महत्वाच्या बातम्या

 दारूच्या नशेत विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू


- इळदा येथील घटना; केशोरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : दारूच्या नशेत घराजवळील विहिरीकडे गेलेल्या २५ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना केशोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इळदा येथे गुरुवारी १० रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. पवन विनोद कुंभरे (२५, रा. इळदा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवन कुंभरे याला दारूचे व्यसन होते. गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजताच्या दरम्यान तो दारूच्या नशेत घराजवळील विहिरीच्या दिशेने गेला. यावेळी नशेमुळे त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला.

विहिरीत पडल्याने पवन पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती केशोरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी केशोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार प्रेमदास होळी करीत आहेत. तरुणाच्या मृत्यूमुळे इळदा गावात हळहळ व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos