महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाहीतील घरफोडीचा छडा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, वर्ध्यातून दोघे ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या नागरिकाच्या घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथून ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात अप.क्र. ५४७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ९ सप्टेंबर २०२६ रोजी फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली होती.

गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून संशयितांचा माग काढत सुनील शांताराम शिंदे २४ वर्षे, रा. बोरगाव टेकडी, सावंगी मेघे, जि. वर्धा आणि सुजल युवराज कुमरे १९ वर्षे, रा. बोरगाव टेकडी, सावंगी मेघे, जि. वर्धा यांना सावंगी मेघे येथून ताब्यात घेतले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सिंदेवाहीतील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला.

आरोपींकडून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे मणी, सोन्याची जिवती तसेच चांदीचे कडे, चांदीची पायपट्टी व गोप असा अंदाजे २ लाख ९३ हजार ३२७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झडोकर, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, संतोष निंभोरकर, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, सुभाष  गोहोकार, जयंत चुनारकर, पोअं अजित शेंडे, दिनेश आराडे, ऋषभ बारसिंगे यांनी केले.





  Print






Related Photos