांनी सांगितले. सायबर फसवणूक अथवा ऑनलाइन गैरप्रकार घडल्यास नागरिकांनी सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी. सुरक्षित इंटरनेट – सुरक्षित आपण – सुरक्षित भविष्य या संदेशातून चंद्रपूर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन जगतात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.





  Print






Related Photos