वर्धा बातम्या
बातम्या -
Wardha
- एसआयआरची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध- जिल्ह्यात यादीनुसार ९ लाख ५९ हजारांवर मतदार- दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत- प्रारुप मतदार यादीचे राजकीय पक्षांना वितरणविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर अंतर्गत जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी आणि वगळलेल्या मतदारांची यादी ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त मतदारांचा समावेश यादीत होईल, यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले. प्रारुप यादीबाबत राजकीय पक्षांसोबत आज जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी सदर आवाहन केले. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी अनिल गावित तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रा.खलील खतीब, अविनाश मांडे, आशिष देशमुख, भैय्याजी देशमु...
बातम्या -
Wardha
- लेझर लाईट, डीजेचा अतिरिक्त आवाज नको- जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था राखण्याचे आवाहनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : येत्या काही दिवसात जिल्ह्यात विविध सण, उत्सव मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरे केले जाणार आहे. या आनंदाच्या काळात जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, सर्व सण उत्सव शांततेत पार पडेल, यासाठी मंडळांसह सर्वसामान्य नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने शांतता व समन्वय समितीची सभा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधि...
बातम्या -
Wardha
- वर्धा रेल्वे स्थानकावर आरपीएफची कारवाई; श्वान प्रिन्सच्या संकेताने १०.४७० किलो गांजा जप्तविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : मुंबईकडे जाणाऱ्या साप्ताहिक एक्स्प्रेसमधून गांजाची अवैध वाहतूक करण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिसांनी उधळून लावला. आरपीएफच्या श्वान पथकातील प्रिन्स याने दिलेल्या मादक पदार्थाच्या संकेतामुळे बी/२ कोचमध्ये असलेल्या संशयित बॅगेची झडती घेण्यात आली. त्यातून १०.४७० किलो ओलसर गांजा, ट्रॉली बॅग आणि दोन मोबाइल फोन असा एकूण ५ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बिहारमधील मनीष कुमार विश्वेश्वर शर्मा २९ वर्षे रा. पीसी कॉलनी, कंकडबाग, पाटणा याला अटक करण्यात आली आहे.आरपीएफ सीआयबी आणि सीपीडी, नागपूरचे पथक श्वान प्रिन्ससह ट्रेन क्रमांक १२८७० मुंबई एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. गाडी सिंदी रेल्वे स्था...
बातम्या -
Wardha
- तीन पिलांसह तासभर वाघिणीचा वावर; शेतकरी धास्तावले, पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दीविदर्भ न्यूज एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी / आष्टी : तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात वन्यप्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बांबर्डा ते चामला मार्गावर शनिवारी दुपारी तीन पिलांसह वाघिणीने तब्बल तासभर ठिय्या दिल्याची घटना घडली. रस्त्यावर वाघीण बसलेली पाहून शेतकरी व वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान, वाघिणीचा हा थरारक वावर एका कारचालकाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.शनिवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मारुती घटी यांच्या शेताजवळ बांबर्डा ते चामला मार्गावर एका कारचालकाला वाघीण आणि तिची तीन पिले दिसली. वाघीण रस्त्यावर बसलेली होती, तर तिची पिले रस्त्य...
बातम्या -
Wardha
- प्रकल्पाच्या अडीअडचणी जाणून घेत गुंतवणुकीचे केले कौतुकविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी देवळी एमआयडीसीतील एसएमडब्ल्यू इस्पात प्रा. लि.(संगम) प्रकल्पास भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेत व्यवस्थापनाशी संवाद साधत प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भातील अडीअडचणी जाणून घेतल्या.वर्धा येथे आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत एसएमडब्ल्यू इस्पात प्रा. लि. कंपनीने ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या गुंतवणुकीमुळे देवळी परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.जिल्ह्यात उद्योगांना पोषक वातावरण निर्माण होत असून स्थानिक उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी नमूद केले. ...
बातम्या -
Wardha
- मराठी भाषा विभागाचा आढावा व साहित्यिकांशी संवाद- प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा अधिकारी- ३५ हजार पुस्तके उपलब्ध होणारविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : मराठी भाषा आणि तिच्या विविध बोलीभाषांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहेत. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता तो जागतिक स्तरावर नेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला राज्यातील पहिले पुस्तकांचे शहरम्हणून घोषित करण्यात आले असून, शहरातील ग्रंथालयांसाठी ३५ हजार पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मराठी भाषा विभागाचा आढावा व साहि...
बातम्या -
Wardha
- उद्योग, एमआयडीसी, सीएमईजीपी योजनेचा आढावा- भूखंडधारकांची ए, बी, सी श्रेणीत वर्गवारी- पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून द्याविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी एमआयडीसीतील उपलब्ध भूखंडांचा प्रभावी वापर करावा. भूखंड घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांचा सविस्तर आढावा घेऊन भूखंडधारकांची ए, बी आणि सी अशा त्रिस्तरीय श्रेणीत वर्गवारी करावी. प्रत्यक्ष उद्योग सुरू असलेल्यांना ए, उद्योग सुरू करून सध्या बंद असलेल्यांना बी, तर भूखंड घेऊन अद्याप उद्योग सुरू न करणाऱ्यांना सी श्रेणीत समाविष्ट करून नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच एमआयडीसीतील खुले भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग, एमआयडीसी, सीएमईजीपी योजनेचा आढावा पालकमंत्री ...
बातम्या -
Wardha
- जिल्हा गुंतवणूक परिषदेत ३ हजार ११ कोटींचे सामंजस्य करार- उद्योगात स्थानिकांना प्राधान्य द्या- तरुणांच्या उद्योगांना शासनाचे भक्कम पाठबळ विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : वर्ध्यातील उद्योगांची क्षमता आणि स्थानिक उद्योजकांचा उत्साह कौतुकास्पद असून, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्र्यांनी दिली. जिल्हा गुंतवणूक परिषदेत तब्बल ३ हजार ११ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, या गुंतवणुकीतून जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.आज जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने आर्शिवाद सेलीब्रेशन हॉल येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलीस अध...
बातम्या -
Wardha
- तळोदी परिसरातील दुर्दैवी घटना; शेतातील विहिरीतून पाणी काढताना गमावला तोलविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : शेतातील विहिरीतून पाणी काढताना अचानक तोल गेल्याने विहिरीत पडून एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळोदी परिसरात गुरुवारी घडली. निर्मला वसंतराव कुंमरे (वय ६५, रा. तळोदी) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने तळोदी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, निर्मला कुंमरे या गुरुवारी आपल्या शेतात गेल्या होत्या. शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्यांचा तोल गेला. तोल गेल्याने त्या थेट विहिरीतील पाण्यात पडल्या. विहिरीत पडल्याने त्या पाण्यात बुडाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेचा शोध घेऊन त्यांना विहिरीबाहेर काढण्यात आले. मात्र, पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्या...
बातम्या -
Wardha
- बोरगाव (मेघे) परिसरातील घटना; शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंदविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : घरावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बोरगाव (मेघे) परिसरात घडली. शुभम दिलीप जाजर्ले २९ वर्षे रा. हनुमान नगर असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शुभम जाजर्ले हा बोरगाव (मेघे) परिसरातील आपल्या घरावर असताना अचानक खाली पडला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते.मात्र, उपचार सुरू असतानाच शुभमची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वर्धा शहर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, युवक घ...