बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा अवमान : चंद्रपुरात युवासेनेचे आक्रमक आंदोलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या कथित प्रकारावरून राज्यभरात संताप व्यक्त होत असून, या घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या युवासेनेने आक्रमक आंदोलन केले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य हर्षल काकडे आणि महाराष्ट्र राज्य विस्तारक संदीप रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे बाळासाहेबांना दैवत मानणाऱ्या शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून, हा त्यांचा जाहीर अपमान असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. ज्या बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून सत्ता आणि राजकारण केले जात आहे, त्यांचाच फोटो फाडण्याचा प्रकार संतापजनक असल्याची टीका जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी केली.
बाळासाहेब ठाकरेंचा अवमान शिवसैनिक कदापि सहन करणार नाहीत. शायना एनसी यांनी या प्रकरणी तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा विक्रांत सहारे यांनी दिला. यावेळी संतप्त युवासैनिकांनी शायना एनसी यांच्या प्रतिमेला जोडे मारून घटनेचा तीव्र निषेध नोंदविला.
या आंदोलनात युवासेना सहसचिव तथा युवतीसेना चंद्रपूर जिल्हाधिकारी रोहिणी पाटील, शिवसेना शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू, भारतीय कामगार कंत्राटी सेना जिल्हाध्यक्ष अमोल मेश्राम, युवासेना उपजिल्हाप्रमुख यशपाल कमटम, तालुकाप्रमुख सागर गबने, शहर प्रमुख फरदीन शेख, उपशहरप्रमुख राजकुमार पाचभाई, राहुल समुद, निलेश साव, अभिषेक गायकवाड, निखिल मोहुर्ले, अनुष खोब्रागडे, धम्मदीप खोब्रागडे, ओम कोपुलवार, भारत मंगाम, चेतन जिराफे, पराग कूत्तरमारे, अनुराग गजघाटे, राज खरोले, अनुप इंदुरवार, तन्मय राऊत, शुभम सहारे, सूर्यकांत भावने, अमर चित्तागवार, आयुष सहारे, कुणाल सहारे, जय अडेल, शुभम भीमनवार, संकेत तावाडे, रुपेश धनराज, खुशाल खुदमेतगे, प्रतीक मेश्राम, पवन उडाखे, ऋषि बडगी, क्रिस असरते, सोमैया विश्वकर्मा, क्रिश, प्रथम वनधारे, रोशन परोधी, अभिजीत मेश्राम, अतुल मिश्रा आणि अफरीद शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




Petrol Price




