गडचिरोली : मारकबोडी जंगल परिसरात मृतावस्थेत आढळला बिबट्या


- मृत्यूचे कारण गुलदस्त्यात, शवविच्छेदन अहवालानंतर कारण येईल पुढे 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
तालुक्यातील मारकबोडी जंगल परिसरात काल २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेमुळे वनविभागाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
तालुक्यातील मारकबोडी जंगल परिसरात वनकर्मचारी गस्तीवर असतांना त्यांना बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. लागलीच सदर घटनेची माहिती वनविभागाला दिली असता सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वनपरिक्षेत्रधिकारी पेंदाम, क्षेत्र अधिकारी कन्नमवार घटनास्थळी उपस्थित झाले. दरम्याने बिबट्याच्या बाह्य भागास कोणतीही जखम आढळून आली नाही. मौका पंचनामा करून मृत बिबट्यास शवविच्छेदानासाठी पाठविण्यात आले आहे. 
वनविभागा कडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती मुख्य वन संरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-24
Related Photos