वर्धा बातम्या
बातम्या -
Wardha
- वर्धा जिल्ह्यात २९ सप्टेंबरला एकाच दिवशी ११ ठिकाणी रोजगार महाकुंभ; नामांकित कंपन्यांचा सहभाग वाढविण्याचे निर्देशविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील पदवीधर व पदव्युत्तर युवक-युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांचा जास्तीत जास्त सहभाग सुनिश्चित करून त्यांच्या उपलब्ध रिक्त पदांवर जिल्ह्यातील युवकांची निवड कशी करता येईल, याचे प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर बोलत होते. जिल्ह्यातील युवकांसाठी रोजगार महाकुंभ ही मोठी संधी असून, या सं...
बातम्या -
Wardha
- रायपूर जंगली परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले; ग्रामस्थांच्या मागण्यांवर वन विभागाकडून लेखी आश्वासनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : राखीव वन नियतक्षेत्र रायपूर जंगली, वनपरिक्षेत्र हिंगणी बफर क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भगवान चंद्रभान धुर्वे हे ९ सप्टेंबर रोजी शेतात जात असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या दुर्दैवी घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यासह विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. त्यानुषंगाने बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने वाघाला जेरबंद करण्यासह ग्रामस्थांच्या इतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्यात आले आहे.मृत भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी वन विभागाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. संबंधित कुटुंबाला तातडीन...
बातम्या -
Wardha
- राष्ट्रीय पोषण माह आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील; उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदानविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचा राज्यस्तरावर दुहेरी प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला. आठव्या राष्ट्रीय पोषण माहमध्ये उत्कृष्ट कामगिरी तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत निर्धारित उद्दिष्टाच्या १४२ टक्के नोंदणी पूर्ण करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्ह्याला गौरविण्यात आले.मुंबई येथे आयोजित पुरस्कार वितरण समारंभात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्याच्या वतीने जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसंगे यांनी पुरस्कार स्वीकारले.सुपोषित नारी, सशक्त परिवार अभियान ठरले यशाचे माध्यम -१७ सप्टेंबर ते १६ ऑक्टो...
बातम्या -
Wardha
- जिल्ह्यातील एकूण ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांचा याद्या पोर्टलवर अपलोड - शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करावेविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिल्या यादीतील ३२ हजार ५३५ आणि आज प्राप्त झालेल्या तिसऱ्या यादीतील ११ हजार २६४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या सर्व तहसील कार्यालये, सहाय्यक निबंधक कार्यालये आणि ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच याद्या तलाठ्यांनाही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २३ हजार ३३० शेतकऱ्यांच्या...
बातम्या -
Wardha
- वर्धा तालुक्यात ६ ऑक्टोबर रोजी महसूल लोक अदालतीचे आयोजनविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : महसूल प्रशासनातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने व तडजोडीने निपटारा करून नागरिकांना वेळ व पैशांची बचत करून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान २०२६ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत वर्धा तालुक्यातील महसूल लोक अदालतीचे आयोजन ६ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय, वर्धा येथे करण्यात येणार आहे.महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच अपर महसूल जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित महसुली दावे मोठ्या प्रमाणात प्रलंबित असतात. या प्रकरणांमध्ये पक्षकारांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. तसेच एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील अथवा पु...
बातम्या -
Wardha
- महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा फाउंडेशन डे- सन 2020 एमबीबीएस बॅचचा ग्रॅज्युएशन सेरेमनी- ही कोरोनाची नव्हे, कोरोना योद्ध्यांची बॅचविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, सेवाग्राम ही संस्था केवळ वर्धा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. २०२० एमबीबीएस बॅचच्या नवोदित डॉक्टरांनी संस्थेने दिलेले शिक्षण, संस्कार आणि सेवाभावाची परंपरा पुढे नेऊन समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले. सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये आयोजित फाउंडेशन डे तसेच ग्रॅज्युएशन सेरेमनी एमबीबीएस बॅच २०२० कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे सचिव डॉ.बी.एस.गर्ग, डीन डॉ.ए.के.शुक्ल...
बातम्या -
Wardha
- सेवाग्राम मंडळ व तलाठी कार्यालयाची तपासणी- समुद्रपुर येथे तहसिल, सहनिबंधक कार्यालयास भेट- करंजी भोगे येथे शेतकऱ्यांसोबत पिक पाहणीचे प्रात्यक्षिकविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी देऊन पाहणी केली. महसूल विभाग गेल्या काही वर्षात अधिक लोकाभिमुख, गतिमान झाला आहे. त्यामुळे महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बदलत्या काळात आपल्या भूमिका समजून घेत लोककल्याणासाठी कामे केली पाहिजे, असे ठिकठिकाणी भेटीप्रसंगी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, आकाश अवतारे, विश्वास सिरसाठ, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख प्रदीप जगताप, सहजिल्हा निबंधक के.एस.कांबळे तसेच महसूल, भूमि अभिलेख, नोंदणी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सकाळी सेवाग्राम येथे महसूल म...
बातम्या -
Wardha
विदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : महिला व मुलींच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देतानाच महिलांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद देऊन आवश्यक पोलिस मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दामिनी पथकांना २५ टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी वाहनांचे हस्तांतरण जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्याहस्ते करण्यात झाले.पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर आयोजित कार्यक्रमास पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, परिविक्षाधीन भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शोभिका पाठक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेढे, महिला व बाल विकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्यासह महिला पोलिस अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी महिला व मुलींना त्यांच्या कायदेशीर हक्कांबाबत मार्गदर्शन केले. तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सु...
बातम्या -
Wardha
- दत्ताजी मेघे चौकाचे नामकरण- आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची उपस्थितीविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : दत्ताजी मेघे यांनी वर्धा जिल्ह्याच्या विकासात तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. विशेषत कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या कार्याची खरी ओळख त्यांच्या आरोग्यसेवेतील योगदानातून होते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले.प्रभाग क्रमांक ७ गोंडप्लॉट, बॅचलर रोड परिसरात स्व. दत्ताजी मेघे चौकाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार समीर मेघे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस...
बातम्या -
Wardha
- वृक्ष लागवड व संवर्धन, वन्यजीव सप्ताहाचा आढावाविदर्भ न्यूज एक्सप्रेस प्रतिनिधी / वर्धा : संपूर्ण राज्यात २ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान वन्यजीव सप्ताह राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हा सप्ताह जास्तीत जास्त नागरिक तसेच वन्यजीव प्रेमींचा सहभाग घेऊन अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी नियोजन करा. सप्ताहात वने व वन्यजीव संरक्षण जनजागृतीवर भर द्या, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड व संवर्धन तसेच वन्यजीव सप्ताह नियोजनाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्र्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनसंरक्षक हरवीर सिंह, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते, सामाजिक वनीकरणचे अधिकारी, बोर व्याघ्र प्रकल्पातील कोअर व बफर झ...