महत्वाच्या बातम्या

  वर्धा बातम्या

जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी वान्मथी सी बातम्या - Wardha

जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी वान्मथी सी


- 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरदरम्यान सेवा संकल्प अभियान-  नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या सूचनाविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / वर्धा : सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची सर्व विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करावा तसेच जास्तीत जास्त नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिल्या.जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी सं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ बातम्या - Wardha

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदी आवश्यक सुविधेसाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांच्या सन २०२६-२७ मधील अर्जांसाठी १५ सप्टेंबर पर्यंत असलेली मुदत वाढविण्यात यावी याबाबत मागणी होत असल्यामुळे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या लाभापासून गरजू विद्यार्थी वंचित राहु नये, यासाठी मागील ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
गावभेट अभियान ग्रामपंचायत इसापुर येथे देवळी तहसीलदाराची भेट बातम्या - Wardha

गावभेट अभियान ग्रामपंचायत इसापुर येथे देवळी तहसीलदाराची भेट


- सेवा संकल्प अभियांतर्गत उपक्रम- गावातील सार्वजनिक सुविधांची पाहणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : नागरीकांच्या दैनदिन व पायाभुत सुविधांबाबत तक्रारीचे स्थानिक स्तरावर वर्गीकरण, उपाययोजना व कायदेशिर दृष्टीकोनातुन जलद निवारण, शासकीय योजना व सार्वजनिक सेवांची प्रत्यक्ष पडताळीणी तसेच स्थानिक संस्थाचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने सेवा संकल्प अभियानांतर्गत गावभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत देवळी तहसिलदार समर्थ क्षीरसागर यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत इसापुर येथे भेट देऊन पाहणी केली व संवाद साधला.सदर गावभेट अभियानमध्ये नागरीकांशी संवाद साधून गावातील पायाभूत सेवा व सुविधा, वीज, रस्ते, पाणी इत्यादींबाबत समस्या जाणून घेवून त्यांचे निराकरण तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. गावातील प्राथमिक शाळेमध्ये भेट देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गावातील युवकांशी संवाद साधून...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणासाठी : २३ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन बातम्या - Wardha

ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाच्या आरक्षणासाठी : २३ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर बैठकीचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / वर्धा : मुबंई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील तरतुदीनुसार सन २०२५- २०३० या कालावधीकरीता नागरिकांचा मागासवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण निश्चित करणे व निश्चित केलेल्या सरपंच पदामधून महिलांसाठी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील  महिलांसह) राखून ठेवण्याची कार्यवाही करण्यासाठी तालुकास्तरावर २३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण निश्चितीबाबत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मधील नियम २ अ च्या पोट नियम (१) व (२) आणि या विषयी ग्राम विकास विभाग, मुंबई यांचेकडील शासन अधिसूचना असाधारण क्र. ४३८ दिनांक १२ ऑगस्ट २०२६ अन्वये वर्धा जिल्ह्यातील अनुसूचित जाती...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुलासाठी ६,२४०.३० चौ.मी. शासकीय जमीन बातम्या - Wardha

आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुलासाठी ६,२४०.३० चौ.मी. शासकीय जमीन


- मंत्रिमंडळ बैठकीत विनामूल्य जमीन देण्यास मान्यता; नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीचा विचारविदर्भ न्यूज एक्सप्रेस  प्रतिनिधी / वर्धा : शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि नगरपरिषदेच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी नगरपरिषदेला व्यापारी संकुल उभारण्यासाठी ६ हजार २४०.३० चौ.मी. शासकीय जमीन विनामूल्य देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.आर्वी नगरपरिषदेकडून व्यापारी संकुलाच्या उभारणीसाठी मौजा आर्वी येथील ६ हजार ५१९ चौ.मी. शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याची विनंती शासनाकडे करण्यात आली होती. शहरातील व्यापारी उपक्रमांना चालना देण्याबरोबरच नगरपरिषदेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करण्याच्या उद्देशाने या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
 सावंगी मेघेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १३ जुगारी जेरबंद बातम्या - Wardha

 सावंगी मेघेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १३ जुगारी जेरबंद


- ९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; रोख रक्कम, मोबाइल, दुचाकी आणि ऑटो रिक्षांचा समावेशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी /  वर्धा : शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सावंगी मेघे येथील मास्टर कॉलनी परिसरात सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १३ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, मोबाइल फोन, दुचाकी आणि ऑटो रिक्षांसह तब्बल ९ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मास्टर कॉलनी परिसरातील एका ठिकाणी ५२ पत्त्यांवर मोठ्या प्रमाणात पैशांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांसह नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी काही जण पैशांची बाजी लावत ५२ पत्त्यां...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक : ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू बातम्या - Wardha

समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची धडक : ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू


- चॅनल क्रमांक ६०.४०० जवळ दुर्घटना; सावंगी पोलिसांत नोंदविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्घटना समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६०.४०० जवळ घडली. या अपघातात अंकित कुमार बिरेंद्रनाथ ३८ वर्षे, रा. तिलोची, उत्तर प्रदेश यांचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, अंकित कुमार बिरेंद्रनाथ हे समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक ६०.४०० परिसरात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी दखल घेतली. मात्र, धडक देणाऱ्या वाहनाची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. अपघात नेमका कशामुळे आणि कोणत्या परिस्थितीत घडला, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.या प्रकरणाची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली असून, ...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
शेतातील कुंपणावर वीजवाहिनीची तार पडली : विजेच्या धक्क्याने जावयाचा मृत्यू बातम्या - Wardha

शेतातील कुंपणावर वीजवाहिनीची तार पडली : विजेच्या धक्क्याने जावयाचा मृत्यू


- हिंगणी येथील दुर्दैवी घटना; कुंपणाच्या तारा व्यवस्थित करताना महेश टापरे यांना जीव गमवावा लागलाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : सासऱ्याच्या शेतातील कुंपणाच्या तारा व्यवस्थित करीत असताना अचानक वीजवाहिनीची तार तुटून लोखंडी कुंपणावर पडली. त्यामुळे कुंपणामध्ये वीजप्रवाह उतरल्याने विजेचा जोरदार धक्का बसून जावयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी हिंगणी येथे घडली. या घटनेमुळे मुडे आणि टापरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुर्घटनेत महेश टापरे ४० यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, महेश टापरे हे रविवारी त्यांचे सासरे चंद्रभान मुडे यांच्या शेतात गेले होते. शेतातील कुंपणाच्या लोखंडी तारा व्यवस्थित करण्याचे काम ते करीत होते. याचवेळी शेतावरून गेलेली वीजवाहिनीची तार अचानक तुटली.तुटलेली वीजवाहिनीची तार थेट शेतातील लोखंडी कुंपणाच्या तारांवर पडली. त्यामुळे...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात बातम्या - Wardha

बंजारा समाजाचा तीज महोत्सव उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : शहरातील एका सभागृहात बंजारा समाजातील महिलांच्या पुढाकारातून पारंपरिक तीज महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या महोत्सवाला वर्धा शहरासह लगतच्या परिसरातील महिला, तरुण, युवती तसेच बालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोकवारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बंजारा समाजाच्या पारंपरिक जीवनपद्धतीत तीज उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या उत्सवाच्या माध्यमातून निसर्गातील विविध घटकांचे संवर्धन, जतन आणि पर्यावरणाबाबत जागृती करण्याचा संदेश दिला जातो.महोत्सवादरम्यान महिला व पुरुषांनी एकत्र येत बंजारा समाजाची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. पारंपरिक गीतांच्या माध्यमातून बं...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →
साटोड्यातील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम गुणवत्तापूर्ण करा बातम्या - Wardha

साटोड्यातील नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम गुणवत्तापूर्ण करा


- पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली पाहणी; विविध सुविधांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशविदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / वर्धा : साटोडा-आलोडी परिसरातील नागपूर वळणरस्त्यावर साटोडा चौक येथे सुमारे ८ कोटी रुपये खर्चातून नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य केंद्राची इमारत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उभारण्यासोबतच कामाला गती देऊन ते तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कार्यकारी...

- VNX बातम्या | अधिक वाचा.. →