वर्धा बातम्या
बातम्या -
Wardha
- ५६ लाख ७ हजार रुपयांच्या २.५२ लाख युनिट्स विजेचा बेकायदेशीर वापर उघडकीस; ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात १६० कारवायाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : वीजचोरीला पूर्णपणे पायबंद घालण्यासोबतच प्रामाणिक वीजग्राहकांचे हित जपणे आणि महावितरणच्या महसुली सुरक्षेला बळकटी देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात विशेष वीजचोरीविरोधी मोहीम राबविण्यात आली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या कालावधीत ग्रामीण तसेच शहरी भागात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत महावितरणच्या विशेष पथकांनी तब्बल ५२९ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली आहेत. या कारवाईत सुमारे ५६ लाख ७ हजार रुपयांच्या २.५२ लाख युनिट्स विजेचा बेकायदेशीर वापर झाल्याचे समोर आले आहे.महावितरणच्या पथकांनी वीजचोरीच्या विविध प्रकारांवर लक्ष केंद्रित करत ही कारवाई केली. वीज वितरण प्रणालीच्या मुख्य वाहिन्यांवर थेट आकडे टाकून वीज घेणे, अनधिकृत केबलच्या माध्यमातून वी...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : एक जिल्हा, एक पीक उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यासाठी हळद पिकाची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढवून उत्पादनाला चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमाला पूरक ठरणाऱ्या प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला असून, एका शेतकऱ्याने तूर पिकात आंतरपीक म्हणून केलेल्या हळद लागवडीची जिल्हा कृषी अधीक्षक अरविंद उपरीकर यांनी पाहणी केली. या प्रयोगाची माहिती जाणून घेत त्यांनी शेतकऱ्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.तूर पिकामध्ये आंतरपीक म्हणून हळदीची लागवड करण्यात आली आहे. एकाच शेतात दोन पिके घेतल्यामुळे उपलब्ध जमिनीचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर होण्यास मदत होते. त्याचबरोबर पीक विविधीकरण साधता येते आणि एका पिकाच्या उत्पादनावर किंवा बाजारभावावर शेतकऱ्याचे संपूर्ण उत्पन्न अवलंबून ...
बातम्या -
Wardha
- विद्यार्थ्यांनी स्वीकारली शिक्षकांची भूमिका; बासऱ्या व दहीहंडीच्या मडक्यांतून सर्जनशीलतेचे दर्शनविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / हिंगणघाट : येथील ज्ञानदीप विद्यानिकेतनमध्ये शुक्रवारी कृष्ण जन्माष्टमी आणि शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांसह नेतृत्व आणि संवादकौशल्याचेही दर्शन घडविले. कार्यक्रमाची सुरुवात देशाचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनकार्याची माहिती सादर करत शिक्षण क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला.बासऱ्या, दहीहंडीच्या मडक्यांतून सर्जनशीलतेला चालना -कृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून विद...
बातम्या -
Wardha
- धानोरा येथे १५ दिवसांपूर्वीच्या वादातून थरार; आरोपी आकाश वाटगुळे पहाटे अटकेतविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : तू परमात्मा धर्म स्वीकारला आहेस, तर दारू कशाला पितोस?’ अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून एका ४९ वर्षीय व्यक्तीची लोखंडी रॉडने डोक्यावर प्रहार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना धानोरा येथे घडली. अनिल नारायण मंगरे ४९ वर्षे रा. धानोरा असे मृताचे नाव असून, आकाश गिरीधर वाटगुळे ३२ वर्षे रा. धानोरा असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी सेवाग्राम पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.१५ दिवसांपूर्वी झाला होता वाद - मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १५ दिवसांपूर्वी अनिल मंगरे यांनी आकाश वाटगुळे याला दारू पिण्याबाबत समजावून सांगितले होते. तू परमात्मा धर्म स्वीकारला आहेस, तर दारू का पितोस? अशी विचारणा त्यांनी केली होती. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादाचा राग आकाशच्या मनात ...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या व प्रवेश न घेतलेल्या इयत्ता ११ वी, १२ वी तसेच नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास ३० ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.सन २०२५-२०२६ या वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज नुतणीकरण करण्याकरीता १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अर्ज करावयाच्या पुर्वी शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेणे आवश्यक आहे.स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वसतीग...
बातम्या -
Wardha
- १५ सप्टेंबरपर्यंत पूर्तता करणे बंधनकारक- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवा केंद्रांना पुरस्कारविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सेवा केंद्रांच्या पायाभूत, तांत्रिक सुविधा, नामकरण व मानांकनाबाबत नवीन निकष निश्चित केले आहेत. या निकषांची पूर्तता करण्यासाठी सेवा केंद्रांना १५ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी निर्धारित निकषांची काटेकोरपणे पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.राज्यातील सेवा केंद्रांना आता आपले सरकार-सेतू सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, आपले सरकार ग्राम पंचायत सेवा केंद्र आणि आपले सरकार-नागरी सेवा केंद्र असे प्रमाणित नामकरण करण्यात आले आहे. सेवा केंद्रासाठी किमान १०० चौरस फुट क्षेत्रफळा...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / वर्धा : तृतीयपंथीय एक दुर्लक्षित घटक असून या घटकास विकास प्रक्रियेत आणण्यासाठीं त्यांचा सर्वांगीन विकास करण्याकरीता त्यांना शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करुन देणे, त्यांचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरीता स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक संस्थांनी १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून, या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणुक दिली जाते. नेहमीच भेदभाव व सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहीलेला आहे.त्यामुळे या समाज घटकाचे शासनामार्फत मुलभूत अधिकाराचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याकरिता तृतीयपंथीय व्यक्ती (हक्काचे संरक्षण) कायदा, २०१९ न...
बातम्या -
Wardha
- मतदार यादी निरिक्षकांनी घेतला एसआयआरचा आढावा- प्रारुप मतदार यादी सर्वच ठिकाणी प्रसिध्द करण्याचे निर्देशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. एकही पात्र मतदार यादीतून वगळू नये यासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप यादीत मतदारांनी आपली नावे तपासावी. त्यात काही दुरुस्ती, बदल, समावेश असल्यास तसे आक्षेप, हरकती मुदतीत सादर करावे. राजकीय पक्षांनी देखील यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केलेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्रीमती बिदरी यांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधि...
बातम्या -
Wardha
- वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : सायखेडा आणि सावंगी पोड परिसरात मागील अनेक वर्षांपासून पट्टेदार वाघाचा वावर आहे. या परिसरात वाघाने अनेक पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वाघाने चोरांबा आणि गौरखेडा गाव परिसरातही आपला वावर वाढविला आहे. वाघाचे दर्शन होण्यासोबतच त्याने पाळीव जनावरांवर हल्ले केल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गौरखेडा येथील अनिल वाडेकर यांच्या शेळीवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. त्यानंतर दिलीप वाडेकर यांच्या श्वानावरही वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात श्वान जखमी झाला. वाघ गावाच्या परिसरात असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी आरडाओरड केली. नागरिकांच्या आरडाओरडीमुळे वाघाने तेथून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या ...
बातम्या -
Wardha
- भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ लागूविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यामध्ये आगामी काळात दहीहांडी, पोळा, तान्हा पोळा व सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहे. या सण उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणावर लेझर लाईटचा वापर केला जातो. या लाईटचा प्रकाश मानवी डोळ्यांसाठी घातक असून मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिक भाविकांच्या डोळ्यावर याचा प्रकाश पडल्यास डोळ्यांच्या पडद्यावर तसेच बुबुळावर गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे 28 सप्टेंबर पर्यंत या लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शांतता व कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सण उत्सवाच्या कालावधीत २८ सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वान्मथी सी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३चे कलम १६३ कलम लागू करुन लेझर लाईट वापरावर प्रतिबंधात्मक आदेश जार...