महत्वाच्या बातम्या

 डाऊ केमिकल कंपनी मधील  स्थानिक कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत अहवाल सादर करावा - उपाध्यक्ष अण्णा बनसोडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
वृत्तसंस्था / मुंबई : तळोजा येथील डाऊ केमिकल कंपनीमध्ये गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ४० स्थानिक भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यवाही करावी. सकारात्मक दृष्टिकोनातून तसेच, या कामगारांना न्याय देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतचा सविस्तर अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधानभवन येथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीत संबंधित कामगारांना सेवेत नियमित करण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. बैठकीस संबंधित अधिकारी, डाऊ केमिकल तळोजा कंपनीचे प्रतिनिधी तसेच संबंधित कामगार उपस्थित होते.





  Print






Related Photos