वर्धा बातम्या
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब वाढविणे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कापूस उत्पादकता अभियान - कापूस क्रांती या योजनेंतर्गत कापूस प्रशिक्षण व क्षेत्रीय भेटीचे आयोजन करण्यात आले. या भेटीत भारत सरकारच्या कापूस विकास संचालनालयाचे संचालक अरविंद वाघमारे यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले.कारंजा तालुक्यातील माळेगाव (काळी) तसेच हिंगणघाट तालुक्यातील डायगव्हाण येथे कापूस प्रशिक्षण व क्षेत्रीय भेट शिवार फेरी आयोजित करण्यात आली. डायगव्हाण तसेच वाघोली येथील कापूस क्रांती प्रकल्पांतर्गत सहभागी शेतकऱ्यांना कापूस पिकातील आधुनिक तंत्रज्ञान व पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. घन व अतिघन लागवड पद्धतीचे प्रात्यक्षिक अंतर्गत दोन महिला...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानानिमित्त समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, कार्यालय अधीक्षक दिपक कुसरे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिंदी मेघे येथील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच त्यांचे दैनंदिन राहणीमान, उपलब्ध सोयी-सुविधा आरोग्यविषयक बाबी, भोजन व निवास व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींची पाहणी केली.सेवा संकल्प अभियानांतर्गत अधिकारी भेटी देऊन सुविधा व समस्यांची पाहणी करत आहे. या भेटीत जेष्ठ नागरिकांच्या अडचणी व अपेक्षा जाणून आवश्यक त्या बाबींवर व्यवस्थापनास मार्गदर्शन करण्यात आले. जेष्ठ नागरिकांना शासनामार्फत उपलब्ध असलेल्या विविध योजना व सुविधांचा लाभ मिळवून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.सेवा संकल्प अभियानांतर्गत जेष्ठ ...
बातम्या -
Wardha
- अंतोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण ७ कोटी खर्चून केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, विविध सुविधाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, यासाठी केंद्रांना विविध प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करून देत आहोत. अंतोरा येथे नव्याने बांधण्यात आलेली इमारत परिसरातील गावांसाठी एक उत्तम आरोग्य केंद्र ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. अंतोरा येथे ७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.भोयर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, आष्टीचे नगराध्यक्ष अनिलधोत्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राज...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : वर्धा ते चितोडा रेल्वे मार्गावर झालेल्या अपघातात आनंदनगर येथील रहिवासी शाकीन अब्दुल रब्ब ५५ वर्षे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १७ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, शाकीन अब्दुल रब्ब या त्यांच्या लहान बहिणीच्या घरी घरकामासाठी गेल्या होत्या. घरकाम करत असताना रेल्वे मार्गाजवळ त्यांचा अपघात झाला. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने शाकीन यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे आनंदनगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शाकीन यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची पुढील चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज प्रतिनिधी प्रतिनिधी / वर्धा : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, दहेगाव गोसावी येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय समग्र प्राथमिक आरोग्य सेवा या प्रशिक्षण सत्रास नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.शशिकांत शंभरकर यांनी देऊन प्रशिक्षणाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी उपसंचालकांनी प्रशिक्षण सत्रातील विविध विषयांचे सादरीकरण, प्रशिक्षणाची पद्धत तसेच प्रशिक्षणार्थीचा सहभाग याबाबत माहिती घेतली. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांशी संवाद साधत समग्र प्राथमिक आरोग्य सेवा (सीपीएचसी) अंतर्गत प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षणातून मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन केले. तसेच प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन करून प्रशिक...
बातम्या -
Wardha
- माहिती व जनसंपर्कचा लोकसंवाद कार्यक्रमात- योजनेतून ५ लाखापर्यंतचे उपचार विनामूल्यविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : आपत्कालिन परिस्थितीत उपचारांवरील खर्च भागविता यावा, यासाठी केंद्राच्यावतीने आयुष्मान भारत व राज्य शासनाच्यावतीने महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क विभागाच्या लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत या दोनही योजनांची माहिती वर्धा शहरातील लेलेवाडी येथील बाहुबली गणेश मंडळाच्या ठिकाणी उपस्थित नागरिकांना देण्यात आली. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित या लोकसंवाद कार्यक्रमप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आयुष्मान भारत व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेचे प्रभारी अधिकारी सारंग भुमरे, जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपिक दिलीप बोंडसे, ज्येष्ठ नागरिक प्रकाश रायटर तसेच मंडळाचेपदाधिकारी, कार्यकर्ते आशिष शिंदे,...
बातम्या -
Wardha
- एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचा आढावाविदर्भ न्यूज प्रतिनिधी प्रतिनिधी / वर्धा : यावर्षी सरासरी पर्जन्यमान आणि प्रकल्पांतील जलसाठा तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचे नियोजन करतांना ते आतापासूनच केले पाहिजे. जिल्ह्यात उपलब्ध पाणीसाठा आणि त्याचा वापर यावर प्रशासनाचे सातत्याने लक्ष ठेवावे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.एलनिनोच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई, प्रकल्पातील उपलब्ध होणारा पाणीसाठा व त्याचा वापर याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ.सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.ज्ञानदा फणसे आदी उपस्थित होते.एलनिनोमुळे पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता असल्याने प्रशास...
बातम्या -
Wardha
- ३०० कोटी वृक्ष लागवड, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मानविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : विकसित भारताचे उद्दिष्ट गाठत असतांनापर्यावरणाचा समतोल, वृक्षलागवड व संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. वृक्षलागवडीसाठी जास्तीत जास्त नोंदणी करून यास लोकचळवळ बनवावे आणिसामूहिक प्रयत्नातून राज्याला हिरवेगार, निसर्गसंपन्न बनविण्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.विकास भवन येथे वन विभागाच्यावतीने ३०० कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्था, स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळीते बोलत होते. कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपवनसंरक्षक हरविर सिंह, विभागीय वनअधिकारी सुहास बढेकर, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, ॲक्सिस बँकेचे विभागीय व्यवस्थापक रा...
बातम्या -
Wardha
- नगरपरिषदेच्या पाच शाळांच्या नुतणीकरणाचे लोकार्पण- सेवा संकल्प अभियानांतर्गत शाळा लोकार्पणाचा उपक्रमविदर्भ न्युज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : नगर परिषदेच्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या शाळा खाजगी शाळांच्या स्पर्धेत पट संख्येअभावी कमी होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या स्पर्धेत शासकीय शाळांना टीकून ठेवण्यासाठी या शाळांचा शैक्षणिक दर्जा व आवश्यक सोईसुविधा निर्माण करुन देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोंबर यादरम्यान सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त आज नगर परिषदेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या आणि अनेक वर्षापासून जून्या झालेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतीचे वैशिष्टपुर्ण निधी व दलितेत्तर निधी अंतर्गत नुतणीकरणाचे बांधकाम करण्यात आले. त्याच्या लोकार...
बातम्या -
Wardha
- पालकमंत्र्यांच्याहस्ते पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, टूलकिट व धनादेश वितरणविदर्भ न्युज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेणाऱ्या कारागिरांनी प्रशिक्षणातून मिळालेले कौशल्य, टूलकिट तसेच कर्जाच्या सुविधेचा उपयोग करून आपला व्यवसाय उभा करावा आणि जीवनमान उंचवावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित पीएम विश्वकर्मा लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वैभव लहाने, खादी ग्रामोद्योग अधिकारी सरिता राऊत यांच्यासह...