वर्धा बातम्या
बातम्या -
Wardha
- सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजन- विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभागविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : अवयवदानाची जनजागृती करण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयातून जनजागृती रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुश मोटवाणी, उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणवीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे, सामान्य रुग्णालयातील बाह्य संपर्क अधिकारी डॉ.विद्या पवार, नेत्र समुपदेशक प्रफुल्ल काकडे आदी उपस्थित होते.मृत्य...
बातम्या -
Wardha
- जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अवयवदान- मृत्यूनंतरही गरजूंच्या आयुष्यात आनंद पेरण्याचा संकल्पविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत आज जिल्हाभर एकाचवेळी अवयवदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावर आयोजित या शिबिरात शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शिबिरात जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी ऑनलाईन नोंदणी करून अवयवदानाचे संमतीपत्र भरले. जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी सोमण यांच्या उपस्थितीत शिबिर घेण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते अवयवदान शिबिराचा जिल्हास्तरीय शुभारंभ झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजू रणवीर, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर खडतकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, जिल्हा आरो...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (मराठा) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने विशेष त्रुटी पूर्तता शिबिर आयोजित करण्यात आले आहे.शैक्षणिक प्रयोजनासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रस्ताव सादर केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये काही आवश्यक कागदपत्रे, पुरावे अथवा इतर बाबींची पूर्तता आवश्यक असल्यास संबंधित विद्यार्थ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करून त्रुटींची पूर्तता करण्याची सुविधा या विशेष शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ मध्ये आरक्षित प्रवर्गात...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षाच्या डॉ. किमया गंधे यांनी केले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने बाल गणेश मंडळ, नेरी (पुनर्वसन) आणि बाल गणेश मित्र मंडळ, देवळी येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा आणि उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात आली.यावेळी डॉ.किमया गंधे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत गंभीर आजारांच्या उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपचारासाठी आर्थिक मदत मिळविण्यासाठी...
बातम्या -
Wardha
- २२८ पीकवाणे व तंत्रज्ञानाचे जिवंत प्रात्यक्षिक; सुधारित कापूस, सोयाबीन व तुरीच्या वाणांना शेतकऱ्यांची पसंतीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आयोजित तीन दिवसीय शिवार फेरीच्या दुसऱ्या दिवशी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवित आधुनिक शेती तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेतली. पोकरा मॉडेल व्हिलेज अंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील शेतकरी, शेतकरी उत्पादक गट, महिला बचतगट, युवक-युवती तसेच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवार फेरीला भेट दिली.शिवार फेरीदरम्यान उभारण्यात आलेल्या विविध पीक प्रात्यक्षिकांमधून शेतकऱ्यांना सुधारित वाण, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष पाहता आली. सघन कापूस लागवडीसाठी दफ्तरी-२१२१, एकेए-धवल, एकेए-७ आणि सुवर्ण शुभ्रा या वाणांनी शेतकऱ्यांचे लक्ष ...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : शाळांमध्ये सुरक्षित व पौष्टिक अन्न उपलब्ध करुन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये संतुलित आहाराच्या सवयी विकसित करण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन कार्यालय व शिक्षण विभाग, पंचायत समिती हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यमाने हिंगणघाट येथे पीएम पोषण आहार योजनेंतर्गत वितरीत होणाऱ्या अन्न पदार्थ्यांच्या संदर्भात माहिती देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.जी.वी.एम.एम. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय हिंगणघाट येथे तालुक्यातील मुख्याध्यापक, नोडल अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच संबंधित व्यक्ती यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणुन अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त प्रफुल टोपले, गट शिक्षणाधिकारी सुभाष टाकळे, अन्न सुरक्षा अधिकारी पियुष मानवतकर, हुमागौरी पिंपरे यांची उपस्थिती होती.शाळांमध्ये सुरक्षित व पौष्टिक अन्न उपलब्ध कर...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : माझ गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हास्तरीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला माझ गाव आरोग्य संपन्न अभियानाच्या नागपूर मंडळाच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट रिसोर्स पर्सन राज्यस्तरीय प्रतिनिधी सविता गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, शिक्षणाधिकारी प्राथमिक सीमा पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री राऊत, शिक्षणाधिकारी नियोजन चंद्रकांत चिलवते, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.संदिप नखाते, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.प्रशांत वाडिभस्मे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी आम्रपाली मोरे, जिल्हा मूल्यमापन व संनियंत्रण अधिकार...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.निवडणूक कार्यक्रमानुसार दिनांक मंगळवार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मंगळवार ६ ऑक्टोबर असून, बुधवार ७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख शुक्रवार ९ ऑक्टोबर आहे. शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत मतदान होणार असून मंगळवार २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसं...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : फलोत्पादन क्षेत्रातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या व मूल्यसाखळीतील विविध घटकांना सक्षम करून शेतमालाला अधिक चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सहकार, पणन व वस्रोद्योग विभागामार्फत तसेच आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्र अॅग्रोबिझनेस नेटवर्क प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी, उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था व मूल्यसाखळीतील संबंधित घटकांनी या प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण, क्षमता बांधणी, वित्तीय सहाय्य, मूल्यवर्धन व बाजारपेठ जोडणीच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्पांतर्गत शेतमालाच्या उत्पादनापासून ते काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, साठवणूक, वाहतूक व विपणन या संपूर्ण मूल्यसाखळीला बळकटी देण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच शेतकरी उत्पादक संस्था व मूल...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या व प्रवेश न घेतलेल्या इयत्ता ११ वी, १२ वी तसेच नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.सन २०२५-२०२६ या वर्षात स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षाकरीता ऑनलाईन अर्ज नुतणीकरण करण्याकरीता ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. सर्व प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता अर्ज करावयाच्या पुर्वी शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेणे आवश्यक आहे.स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना वसतीग...