महत्वाच्या बातम्या

 उर्दू पदवीधर कल्याण संघटनेतर्फे आमदार अभिजीत वंजारी यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : उर्दू ग्रेजुएट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आमदार अभिजीत गोविंदराव वंजारी यांचे त्यांच्या नागपूर येथील घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन उत्साहपूर्ण स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर आमदार वंजारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या शैक्षणिक समस्या, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध विषय यावेळी मांडण्यात आले. या समस्यांकडे आमदारांचे लक्ष वेधून त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, या मागणीचे सविस्तर निवेदनही संघटनेच्या वतीने त्यांना सादर करण्यात आले.

आमदार अभिजीत वंजारी यांनी उपस्थित पदाधिकारी व सदस्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले. तसेच शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताच्या विषयांना महत्त्व दिले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मोहम्मद शरीफ, मोहम्मद शकील, निसार शेख, युवक काँग्रेसचे कादर शेख, गोपाल अमृतकर, अहमद सईद, समीर, इश्त्याक कामिल, असरार, नवीन, काशिफ, सिराज, मेराज शेख, कौसर, सज्जाद, रिजवान, वहीद रजा, मिन्हाज यांच्यासह विविध भागांतून आलेले कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. सौहार्दपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.





  Print






Related Photos