वर्धा बातम्या
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेसप्रतिनिधी / वर्धा : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तसेच कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल हे बुधवार, १० सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती तसेच त्यानंतर रामटेककडे प्रयाण करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.राज्यमंत्री ॲड. जयस्वाल हे १० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता बॅचलर रोड येथील स्व. दत्ताजी मेघे चौक नामांतर सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ४.३० वाजता रामनगर, वर्धा येथील सर्कस ग्राऊंडवर आयोजित बैलपोळा व कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.बैलपोळा हा विदर्भातील शेतकरी व ग्रामीण भागाशी निगडित महत्त्वाचा पारंपरिक सण असून, त्यानिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेती, कृषी तंत्रज्ञान व ग्रामीण संस्कृतीशी संबंधित विविध उपक्रमांचे आयोज...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोसले १० सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता वर्धा येथे आगमन व राखीव. दुपारी १ वाजता पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या निवासस्थानी आगमण व राखीव. दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थित राहतील.सायंकाळी ४ वाजता गोंडप्लॉट बॅचलर रोड येथील स्व.दत्ताजी मेघे चौक नामांतर सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता शहिद भगतसिंग मैदान सर्कस ग्राऊंड येथे आयोजित बैलपोळा व कृषि प्रदर्शनी कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ७.१० वाजता स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती. रात्री सोयीनुसार अमरावतीकडे प्रया...
बातम्या -
Wardha
- आशा प्रशिक्षण सभागृह व गटप्रवर्तक कार्यालय बांधकामासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी साटोडा-आलोडी येथील नागपूर वळणरस्त्यावरील साटोडा चौक येथे ८ कोटी रुपये खर्च करुन नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच बांधकाम उत्तम दर्जाचे तसेच तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले आदी उपस्थित होते.साटोडा येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. यासाठी इमारतीचे बा...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : मेरा युवा भारत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयातर्फे विकसित भारत युवा नेते संवाद २०२७ प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली आहे. ही प्रश्नमंजुषा मेरा युवा भारत पोर्टलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी केवळ पाच मिनिटांचा वेळ देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी अथवा लॉगिन करून आपला सहभाग नोंदवावा. या उपक्रमात सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व पदवीपूर्व विद्यार्थी आणि विशेषतः एनएसएस स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावर आपले विच...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थी व सलोखा प्रकल्प समितीच्या संयुक्त संकल्पनेतून भारताचे सरन्यायाधीश सुर्यकांत व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमुर्ती विक्रम नाथ यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात १ ऑक्टोंबर पासुन पुढील ९० दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी ३.० ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रलंबित जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी केले आहे.सदर विशेष मध्यस्थी मोहिम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष हेमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात वर्धा न्यायिक जिल्ह्यात राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले वैवा...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत कृषि विभागाच्या विविध कृषि विषयक योजना, आधुनिक तंत्रज्ञान, पीक उत्पादनातील सुधारण तसेच शेतकऱ्यांपर्यंत कृषि विषयक माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रगतीशील व कृषि क्षेत्रात सक्रीय असलेल्या व्यक्तींची शेतकरी मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शेतकरी मित्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, पीक संरक्षण, मृदा व जलसंधारण तसेच कृषि विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शेतकरी मित्र हा कृषि विभाग आणि शेतकरी यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून कार्य करेल. गावातील शेतकऱ्यांना कृषि विषयक मार्गदर्शन व माहिती उलब्ध करुन देणे, कृषि ...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी या संकल्पनेच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांचे पोषण, आरोग्य, संगोपन व सर्वांगीण विकास याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. पोषण माहाच्या माध्यमातून कुपोषणमुक्त व सुपोषित वर्धा घडविण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत.स्थानिक पौष्टिक आहारावर भर -अंगणवाडी केंद्रांमध्ये उपलब्ध स्थानिक व हंगामी पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ताजा व गरम शिजविलेला आहार, आहाराची गुणवत्ता, स्वच्छता तसेच आरोग्यदायी आहाराच्या सवयी याबाबत विशेष जनजागृती केली जाणार आहे.बालक...
बातम्या -
Wardha
- शिक्षक मित्र उपक्रमातून टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग - सीईओ पराग सोमणविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक तसेच विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षक मित्र उपक्रमातून टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग राबविण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी तसेच ५०० हून अधिक शिक्षक, विद्यार्थी, पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली शैक्षणिक व व्यावस...
बातम्या -
Wardha
- म्हसाळा येथील जनसंवाद कार्यक्रम- १०० च्यावर तक्रारी व निवेदन प्राप्तविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : वाढत्या लोकसंख्येमुळे शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात ले-आऊटच्या माध्यमातून विस्तार होत आहे. पुर्वी या ले-आऊटधारकांनी आवश्यक सुविधा निर्माण करुन दिल्या नाही. त्यामुळे परिसरात रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, वीज अशा आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यासाठी नागरी सुविधा, जिल्हा नियोजन समितीच्या निधी सोबतच म्हाडाच्या निधीमधून आवश्यक सुविधा निर्माण करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.म्हसाळा येथे पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला तहसिलदार संदीप पुंडेकर, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : वर्धा नगर परिषदेच्या जलतरण तलाव येथे ब्ल्यू स्टार ॲकाडमीच्यावतीने आयोजित वर्धा स्वीम गाला या जलतरण स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निमिश मुळे, ॲथलेटीक्स असोशिएशनचे सुधीर चौधरी आदी उपस्थित होते.वर्धा शहरात जलतरण तलावाची चांगली सुविधा निर्माण झाल्यामुळे येथील जलतरणपटूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करण्यासाठी या जलतरण तलावाचा उपयोग होत आहे. जलतरणामुळे जलतरणपटूंचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होत आहे.नव्याने महिला व बालकांसाठी बांधण्यात येत असलेला जलतरण पुर्णत्वास येत असून लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. जलतरण तलावामुळे महिला व बालकांना मोठा लाभ होणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यावेळी म्हणाले.